Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट ०७, २०१०

आठवडाभरातच सीडी रस्त्यावर

पायरसी रोखणारा अधिकारी बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 05, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: pirated CD, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आठ दिवस गायब राहिलेल्या बनावट सीडी पुन्हा रस्त्यावर आल्यात. जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी चौकापर्यंत हातगाड्यांवर सीडी विकताना दिसून आले. शहरात अश्‍लील सीडीचे प्रकरण गाजत असतानाच हा प्रकार खुलेआम सुरू असल्याने प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यात कारवाई करण्यासाठी पोलिसांचे हात कमी पडत असून, पायरसी रोखणारा अधिकारीच मुळात बेपत्ता झाला आहे.
चित्रफितींच्या बनावट सीडी बाजारात येऊ नयेत, याची जबाबदारी पायरसी रोखणाऱ्या कंपन्यांना दिली जात; मात्र आता उलट झाले आहे. शहरातील प्रमुख वितरक पायरसी रोखणाऱ्या अधिकाऱ्याला हाताशी धरून बनावट सीडीचा गोरखधंदा सुरू झाला आहे. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. "अग्रवाल आणि शाहा' नामक व्यक्ती सीडीकिंग असल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्यावेळी तब्बल अडीच लाखांच्या सीडी जप्त करण्यात आल्या होत्या. यातील अनेक सीडी अश्‍लील आणि बनावट असल्याचे पोलिसांना मिळालेल्या अहवालातून स्पष्ट झाले. याउपरही कारवाई करण्यात आलेली नाही.
हातगाडीवर विकल्या जाणाऱ्या सीडी चित्रपट गाण्यांच्या असतात, असे प्रथमदर्शनी भासविले जात होते; मात्र एखाद्या ग्राहकाने हळू आवाजात अश्‍लील चित्रफितीची मागणी केल्यास तीसुद्धा त्याला पुरविण्यात येते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.