Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २४, २०१४

चंद्रपुरात कांग्रेसजणांची नाराजी उघड

चंद्रपूर, काँग्रेसकडून माजी खासदार नरेश पुगलिया यांना तिकीट न देता मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्याच विरोधात काम करणाèया संजय देवतळे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला जात आहे. बल्लारपूर नगर परिषदेच्या अध्यक्षा रजनीताई मुलचंदानी यांच्यासह १३ नगरसेवकांनी काँग्रेस सदस्यत्व व पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला आहे. चंद्रपूर मनपातील नगरसेवकांच्या पाठोपाठ आता बल्लारपूरच्या नगरसेवकांनीही राजीनामा अस्त्र उगारल्याने चंद्रपूर बल्लारपूर क्षेत्रात काँग्रेसअंतर्गत खळबळ उडाली आहे.

बल्लारपूर नगर परिषदेत कांग्रेसची सत्ता आहे. येथे पुगलिया समर्थकांची चलती असल्याने पुगलिया गट सत्तेत आहे. आता लोकसभा निवडणूकीसाठी पक्षाकडून पुगलिया यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे समर्थक पक्षनिर्णयाविरोधात उघडपणे बंड करू लागली आहेत. बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनीही पक्षाध्यक्षाकडे नाराजीचे निवेदन पाठविले असून बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती हरीष गेडाम व पंचायत समिती सदस्य जनकेश्वर मेश्राम यांनीही आपला पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे पाठविला असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावाने बल्लारपूरच्या नगरसेवकांनी एक निवेदन पाठविले. त्या निवेदनात संजय देवतळे यांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा निर्णय चुकीचा असल्याचे नमूद करण्यात आले. मागील २००९ च्या निवडणुकीत संजय देवतळे यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या चंद्रपूरच्या सभेत गैरहजेरी लावली व त्यानंतर त्यांना पक्षाकडूनच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. याचा उल्लेख करण्यात आला असून पक्षविरोधी कारवाया करणाèया व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय त्वरित बदलविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.