Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

police लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
police लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, एप्रिल ०४, २०२१

नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; 22 जवान शहीद

नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; 22 जवान शहीद




छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवादी हल्ल्यात आतापर्यंत 22 सैनिकांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्याचवेळी, एक जवान अद्याप बेपत्ता आहे. या हल्ल्यात एकूण 32 सैनिक जखमी झाले असून, विजापूर रूग्णालयात 25 सैनिकांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर छत्तीसगड पोलिसांनीही 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेहही ताब्यात घेतला आहे. शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा बटालियन, डी.जी.जी. आणि विजापूर व सुकमा जिल्ह्यातील एसटीएफची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईत रवाना झाली. विजापूर जिल्ह्यातील तारिम, उसूर, सुकमा जिल्ह्यातील मिनापा आणि नरसपुरम येथून सुमारे दोन हजार सैनिक नक्षलविरोधी कारवाईत सहभागी झाले होते.




छत्‍तीसगढ के बीजापुर जिले में माओवादियों के साथ मुठभेड में पांच सुरक्षाकर्मी शहीद और 12 अन्‍य घायल


छत्‍तीसगढ में बस्‍तर संभाग के बीजापुर जिले में आज माओवादियों के साथ मुठभेड में पांच सुरक्षाकर्मी शहीद हो गए और 12 अन्‍य घायल हो गए।




सुरक्षाबलों का एक संयुक्‍त दल इस क्षेत्र में बडी संख्‍या में उग्रवादियों की मौजूदगी का सुराग मिलने के बाद माओवाद रोधी अभियान पर था। जब यह दल तार्रेम क्षेत्र में पहुंचा तो दल पर माओवादियों ने घात लगाकर हमला किया। सुरक्षाकर्मियों की जवाबी कार्रवाई के फलस्‍वरूप मुठभेड शुरू हो गई। अंतिम समाचार मिलने तक दोनों ओर से गोलीबारी जारी थी।
अतिरिक्‍त सुरक्षाबल घटनास्‍थल पर रवाना हो गया है। दो हेलीकॉप्‍टर और नौ एम्‍बूलेन्‍स बीजापुर जिला मुख्‍यालय भेजे गए हैं।

मंगळवार, मार्च २३, २०२१

नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 3 जवान शहीद, 8 गंभीर जखमी

नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 3 जवान शहीद, 8 गंभीर जखमी



नक्षलवाद्यांनी DRG आणि ITBP च्या जवानांनी भरलेल्या बसला नक्षलवाद्यांना स्फोटांनी उडवून दिलीय. या स्फोटात 3 जवान शहीद झाले असून, 8 गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट IED कडून छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये करण्यात आलाय. नक्षलवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परतत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात DRG च्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू छत्तीसगडचे डीएम अवस्थी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात DRG च्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाला. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

मंगळवार, ऑगस्ट १८, २०२०

दारू तस्करांनी केली पोलीस निरीक्षकाला मारहाण

दारू तस्करांनी केली पोलीस निरीक्षकाला मारहाण

Big Breaking

मारहाणीचा विडिओ व्हायरल
चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसच असुरक्षित
चिमूर तालुक्यातील धक्कादायक घटना

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
जिल्ह्यात दारू तस्करांची हिम्मत दिवसेंदिवस वाढतच चालली असून, आज दारू माफियांनी पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिमूर तालुक्यात घडली आहे. 
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरी बिडकर येथे हि घटना घडली आहे.


सावरी बिडकर येथे शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व पोलीस हवालदार क्षीरसागर हे दारू विक्री संदर्भात तपासणीकरिता गेले होते. यावेळी दारू माफिया संदीप ठवरे, सुधीर ठवरे, सतीराम ठवरे यांनी पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व क्षिरसागर यांना मारहाण केली. आता पोलीस सुद्धा असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी चंद्रपूरात रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकास मारहाण झाली होती. 

बुधवार, ऑगस्ट ०५, २०२०

रुग्णालयातील महिला कामगाराच्या मृत्यूने वातावरण चिघळले

रुग्णालयातील महिला कामगाराच्या मृत्यूने वातावरण चिघळले

कामगारांनी रुग्णालयातच ठिय्या मांडून काम बंद केले


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या संगीता पाटील यांना काल दिनांक चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान दरम्यान हृदयविकाराचा झटका आला.त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये भरती करण्यात आले.त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले.विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना नियमितपणे दर महिन्याला पगार दिला जात नाही.काही दिवसापूर्वी दोन टप्प्यांमध्ये कामगारांचे थकीत पगार दिले.परंतु पुन्हा पाच महिन्याचे पगार थकीत असल्याने कामगारांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. अशातच संगीता पाटील यांच्या पतीचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू सुद्धा झालेला होता. त्यांना प्रचंड आर्थिक अडचण असल्यामुळे त्या दररोज सहकारी कामगारांना पगाराविषयी विचारणा करित होत्या.आज अखेर मानसिक तणावामुळे त्यांना जीव गमवावा लाछला असा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला.संगीता पाटील यांच्या मृत्यूने सर्व कामगार संतप्त झाले. त्यांनी रुग्णालयात ठिय्या मांडला. यानंतर आमदार किशोर कामगार, नगरसेवक पप्पू देशमुख अधिष्ठाता डॉ.सुरपाम यांची याची अतिदक्षता विभागातील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये कामगार महिलेच्या अनाथ मुलाचे पालकत्व स्विकारणाऱ्या जवळच्या नातेवाईकाला कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचा निर्णय झाला.सोबतच एक लाख रुपये मुलाच्या खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट करण्याचे ठरविण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्या कंत्राट रद्द झाल्याने थेट वैद्यकीय महाविद्यालयातील निधीतून अर्थसहाय्य करण्याची मागणी करण्यात आली.मात्र निधी नसल्यामुळे केवळ पंचवीस हजार रुपये देणे शक्‍य असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी 25000 रुपये मदत जाहीर केली तसेच डॉ. सुरपाम यांनी 40000 जन विकास कामगार संघा तर्फे अध्यक्ष देशमुख यांनी 10000 रुपये देण्याचे जाहीर केले. एकूण एक लाख रुपये कामगार महिलेच्या मुलाच्या नावावर फिक्स डिपाॅजिट करण्यात येणार आहे. त्यानंतर पाटील यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी नेण्यात आलामात्र पाटील यांच्या मृत्यू नसून वैद्यकीय शिक्षण विभागाने केलेला खून आहे. सहा-सहा महिने पगार नसल्याने कामगारांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. आणि त्यामुळे या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले.

सोमवार, जुलै २०, २०२०

नागपूर:भरदिवासा गोळीबाराने कळमेश्वर हादरले..!

नागपूर:भरदिवासा गोळीबाराने कळमेश्वर हादरले..!


पति पत्नी वर गोळीबार
गुन्हेगार क्षेत्रातील दोन टोळ्यांचा संघर्ष शिगेला
आपसी वादाचा संशय
नागपूर / अरूण कराळे (खबरबात):
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात लोहकरे लेआऊट येथे विवाहित दाम्पत्यावर भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली या घटनेमध्ये गणेश सुधाकर मेश्राम वय 32 व त्याची पत्नी प्रियंका गणेश मेश्राम वय 28 दोघेही राहणार जयताळा नागपूर हल्ली मुक्काम लोहकरे लेआऊट कळमेश्वर झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालय नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेमुळे कळमेश्वर शहरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश मेश्राम वय 32. त्याची पत्नी प्रियंका गणेश मेश्राम वय 28 व त्यांचा एक 5 वर्षीय मुलगा आरव (मूळ रहिवासी जयताळा नागपूर)मागील दोन वर्षापासून कळमेश्वर येथील लोहकरे ले-आऊट येथील सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने दुसऱ्या माळ्यावर राहत होते गणेश मेश्राम हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असल्याचे बोलले जात आहे व त्याच्यावर नागपूर येथील पोलीस स्टेशनला विविध प्रकारचे गुन्हे सुद्धा दाखल आहे घटनेच्या दिवशी सात आठ तरुण तोंडाला काळे कपडे बांधून एका चार चाकी गाडीतून आले व तो राहात असलेल्या घरमालकाच्या घरी जाऊन दारात उभ्या असलेल्या सुधाकर खाडे यांच्या सुनेला त्यांनी न विचारता प्रवेश केल्याने त्या महिलेने त्यांना हटकले असता तिच्या कपाळावर बंदूक ठेवून तिला धमकी दिली यातच तिने ओरडून दरवाजे बंद केले नंतर गणेश मेश्राम हा राहत असलेल्या दुसऱ्या माळ्यावर ते तरुण गेले त्यांनी घरात घुसून जखमी गणेशच्या पाठीवर तर त्याची पत्नी प्रियांका हीच्या पोटावर गोळया झाडल्या गोळी झाडताच जखमी गणेश वरून शेजार्‍याच्या घरी उडी घेऊन पळाला गोळ्या झाडल्या नंतर सर्व हल्लेखोर चारचाकी गाडीने पळून गेले हा सर्व प्रकार एकमेकांविरुद्ध गॅंगवॉर च्या माध्यमातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे 
जखमी गणेशही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती असून त्याच्यावर नागपूर पोलीस दलामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली जखमींवर कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपुर येथे हलविन्यात आले आहे. गोळीबाराच कारण अद्याप कळू शकलेले नाही.झालेल्या गोळीबाराचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या घरातील रहिवासी बाहेर निघाले व आरडाओरड सुरू केली गर्दी जमत असल्याने आरोपींनी तेथून पळ काढला सदर घटना अवैध धंद्याच्या वर्चस्वाच्या लढाई वतून झाली असल्याचे बोलले जात आहे 
सदर घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनीका राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, कळमेश्वर पोलीस निरीक्षक मारुती मुळूक स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळावरील दोन रिकामे काडतूस, रक्ताचे नमुने आधी साहित्य जप्त करून तपास सुरु केला आहे वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.
झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये कळमेश्वर शहरातील एका व्यक्तीने आरोपींना जखमी गणेश चे घर दाखविल्याची माहिती असून आरोपी नागपूर परिसरातील जयताळा या भागातील असल्याचे विश्‍वसनीय वृत्त प्राप्त झाले आहे. दरम्यान नागपूर शहरातील अनेक तडीपार गुंड प्रवृत्तीचे काही तरुण कळमेश्वर शहर परिसरात विनापरवानगी ने राहुन कळमेश्वर तालुक्यात अवैध धंदे करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे हे विशेष.
भरदिवासा गोळीबाराने कळमेश्वर हादरले..! #kalmeshwar #firing

भरदिवासा गोळीबाराने कळमेश्वर हादरले..! #kalmeshwar #firing



पति पत्नी वर गोळीबार
गुन्हेगार क्षेत्रातील दोन टोळ्यांचा संघर्ष शिगेला
आपसी वादाचा संशय


नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात लोहकरे लेआऊट येथे विवाहित दाम्पत्यावर भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली या घटनेमध्ये गणेश सुधाकर मेश्राम वय 32 व त्याची पत्नी प्रियंका गणेश मेश्राम वय 28 दोघेही राहणार जयताळा नागपूर हल्ली मुक्काम लोहकरे लेआऊट कळमेश्वर झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालय नागपूर येथे हलविण्यात आले आहे
या घटनेमुळे कळमेश्वर शहरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश मेश्राम वय 32. त्याची पत्नी प्रियंका गणेश मेश्राम वय 28 व त्यांचा एक 5 वर्षीय मुलगा आरव (मूळ रहिवासी जयताळा नागपूर)मागील दोन वर्षापासून कळमेश्वर येथील लोहकरे ले-आऊट येथील सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने दुसऱ्या माळ्यावर राहत होते गणेश मेश्राम हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असल्याचे बोलले जात आहे व त्याच्यावर नागपूर येथील पोलीस स्टेशनला विविध प्रकारचे गुन्हे सुद्धा दाखल आहे घटनेच्या दिवशी सात आठ तरुण तोंडाला काळे कपडे बांधून एका चार चाकी गाडीतून आले व तो राहात असलेल्या घरमालकाच्या घरी जाऊन दारात उभ्या असलेल्या सुधाकर खाडे यांच्या सुनेला त्यांनी न विचारता प्रवेश केल्याने त्या महिलेने त्यांना हटकले असता तिच्या कपाळावर बंदूक ठेवून तिला धमकी दिली यातच तिने ओरडून दरवाजे बंद केले नंतर गणेश मेश्राम हा राहत असलेल्या दुसऱ्या माळ्यावर ते तरुण गेले त्यांनी घरात घुसून जखमी गणेशच्या पाठीवर तर त्याची पत्नी प्रियांका हीच्या पोटावर गोळया झाडल्या गोळी झाडताच जखमी गणेश वरून शेजार्‍याच्या घरी उडी घेऊन पळाला गोळ्या झाडल्या नंतर सर्व हल्लेखोर चारचाकी गाडीने पळून गेले हा सर्व प्रकार एकमेकांविरुद्ध गॅंगवॉर च्या माध्यमातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे जखमी गणेशही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती असून त्याच्यावर नागपूर पोलीस दलामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली जखमींवर कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपुर येथे हलविन्यात आले आहे. गोळीबाराच कारण अद्याप कळू शकलेले नाही.झालेल्या गोळीबाराचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या घरातील रहिवासी बाहेर निघाले व आरडाओरड सुरू केली गर्दी जमत असल्याने आरोपींनी तेथून पळ काढला सदर घटना अवैध धंद्याच्या वर्चस्वाच्या लढाई वतून झाली असल्याचे बोलले जात आहे सदर घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनीका राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, कळमेश्वर पोलीस निरीक्षक मारुती मुळूक स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळावरील दोन रिकामे काडतूस, रक्ताचे नमुने आधी साहित्य जप्त करून तपास सुरु केला आहे वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.



झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये कळमेश्वर शहरातील एका व्यक्तीने आरोपींना जखमी गणेश चे घर दाखविल्याची माहिती असून आरोपी नागपूर परिसरातील जयताळा या भागातील असल्याचे विश्‍वसनीय वृत्त प्राप्त झाले आहे. दरम्यान नागपूर शहरातील अनेक तडीपार गुंड प्रवृत्तीचे काही तरुण कळमेश्वर शहर परिसरात विनापरवानगी ने राहुन कळमेश्वर तालुक्यात अवैध धंदे करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे हे विशेष.

शुक्रवार, जुलै १७, २०२०

अखबर विक्रेता पर जानलेवा हमला; जान से मारने की हुई कोशिस

अखबर विक्रेता पर जानलेवा हमला; जान से मारने की हुई कोशिस




नागपुर/ प्रतिनिधी
यशोधरा पोलिस स्टेशन क्षेत्र में एक अखबार विक्रेता पर जानलेवा हमला होने से वह बालबाल बचा।प्राप्त जानकारी के अनुसार शिवशक्ति नगर,यशोधरा नगर निवासी अखबार अनिल मेश्राम मंगलवार को अपने डियूटी पर जा रहें थे तो पांढबोडी निवासी आरोपी युवराज सुकल गजभिये ने अनिल मेश्राम पर जानलेवा हमला बोल दिया।धारदार शस्त्र से चहरे पर वार किया 17 टाके लगे।लेकिन अबतक मामला दर्ज नही हुआ।
अनिल मेश्राम हमेशा की तरह अपने डियूटी पर जा रहे थे।अनिल को जान से मारने के इरादे से युवराज टीपू सुल्तान चौक की और जानेवाले रिंग रोड पर मंगलवार को सुबह 9.30 बजे दबा लेकर बैठा था।जैसी ही अनिल आया वैसे ही उसे रोका व धारदार शेस्त्र से वार कर दिया। अनिल खून से लतपत नीचे गिरा कुछ लोगो ने उसे अस्पताल पहुंचाया।अनिल एक निजी अस्पताल में उपचार ले रहा है।घटना मंगलवार को सुबह 9.30 बजे हुई लेकिन अबतक यशोधरा पुलिस स्टेशन में मामला दर्ज नही हुआ।इस संदर्भ में पीआई दीपक साखरे ने बताया कि घटना की जानकारी हाशिल की है।डॉक्टर की रिपोर्ट मिलने के बाद मामला दर्ज कर आरोपी को जल्द ही हिरासत में लेंगे।
बताया गया कि हमलावर युवराज ,अनिल का भांजी जवाई है।भांजी को भी तकलीफ देता है।वह अब अपने बच्चे लेकर अलग रहती है।अनिल मेश्राम ने समजाने की कोशिश की तो अनिल को ही युवराज ने निशाना बना।अब इस मामले में पुलिस कब मामला दर्ज करती यह इंतजार है। 307 का मामला दर्ज करने की मांग अनिल मेश्राम की पत्नी ने की है।

गुरुवार, जून ११, २०२०

Breaking  News चाकूने वार करुन खुन; दोघांना अटक

Breaking News चाकूने वार करुन खुन; दोघांना अटक




चंद्रपूर / प्रतिनिधी
- शहरा जवळच्या म्हाडा कॉलोनी मध्ये 10 जूनच्या रात्री 10.30 ते 11 वाजताच्या सुमारास कॉलोनी मधील काही युवकांनी चाकूने हल्ला चढवीत निलेश गोटे या युवकाची त्याची हत्या केली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली. मुख्य आरोपी अंकित बंडु देहारकर व शुभम सुधाकर देहारकर अशी आरोपीची नावे आहेत.

निलेशवर चाकूने हल्ला होत असताना वडील यांनी हल्ला करणाऱ्या युवकाचा चेहरा बघितला. मृतक निलेशने श्वास सोडण्याआधी वडीलाला हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव सांगितले. त्याच्या मित्रांनी हल्ला केला, असे बयाण निलेशने दिले.

हल्ला करणारे 3 ते 4 युवक असल्याची माहिती मृतक निलेशच्या वडीलाने दिली. नेमका वाद कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट आहे. निलेशच्या अंगावर चाकूचे घाव होते, गळ्याला चाकूचा घाव सुद्धा होता. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व तपास केला.

पोस्टे रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ५१६/२०२०२ कलम ३०२,३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणातील मुख्य आरोपी अंकित बंडु देहारकर व शुभम सुधाकर देहारकर (रा. दाताळा नविन वस्ती चंद्रपुर) यांना 12 तासाच्या आत अटक करण्यात आली.

पोलिस उपनिनिरीक्षक संदिप कापडे, सफौ माहुलीकर, पोहवा परचाके, पोहवा काबळी , पोहवा पुठावार, नापोशि चिकाटे, नापोशि येरमे, पोशि जुमनाके, मपोशि भावना आणि गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

बुधवार, मे २७, २०२०

चंद्रपूरातील बेपत्ता व्यापा-याचा मृतदेह सापडला

चंद्रपूरातील बेपत्ता व्यापा-याचा मृतदेह सापडला




चंद्रपूर/ प्रतिनिधी
एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी हैराण असताना चंद्रपूर शहरातील मुख्य बाजारात दुकान असलेले एक व्यापारी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. आज दोन दिवसांनी नितीन गनशेट्टीवार (वय 43) या व्यापा-याचा मृतदेह सापडला.

गणपती मंदीर जवळ, बालाजी वार्ङ चंद्रपूर येथे राहणारे नितीन गनशेट्टीवार हे सोमवारी घराबाहेर गेले. मात्र, ते घरी परत आले नाहीत. सोमवारपासून बेपत्ता असून, त्यांची दुचाकी चौकात बेवारस सापङली. ते व्यापारी असून, त्यांचे मार्केटमध्ये दुकान आहे. पोलिसांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर लगतच्या ग्रामीण भागातील एका झाडाजवल मृतदेह सापडला. अधिक तपास सुरू आहे.

रविवार, मे २४, २०२०

विधवा महिलेचा नाॅयलान दोरीच्या साहाय्याने गळा आवरुन खून

विधवा महिलेचा नाॅयलान दोरीच्या साहाय्याने गळा आवरुन खून


नागभीङ/ (खबरबात):
तळोधी बा. तळोधी तालुक्यातील नांदेड येथे आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान नांदेड येथील मनोज विठोबा मेश्राम यांनी विधवा मंगला रमेश राऊत या महिलेसोबत भांडण करुन तिचा तिच्या राहत्या घरी नाँयलान दोरी साहाय्याने गळा दाबून खून केला.

आरोपी मनोज विठोबा मेश्राम हा नेहमी मृतक महिलेच्या घरी नेहमी जावून राहत होता .या विधवा महिलेसोबत आरोपीचे अनैतिक संबंध असल्याचे बोल्या जात होते. दोन दिवसापासून त्या महिलेसोबत आरोपी नेहमी झगडा करीत होता.
काल रात्री आरोपी महिलेच्या घरीच होता. सकाळी विधवा मृतक महिला मंगला रमेश राऊत सोबत भांडण झाल्याचे मृतकाच्या मुलीने ठानेदाराकडे माहिती दिली. तसेच मुलीला सुध्दा आरोपीने मारहाण करुन तिला जंगलात काड्या आणायला पाठविले व मृतक हिच्या सबोत पैशाच्या वादावरुन तिचा आज दुपारच्या दरम्यान राहत्या घरी गळा दाबून खून केला.
 तळोधी पोलिस स्टेशन ला माहिती मिळताच तळोधी पोलिस स्टेशन चे ठानेदार रोशन शिरसाठ व पी.एस.आय आकाश साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन वरील माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलिद शिंदे यांना सांगून ते सुध्दा घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यासाठी नागभीडला पाठविण्यात आले.
 मृतकाची सासु चंद्रकला लक्ष्मण राऊत यांनी तळोधी पोलिस स्टेशन येथे फिर्यादीवरुन आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत असून वृत्त लिहिपर्यत गुन्हा दाखल व्हायचा होता .
विधवा महिलेचा नाॅयलान दोरीच्या साहाय्याने गळा आवडून खून  murder women

विधवा महिलेचा नाॅयलान दोरीच्या साहाय्याने गळा आवडून खून murder women




नागभीङ/ प्रतिनिधी
तळोधी बा. तळोधी अप्पर तालुक्यातील नांदेड येथे आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान नांदेड येथील मनोज विठोबा मेश्राम यांनी विधवा मंगला रमेश राऊत या महिलेसोबत भांडण करुन तिचा तिच्या राहत्या घरी नाँयलान दोरी साहाय्याने गळा दाबून खून केला.

आरोपी मनोज विठोबा मेश्राम हा नेहमी मृतक महिलेच्या घरी नेहमी जावून राहत होता .या विधवा महिलेसोबत आरोपीचे अनैतिक संबंध असल्याचे बोल्या जात होते. दोन दिवसापासून त्या महिलेसोबत आरोपी नेहमी झगडा करीत होता.काल रात्री आरोपी महिलेच्या घरीच होता. सकाळी विधवा मृतक महिला मंगला रमेश राऊत सोबत भांडण झाल्याचे मृतकाच्या मुलीने ठानेदाराकडे माहिती दिली. तसेच मुलीला सुध्दा आरोपीने मारहाण करुन तिला जंगलात काड्या आणायला पाठविले व मृतक हिच्या सबोत पैशाच्या वादावरुन तिचा आज दुपारच्या दरम्यान राहत्या घरी गळा दाबून खून केला. तळोधी पोलिस स्टेशन ला माहिती मिळताच तळोधी पोलिस स्टेशन चे ठानेदार रोशन शिरसाठ व पी.एस.आय आकाश साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन वरील माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलिद शिंदे यांना सांगून ते सुध्दा घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यासाठी नागभीडला पाठविण्यात आले. मृतकाची सासु चंद्रकला लक्ष्मण राऊत यांनी तळोधी पोलिस स्टेशन येथे फिर्यादीवरुन आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत असून वृत्त लिहिपर्यत गुन्हा दाखल व्हायचा होता .

शनिवार, मे २३, २०२०

नेहमी वाद घालणाऱ्या पतीला पत्नीनेच संपविले

नेहमी वाद घालणाऱ्या पतीला पत्नीनेच संपविले





▪️🔳 आत्महत्या केल्याचे बनावट नाट्य अखेर उघडकीस

▪🔳 अखेर पत्नीला केली अटक

भद्रावती/शिरीष उगे
शहरातील किल्लावार्ड येथे राहणाऱ्या युवकाने गुरुवारला रात्रो बारा दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून ही हत्या की आत्महत्या याबाबत रहस्य असून पोलिसांनी मर्ग दाखल केला होता.
येथील गणेश उर्फ अतुल प्रभाकर वाटेकर वय 32 वर्ष राहणार भोजवार्ड असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून तो आपल्या आईवडिलांच्या शेजारी पत्नीसोबत राहात होता. घटनेच्या दिवशी पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते त्यात गणेश ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती शेजाऱ्यांना गणेश च्या पत्नीने दिल्ली शेजारी लोक बघण्यासाठी गेले असता गणेश चा मृतदेह बेडवर होता तर छताला निवड दोरी बांधलेली दिसली होती या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्याकरिता नेण्यात आले यादरम्यान मृतकाच्या गळ्याभोवती गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कोणतेही निशाण आढळून आले नसून शवविच्छेदनाचा पुढील वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच या घटनेचा उलगडा निघेल परंतु हा मृत्यू संशयित असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किनाके यांनी सांगितले.
मात्र या इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बतावणी पत्नीने केल्यानंतर आत्महत्याही संशयित असल्याने पोलिसांनी सखोल तपास केल्यावर आपणच पतीची हत्या केल्याचे पत्नीने कबूल केल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गटनेतआरोपीला अटक करण्यात आली आहे.
यातील प्रणाली गणेश वाटेकर वय २५ वर्ष राहणार किल्ला वार्ड असे आरोपी पत्नीचे नाव असून यातील गणेश उर्फ अतुल प्रभाकर वाटेकर असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी या दोघांचा विवाह झाला व त्यांना पंधरा महिन्याची मुलगी सुद्धा आहे. विवाहानंतर पती कमी शिकला व पत्नी जास्त शिकली यावरून तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत नेहमी वाद घालायचा. या दोन वर्षात ती कित्येकदा माहेरी सुद्धा गेली होती. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी गणेश च्या आई-वडिलांनी त्याला वेगळे राहण्यास सांगितले. तो त्याच परिसरात किरायाने राहत होता परंतु तिथे सुद्धा त्यांच्यात वाद व्हायचा दि. २१ रोजी गुरुवार ला रात्री बारा दरम्यान  प्रणाली ने आपल्या पती ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली या  घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मर्ग दाखल केला.  त्यानंतर  मयत गणेश चा लहान भाऊ हेमंत वाटेकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की  माझ्या भावाचा घातपात झाला आहे.  याआधारे त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा तसेच वैद्यकीय प्रथम अहवाल या आधारे प्रणालीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरूवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांनीच आत्महत्या केल्याची कबुली दिली. परंतू पोलीसी खाक्या दाखवताच आपणच नवर्‍याचे दोन्ही हात बांधून गड्यावर दुपट्टा ठेवून त्याच्या नाका-तोंडावर उशी ठेवून त्याचा श्वास रोखून ठार केल्याची कबुली दिली .आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनील सिंग पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा करीत आहे.




शनिवार, मे ०२, २०२०

पैनगंगा नदीत ६० वर्षीय महिलेचा मृत्यू

पैनगंगा नदीत ६० वर्षीय महिलेचा मृत्यू




गौतम धोटे/आवारपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील तालुक्यातील सांगोळा येथील पैनगंगा या नदिच्या पात्राच्या पलीकडे महीलेचा मृतदेह पडलेल्या अवस्थेतील दिसल्याने येथील मोठी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर माहिती आहे की, कोरपना तालुक्यातील सांगोळा/अंतरगाव येथे काल परवा ही महिला नागरिकांना दिसली आणी येथील काही मनमिळावू नागरिकांनी या महिलेला पाणी बिस्किटे दिल्याची चर्चा आहे पण ही दुसऱ्याच दिवशीच या सांगोळा पैनगंगा नदीच्या पात्रात (वणी तालुक्यातील सिरपूर पोलिस ठाण्यात अंतर्गत ही महिला असल्याने मृत्यू चे नेमके कारण समजू शकले नाही. पण वेळेवर पाणी /जेवणाची व्यवस्था झाली नसल्याने हा प्रकार घडला आहे .

रविवार, मार्च १५, २०२०

विहिरीत पडून गोवर्धन येथे मृत्यू

विहिरीत पडून गोवर्धन येथे मृत्यू

मूल / प्रतिनिधी
तालुक्यातील गोवर्धन येथील 55 वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून रात्री दहा चे सुमारास मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचे नाव मधुकर रामचंद्र जाधव वय 55 असे असून स्वतःच्या अंगावरील कपडे काढून शेजारीच असलेल्या विहिरीत पुढे घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. घटनास्थळावर मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस दाखल झाले असून, मृतदेहाला बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. मृत व्यक्तीच्या पत्नी या विद्यमान सरपंच असल्याचे कळते. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



बुधवार, मार्च ११, २०२०

चंद्रपूर: तो पाय गॅंग्रिन बाधित महिलेचा?

चंद्रपूर: तो पाय गॅंग्रिन बाधित महिलेचा?

 ऑर्थोपेडिक रुग्णालयाचा निष्काळजीपणा
 असू शकतो असा अंदाज  
चंद्रपूर/ललित लांजेवार:

सोमवारी तुकुम-दुर्गापूर रोडवरील लॉ-कॉलेज परिसरा जवळ झुडपातून महिलेचा गुडघ्यापासून खाली पायाचा भाग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.या घटनेनंतर चंद्रपुरात भीतीचे वातावरण तर तपास यंत्रणेची चांगलीच धांदल उडाली होती.



अर्धा कापलेला व जळालेल्या अवस्थेत पाय मिळाल्यानंतर त्या पायांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ऑर्थोपेडिक रुग्णालयात मोडलेला पाय आणि त्यामध्ये रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष याबद्दलची माहिती रामनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी खबरबातला दिली.

पोलीस निरीक्षक हाके यांनी सांगितले की,ऑर्थोपेडिक रुग्णालयात गॅंग्रिन व इतर आजारांमुळे एखाद्या रुग्णाला पाय कापावा लागला असेल व तो पाय नष्ट न करता रुग्णालय प्रशासनाच्या अलगर्जीपणामुळे तसाच झुडपी जंगलात फुकून देण्यात आला असावा,असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. याच सोबत पाय नष्ट करतांना रुग्णालय प्रशासनाला या बाबतचे प्रमाणपत्र देखील तयार करावे लागते. या बाबत अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 
अश्या आजाराचा पाय संपूर्णपणे नष्ट करावा लागतो मात्र या घटनेत तसे न करता त्या महिलेचा पाय झुडपात फेकून देण्याचा आला. यासंदर्भात त्या संबंधित रुग्णालयाचा शोध घेण्याचे काम रामनगर पोलिसांकडून करण्यात येत असून शहरातील संपूर्ण परिसरातील रुग्णालयांना या बाबतची माहिती पत्राद्वारे देण्यात येणार असून त्यांच्याकडून रीतसर माहिती मागविण्यात येणार असल्याची माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी दिली.

या संदर्भात प्राथमिक तपासात हा निष्काळजीपणा कोणत्या रुग्णालयाकडून करण्यात आला याची खात्रीशीर माहिती न मिळाल्याने कोणत्याच रुग्णालयावर बोट उचलू शकत नसल्याचे हाके यांनी सांगितले. 

परिसरामध्ये अधिक तपासानंतर तो पाय कापण्यात येणाऱ्या अवजारासोबत मासाचे तुकडे देखील सापडले होते.या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिसांकडून सुरु आहे. 

कोरडे आणि ओले गॅंग्रिनमधील महत्त्वाचा फरक म्हणजे कोरडा गॅंग्रिन हा थेरोस्क्लेरोसिस सारख्या परिस्थितीमुळे स्थानिक उतींना रक्तपुरवठा रोखण्याचा परिणाम आहे, तर ओले गॅंग्रिन संसर्गाचा परिणाम आहे.

रक्तपुरवठ्याअभावी शरीरातील एखादा भाग डेड होणे या सारख्या आजाराने होऊ शकते. ड्राय गॅंग्रिन आणि ओले गॅंग्रिन म्हणून गॅंग्रिनचे दोन प्रकार आहेत. ओला गॅंग्रिन तयार करणे किंवा ओले गॅंग्रिनमध्ये कोरड्या गॅंग्रिनचा विकास न केल्यास उपचार केले तर मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच, वैद्यकीय डॉक्टर सहसा गॅंग्रिन बाधित भाग कापून शरीरापासून काढून टाकण्याचे सुचवितात .असाच हा प्रकार झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

शनिवार, मार्च ०७, २०२०

 पोलिसाची पोलीस स्टेशनमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसाची पोलीस स्टेशनमध्येच गळफास घेऊन आत्महत्या


यवतमाळ:विशेष प्रतिनिधी:
शहर पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या
राजू खंडुजी उईके (55)असे हेडकॉन्स्टेबल चे नाव
गुन्हे शाखेत होते कार्यरत
कास्ट वैलिडिटी सब्मिट करण्याचे आदेश 
रात्री मेन लाईनमध्ये पेट्रोलिंग करून बजावले कर्तव्य
कर्तव्य संपल्यानंतर
पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी केली आत्महत्या 
मृत्यूपूर्व चिठ्ठी ही ठेवलेली होती लिहून
Image result for yavatmal city police station
आपण अतिरिक्त होणार आणि आपली नोकरी जाणार या भीती पोटी व आजारामुळे त्रस्त असल्याचे मृत्यूपूर्व चिठ्ठी मध्ये लिखाण.


शुक्रवार, मार्च ०६, २०२०

ट्रकची ऑटोला जबर धडक -  6 जखमी

ट्रकची ऑटोला जबर धडक - 6 जखमी



बाजारगाव पंजारा घाटातील घटना


बाजारगाव /प्रतिनिधी
येथून 15 की मी अंतरावरील बाजारगाव पांजारा घाटात आज दुपारी 3 वाजता अनियंत्रित ट्रॅक ने समोरून येणारया याटोला जबर धडक दिली असता याटोचालक लक्षमण गोमाजी टेकाम 45 रा पांजरा पठार हा गंभीर जखमी झाला तर 5 जखमी झाले
प्राप्त माहितीवरून बाजारगाव येथून येरण गाव येथे याटोने प्रवाशी नेत असताना आज दुपारी 3 वाजता जात असताना पांजरा घाटात समोरून येत असलेला अनियंत्रित ट्रक CG 04 G 8885 ने याटो क्र MH 40 P 2118 ला जबर धडक दिली असता यातील याटो चालक गंभीर जखमी झाला असून त्यातील प्रवाशी आशाबाई डोंगरे 30 रा चिंचोली जगदीश राठोड 50 रा आगरगाव तांडा अनिल आडे 40 रा वंडली शारदा आडे 35 रा वंडली खेमचंद आडे हा दीड वार्ष चा मुलगा घमभिर जखमी झाले यांना लगेच खाजगी वाहनाने कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्याकरिता आणले असता येथील वैदयकीय अधिकारी dr बिलाल पठाण यांनी प्राथमिक उपचार करून गंभीर 6 साही जखमी प्रवाशांना उपचाराकरिता नागपूर शाशकीय रुग्णालयात पाठविण्यात आले घटनेची माहिती कोंढाळी पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस उपनिरीक्षक राम ढगे यांनी घटना पंचनाम करून ट्रक ड्रायवर नितीन तुकाराम मनोके रा पुसला जि अमरावती 38 यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे

शुक्रवार, जानेवारी १०, २०२०

महिलेच्या डोक्यात दगड घालून सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंबावली

महिलेच्या डोक्यात दगड घालून सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंबावली




येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: तालुक्यातील धामणगाव येथील महिलेच्या डोक्यात दगड घालून सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लांबवली
आज भर दुपारच्या सुमारास धामणगाव ता येवला येथील जगताप वस्तीवर दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसम आले चंद्रकला बबन जगताप आपल्या शेतात कांदे कापत असताना दोन्ही अज्ञातांनी सदर महिलेकडे कांद्याचे रोप आहे का अशी विचारणा केली असता सदर महिलेने नकार दिल्याने एकाने चंद्रकला जगताप यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिस्कावली त्याच क्षणी सदर महिलेने प्रतिकार करताच चोरट्यांनी त्या महिलेच्या डोक्यात दगड घालून जबर जखमी केले आणि सोन्याची पोत घेऊन चोरटे पसार झाले सदर जखमी महिलेवर येवला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या बाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे

गुरुवार, डिसेंबर १९, २०१९

दोन वेगवेगळया कार्यवाहीत १३६००० रुपयांचा दारू साठा जप्त #

दोन वेगवेगळया कार्यवाहीत १३६००० रुपयांचा दारू साठा जप्त #




सिंदेवाही पोलिसांची कार्यवाही
       
सिंदेवाही- सिंदेवाही पोलिसांना मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून (मोहाळी) जामसाळा मौजा बस स्टॉप गावाजवळील माता मंदिर जवळ नाकेबंदी केली असता या नाकेबंदी दरम्यान वासेरा गावाकडून येत असलेल्या बिना नंबर प्लेट मोटर सायकलला थांबवुन चौकशी केली असता त्या मोटर सायकलवर मागच्या सिट वर बसलेल्या इसमाच्या हातात पंढ-या रंगाच्या चूंगळीमध्ये ४ कॅन मोहा दारू १० ली. प्रमाणे ४ कँन मधील अशी एकुण चाळीस लिटर दारू दिसून आली व सोबत दुचाकी वाहन एकूण किंमत ६८ हजार रुपये आहे. 
आकाश चंदू राखडे- वय 26 रा.शिवणी ता. सिंदेवाही, मच्छिंद्र हरिदास अलोणे वय - 26 रा. शिवणी ता. सिंदेवाही असे आरोपींचे नाव असुन दोन्ही आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
तसेच त्याच ठिकाणी त्याच नाकेबंदी दरम्यान समोरून येत असलेली MH-34 3651 या नंबरचे दुचाकी वाहन थाबंवुन चौकशी केली असता चार प्लास्टिक डपक्या  मोहा- दारू व दुचाकी वाहन असा एकूण - ६८ हजार रुपये आहे.
कैलास घरत  रा.शिवणी ता. सिंदेवाही, किसन गोमाजी घरत वय -५९ रा.शिवणी ता. सिंदेवाही असे असे आरोपींचे नाव असुन दोन्ही आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही कार्यवाहीतील चारही आरोपींवर कलम ६५ (ई)  म.दा.का, ६५ (अ) ८३ म.दा.का नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सिंदेवाही पोलीस स्टेशन ठाणेदार निशिकांत रामटेके साहेब यांच्या मार्गदर्शनात पीएसआय  नेरकर, दामोधर परचाके, ईश्वर लेनगुरे, ज्ञानेश्वर डोकळे, गणेश मेश्राम, मंगेश मातेरे यांनी केली आहे.

शुक्रवार, डिसेंबर १३, २०१९

अवैध रेती भरलेली टँक्टर तहसीलमध्ये जप्त

अवैध रेती भरलेली टँक्टर तहसीलमध्ये जप्त




सिंदेवाही - -:  सिंदेवाही शहरातिल मुख्य मार्गाने 11 डीसेबरला पहाटे ४ -२० मि. वाजाता च्या दरम्यान  रेती भरलेला टँक्टर सिंदेवाही-शहराच्या मछ्चि गुजरी समोरील मुख्य मार्गा वरून येतांना दिसला  असता सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे  यांनी  टँक्टर थांबवून  रेती भरलेला   टँक्टर  ची चौकशी केली असता त्यात अवैध रेती वाहतूक करीत असलेल्या टँक्टर पकडला व पकडून  सिंदेवाहीकडे रवाना केला. सदर रेती भरलेली ट्रक्टर तहसिल चे आवारात  जमा आहे. तहसिलदार गणेश जगदाळे  यांनी जप्तीची कारवाई केली आहे. 
 टँक्टर क्र.–MH-34  BF- 3454 असा असून  टँक्टर मालक -  संदीप नारायण भरडकर यांचा असल्याचे तहसील कार्यालय सिंदेवाही यांनी  सांगितले. पुढील  सदर रेती भरलेले टँक्टर  वर १ लाख ८ हजार  ४०० रुपये असा दंड ठोकला .दंडात्मक कारवाई केली असून असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी चिमूर (SDM )  यांच्याकडे पाठवण्यात आले आहे .असे माहिती सिंदेवाही तहसीलदार  यांनी सांगितले आहे.