Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २४, २०१४

विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार

 पटेल दांपत्याकडे नाही स्वत:ची गाडी !

भंडारा भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल हे विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्या नावाने १९५.९६ लाख ८४ हजार ७७९ रुपङ्मे एवढी संपत्ती असून एकट्या प्रफुल्ल पटेलांच्या नावे ७१ कोटी ५९ लाख ३२ हजार ४४६ रुपयांची संपत्ती असल्याचे समजते. असे असले तरी, प्रफुल्ल पटेल qकवा वर्षा पटेल यांच्यापैकी कुणाकडेही दुचाकी qकवा चारचाकी वाहन नसल्याचे स्पष्ट होते. कोणत्याही प्रकारे वाहन नसलेले हे पटेल दाम्प्त्ङ्म मात्र कोट्यधीश आहेत हे विशेष. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी उमेदवारी अर्ज सादर केला. या अर्जासोबत जोडण्यात आलेल्या संपत्ती संदर्भातील शपथपत्रातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. पटेलांनी ते आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या संपत्तीचा हिशोब शपथपत्रात दिला आहे

सन २०१२-१३ मध्ङ्मे प्रफुल्ल पटेल यांची एकूण नगदी आवक ४ लाख ३ हजार ९३० रुपङ्मे, तर वर्षा पटेल यांची एकूण नगद आवक ३ कोटी ५७ लाख ४७ हजार ८८० रुपङ्मे आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याजवळ ३ हजार रुपङ्मे नगदी, २७ लाख ८० हजार ७४ रुपङ्मे बंकेत जमा राशी, २ कोटी ८० ल ाख ४९ हजार ७२० रुपयांचे बंधपत्रे, ऋणपत्रे आणि शेअर्स अशी गुंतवणूक आहे. २१ लाख २४ हजार ४४ ऋणकोकडून इतर प्राप्त देणी व रक्कम १ कोटी २६ लाख ५५ हजार ८७५ रुपयांचे दागिने, ४ कोटी ५६ लाख १२ हजार ७१४ रुपयांची चल संपत्ती आणि ६७ कोटी ३ लाख १९ हजार ७५० रुपयांची अचल अशी एकूण ७१ कोटी ५९ लाख ३२ हार ४४६ रुपयांची संपत्ती पटेलांनी स्वतःच्या नावाने घोषित केली आहे. वर्षा पटेल यांच्या नावे नगदी ४६३० रुपङ्मे ८० लाख २ हजार ८९१ रुपयांची बँकेत जमा रक्कम, १ कोटी ५५ लाख ४८ हजार ९५८ रुपयांचे बंधपत्रे, ऋणपत्रे आणि शेअर्स अशी गुंतवणूक ६ कोटी ४२ लाख ६३ हजार ८१८ ऋणकोकडून इतर प्राप्त देणी व रक्कम, २ कोटी ५० लाख ४२ हजार ५१८ रुपयांचे दागिने, ११,कोटी २८ लाख ६२ हजार ८१५ रुपयांची चल संपत्ती व ११३ कोटी ८ लाख ९० हजार ५०० रुपयांची अचल संपत्ती अशी एकूण १२४ कोटी ९६ लाख ८५ हजार ७७९ रुपयांची संपत्ती असल्याचे घोषित करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.