Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २०, २०२०

भरदिवासा गोळीबाराने कळमेश्वर हादरले..! #kalmeshwar #firing



पति पत्नी वर गोळीबार
गुन्हेगार क्षेत्रातील दोन टोळ्यांचा संघर्ष शिगेला
आपसी वादाचा संशय


नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात लोहकरे लेआऊट येथे विवाहित दाम्पत्यावर भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली या घटनेमध्ये गणेश सुधाकर मेश्राम वय 32 व त्याची पत्नी प्रियंका गणेश मेश्राम वय 28 दोघेही राहणार जयताळा नागपूर हल्ली मुक्काम लोहकरे लेआऊट कळमेश्वर झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालय नागपूर येथे हलविण्यात आले आहे
या घटनेमुळे कळमेश्वर शहरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश मेश्राम वय 32. त्याची पत्नी प्रियंका गणेश मेश्राम वय 28 व त्यांचा एक 5 वर्षीय मुलगा आरव (मूळ रहिवासी जयताळा नागपूर)मागील दोन वर्षापासून कळमेश्वर येथील लोहकरे ले-आऊट येथील सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने दुसऱ्या माळ्यावर राहत होते गणेश मेश्राम हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असल्याचे बोलले जात आहे व त्याच्यावर नागपूर येथील पोलीस स्टेशनला विविध प्रकारचे गुन्हे सुद्धा दाखल आहे घटनेच्या दिवशी सात आठ तरुण तोंडाला काळे कपडे बांधून एका चार चाकी गाडीतून आले व तो राहात असलेल्या घरमालकाच्या घरी जाऊन दारात उभ्या असलेल्या सुधाकर खाडे यांच्या सुनेला त्यांनी न विचारता प्रवेश केल्याने त्या महिलेने त्यांना हटकले असता तिच्या कपाळावर बंदूक ठेवून तिला धमकी दिली यातच तिने ओरडून दरवाजे बंद केले नंतर गणेश मेश्राम हा राहत असलेल्या दुसऱ्या माळ्यावर ते तरुण गेले त्यांनी घरात घुसून जखमी गणेशच्या पाठीवर तर त्याची पत्नी प्रियांका हीच्या पोटावर गोळया झाडल्या गोळी झाडताच जखमी गणेश वरून शेजार्‍याच्या घरी उडी घेऊन पळाला गोळ्या झाडल्या नंतर सर्व हल्लेखोर चारचाकी गाडीने पळून गेले हा सर्व प्रकार एकमेकांविरुद्ध गॅंगवॉर च्या माध्यमातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे जखमी गणेशही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती असून त्याच्यावर नागपूर पोलीस दलामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली जखमींवर कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपुर येथे हलविन्यात आले आहे. गोळीबाराच कारण अद्याप कळू शकलेले नाही.झालेल्या गोळीबाराचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या घरातील रहिवासी बाहेर निघाले व आरडाओरड सुरू केली गर्दी जमत असल्याने आरोपींनी तेथून पळ काढला सदर घटना अवैध धंद्याच्या वर्चस्वाच्या लढाई वतून झाली असल्याचे बोलले जात आहे सदर घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनीका राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, कळमेश्वर पोलीस निरीक्षक मारुती मुळूक स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळावरील दोन रिकामे काडतूस, रक्ताचे नमुने आधी साहित्य जप्त करून तपास सुरु केला आहे वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.



झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये कळमेश्वर शहरातील एका व्यक्तीने आरोपींना जखमी गणेश चे घर दाखविल्याची माहिती असून आरोपी नागपूर परिसरातील जयताळा या भागातील असल्याचे विश्‍वसनीय वृत्त प्राप्त झाले आहे. दरम्यान नागपूर शहरातील अनेक तडीपार गुंड प्रवृत्तीचे काही तरुण कळमेश्वर शहर परिसरात विनापरवानगी ने राहुन कळमेश्वर तालुक्यात अवैध धंदे करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे हे विशेष.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.