Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी २५, २०१९

चंद्रपूर : ट्र्व्हल्स दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

मूल/ रमेश माहुरपवार:


मूल-नागपूर मार्गावर मरेगांव समोरील वळण मार्गावर अंजनी ट्र्व्हल्स व दुचाकीस्वार यांचेत भीषण अपघात झाला.या अपघातात मोटर सायकलस्वार असलेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
प्रकाश धंदरे (वय 30 वर्ष), बाळू सीडाम (वय 28) वर्ष दोघेही राह. एकरा भुज तह. सिंदेवाही अशी दोघांची नावे असल्याचे समजते.
ही घटना सोमवारी सकाळी ६.४५ वा.च्या सुमारास घडली. अंजनी ट्र्व्हल्स (MH-40 BG-6522) नागपूर कडे जात असतांना विरुध्द दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी (MH-40-BD-2407) स्वाराने दिली जबर धडक दिली,यात दुचाकीवर असलेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून दुचाकीस्वार मृतका जवळ जंगली ससा होता त्याचा देखील या घटनेत जागीच मृत्यू झाला. मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून ट्रव्हल्स चालकाला ताब्यात घेतले.


पोल्ट्रीफीड



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.