विदर्भात मे महिन्यात दिवसागणिक चढत जाणाऱ्या तापमानाच्या आकडेवारीने जनजीवन प्रभावित झालेले असून; 25 में 2010 ला ब्रह्मपुरी येथील पारा ४८.३ वर पोचला होता . चंद्रपुराचा परा ४७.७ होता। जिल्ह्यातील या उष्णतेच्या खालोखाल इतर जिल्ह्यांतही उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्यांचे हाल होत आहेत.
चंद्रपूर - यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाच्या आकड्यांचा विक्रम मोडत चंद्रपूर शहरात आज (ता. 11) 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
एक मे रोजी 40.6 अंश तापमान होते. त्यानंतरच्या दहा दिवसांत तब्बल सहा अंशांनी वाढ झाल्याने चंद्रपूरकर हैराण झाले आहेत. मार्च-एप्रिल महिन्यांत 40 ते 44 अंशांपर्यंत तापमान असायचे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात कमालीची घट झाली होती.
या हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात पाच जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील भेंडाळा येथे कुणाल लोंढे, चिमूर येथे सखाराम भैसारे, पडोली येथे कैलास भलावी यांचा चालू आठवड्यात, तर अन्य दोघांचा या वर्षाच्या उन्हाळ्यात उष्माघातामुळे मृत्यू झाला.
मे महिन्यात चंद्रपुरातील चढता पारा
एक मे -40.6
दोन मे-40.3
तीन मे - 41.6
चार मे- 42.2
पाच मे -43.2
सहा मे -44.8
सात मे - 43.9
आठ मे -44.9
नऊ मे- 46.1
10 मे - 46.2
11 मे- 46.6