चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील दारूबंदीमुळे अनेक लोकांचे परिवार रस्त्यावर आले. अनेक लोकांच्या हातून काम गेले त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला,राज्यशासनाच्या कोट्यवधींचा महसूल बुडाला, त्यामुळे हि फसवी दारूबंदी उठविण्यासाठी चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिकर असोशिएशनच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.शरद पवार हे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.त्यावेळी शासकीय विश्रामगृहात हे निवेदन देण्यात आले.
करोडोचे कर्ज परवाना धारक बार मालकावर आहे,दारूबंदी झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात पोलीस करोडो रुपयाची दारू जप्त करत आहे.यावर दारूबंदी पूर्णतः फसली आहे,अशी हि फसवी दारूबंदी उठविण्यासाठी व शासनाचा कोट्यावधीचा महसूल भरून काढण्यासाठी चंद्रपूर जिल्यातील दारूबंदी उठविण्यासाठी हे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक जयस्वाल,यांच्यासह लिकर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.