सावली/प्रतिनिधी:
वाढत्या महगाईला विरोध करत सावली येथे आज चक्क गॅस सिलेंडरचीच अंतयात्रा काढण्यात आली.भाजपाप्रणित केंद्र व राज्य सरकारच्या कमवकुत धोरणामुळे राज्यभरात महागाईच्या भस्मासुर दिवसेंदिवस वाढत असून याचा परिणाम गोरगरीब व सामान्य जनतेच्या जनजीवनावर होत असून जनतेला जीवनावश्यक असलेल्या अन्नधान्य, गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणारी भरमसाठ वाढ,व विजेचे भारनियमन यामुळे जनता व शेतकरी बांधव त्रस्त आहेत. तसेच शेतकऱ्यांना त्वरित कर्ज माफी देवून न्याय देण्यात यावा या सर्व मागणीसाठी गुरवारी सावली (जिल्हा चंद्रपूर) येथे सरकारला डिवचनी देत सरकारच्या अच्छे दिना च्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने लॉलीपॉप मोर्चा व सिलेंडरची अंतयात्रा काढून विरोध दर्शविला.
या मोर्च्यात गावातील नागरिकांना लॉलीपॉप चे वाटप करण्यात आले. तसेच गॅससिलेंडर ची अंतयात्रा व शेतकरी आत्महत्येचे देखावेही गावातुन मिरविन्यात आले.नागरिकांनी देखील या मोर्च्याला उत्पुर्त प्रतिसाद दिला.या आंदोलनाचे आयोजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. संदिपभाऊ गड्डमवार यांच्या नेतृत्व करण्यात आले असून शशिकांत देशकर, राजेंद्र वैद्य, सुरेश रामगुंड, डी. के. आरीकर, सुनील काळे, ॲड.गणेश गिरधर, निमेश मानकर, प्रशांत चिप्पावर, आनंद अडबाले, जैस्वाल, प्रशांत गाडेवार, मनोहर ठाकरे, यशवंत ताडाम,अनिल स्वामी, प्रवीण उरकुडे, आशिष मनंबततूनवार, बंडू मेश्राम, भास्कर उरकुडे, आकाश बुरीवार, रमेश खेडेकर,किशोर मलोडे,जीवन कांबळे,गुनू सुरमवर,मनोज धर्मपवार, राजू व्यास,विवेक सुरमवार,सचिन संगीडवार, प्रकाश सुरमवार, प्रकाश लोंनबले, प्रमोद गेडाम, तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.