Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २४, २०१४

निवडणूकांवर नक्षलवाद्यांची गडद छाया


गडचिरोली, नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येत्या १० एप्रिल रोजी होणाèया लोकसभा निवडणूकीवर नक्षली कृत्यांची छाया राहणार आहे. २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये एकंदरीत ५५ घटना घडल्या होत्या.

गत लोकसभा निवडणूकीचा विचार केल्यास नक्षली प्रत्येक निवडणूकीच्या वेळी पोलिस विभागाला आपले लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न करीत असतात. २००४ च्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान नक्षल्यांनी पोलिस पथकावर १२ हल्ले केले होते. एक हत्या झाली होती. २००४ च्या लोकसभा निवडणूकीत एकंदरीत २३ qहसात्मक घटना पडल्या होत्या. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान एकंदरीत १९ qहसात्मक घटना घडल्या होत्या. या निवडणूकीदरम्यान पोलिस पथकावर हल्ला करण्याच्या १२ घटना घडल्या होत्या. २ जणांची हत्या झाली होती. तसेच इतर ३ qहसात्मक घटना घडल्या होत्या. २००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान एकंदरीत ५५ qहसात्मक घटना घडून आल्या होत्या. या निवडणूकी दरम्यान पोलिस पथकावर हल्ल्याच्या १३ घटना घडल्या होत्या. २००९ च्या लोकसभा निवडणूकी दम्यान नक्षली हल्ल्यात ३ पोलिस शहीद झाले होते. ९ व्यक्तींच्या हत्या करण्यात आली होती. इतर स्वरूपाच्या १० qहसात्मक घटना घडल्या होत्या. २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान एकंदरीत ५७ qहसात्मक घटना घडून आल्या होत्या. पोलिस पथकावर हल्ल्याच्या १२ घटना घडल्या होत्या. यामध्ये १७ पोलिस जवान ठार झाले होते. तसेच ४ पोलिस जवान जखमी झाले होते. या कालावधीत ७ इतर घटना घडल्या होत्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.