चंद्रपूर दि.13- अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांच्या दालनात कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीस कामगार संघटनेचे पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने कुठल्याही निर्णयाविना ही बैठक झाली.
मंगळवार 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांचेशी चर्चा करण्यासाठी बैठक घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानुसार आज बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस अल्ट्राटेकचे युनिट प्रमुख अशोक खुंटवाल यांचेसह सहा प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र कामगार संघटनेचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने ही बैठक निर्णयाविना संपली.
कामगार संघटनांनी प्रादेशिक कामगार आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना पाठविली व त्यात जिल्हाधिकारी करीत असलेल्या प्रयत्नांचे स्वागत आहे असे म्हटले आहे. सोबतच व्यवस्थापनाशी चर्चा करुन जे प्रश्न सोडविण्यात आले असतील तर आम्हाला त्वरीत कळवावे. आमचे समाधान झाल्यास आंदोलन मागे घेवू व समाधान न झाल्यास ठरल्याप्रमाणे आंदोलन सुरु राहील असे नमूद केले आहे. या पत्रावर कामगार संघाचे महासचिव साईनाथ बुचे यांची स्वाक्षरी आहे.
अल्ट्राटेक कामगारांचे एकूण 22 प्रश्न असून त्यासंदर्भात व्यवस्थापन व प्रादेशिक कामगार आयुक्त व सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांचे समवेत जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली. अल्ट्राटेक व्यवस्थापनाने कामगार संघटनेचे 22 प्रश्नाविषयी सविस्तर अहवाल सादर करावा असे सांगितले. व्यवस्थापन व कामगार संघटना यांचेशी समक्ष चर्चा करुन समस्या सोडविण्यास जिल्हा प्रशासन तयार असून त्यासाठीच आजची बैठक बोलाविली होती. मात्र कामगार संघटना या बैठकीला उपस्थित न राहिल्याने यावर तोडगा निघू शकला नाही असे जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी सांगितले.