स्थानिक मित्र संस्थेच्या वतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत पुरस्कार प्राप्त ठरलेले 'शिशिर ऋतुच्या पुनरागमे'या नाटकाचा प्रयोग २ मार्चला रात्री ९ वाजता स्थानिक प्रियदर्शिनी नाट्यगृहात होणार आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत या नाटकाला निर्मिती आणि दिग्दर्शनात प्रथम पुरस्कार मिळाला असून स्त्री अभिनय आणि पुरुष अभिनयात रौप्यपदक मिळाले आहे. या सोबतच या नाटकाने प्रकाशयोजना आणि नेपथ्यासाठी द्वितीय तर, वेषभूषेसाठीही प्रथम पुरस्कार मिळविला आहे. नाटकाचे लेखक डॉ. समिर मोने (पुणे) असून दिग्दर्शनाची बाजू सुनील देशपांडे यांनी सांभाळली आहे.
सहदिग्दर्शक विष्णू पगारे असून प्रकाश योजना हेमंत गुहे यांची आहे. नेपथ्य महेश अडगुरवार, दिगंबर इंगळे, संगीत श्याम झाडे, रंगभूषा बाळू तोडे, वेषभूषा सुवर्णा गुहे, सविता देशपांडे, दृश्यचित्रे टिंकू यांची आहेत. संजय रामटेके, प्राची देशपांडे, गौरव पराते यांनी यात भूमिका साकारल्या आहेत.