Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सातारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सातारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जानेवारी ०८, २०२२

 मराठ्यांची राजधानी साताऱ्याचा देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे होणार गौरव #Satara

मराठ्यांची राजधानी साताऱ्याचा देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे होणार गौरव #Satara


साताऱ्याचा गाैरव : नवी दिल्लीत 26 जानेवारीच्या परेडमध्ये कास पठारचा चित्ररथ

सातारा | नवी दिल्ली येथे 26 जानेवारीसाठी परेडमध्ये चित्र रथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथावर कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरणार आहे.

प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथील परेडमध्ये प्रत्येक राज्याचे चित्ररथ असतात. या चित्ररथामधून प्रत्येक राज्य आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असते. यंदा दिल्ली येथे होणार्‍या परेडमध्ये राज्याची समृद्ध जैवविविधता दाखवणे या उद्देशाने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. मुख्य मॉडेल कास पठाराचे असेल जे चित्ररथाच्या अग्रभागी मध्यभागी ठेवले जाईल.

कास पठाराला फुलांची व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम घाटावरील जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणून 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को)ने जागतिक नैसर्गिक वारसास्थळ घोषित केले होते. हे विविध प्रकारच्या हंगामी वन्य फुलांसाठी आणि स्थानिक फुलपाखरांच्या प्रजातींसाठी ओळखले जाते. कास पठार 10 चौरस किमी परिसरात पसरलेले आहे. फुलांच्या 850 पेक्षा जास्त प्रजाती या पठारावर आढळून येतात. ज्यात ऑर्किड, झुडूप आणि मांसाहारी वनस्पतींचा समावेश आहे. त्यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे.




कास पठारा प्रमाणेच मालढोक पक्षी, ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि खेकड्याच्या नवीन शोधलेल्या प्रजातींचे मॉडेल देखील असणार आहेत. याशिवाय वाघ, फ्लेमिंगो, मासे, गिधाड आणि घुबडाचे मॉडेल असणार आहेत. शेकरू हा राज्यप्राणी तर हरियाल हा कबूतर राज्यपक्षी आहे. ‘ब्लू मॉर्मन’ हे राज्य फुलपाखरू असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्याच्या चित्ररथात फुलपाखराचे आठ फूट उंच आणि सहा फूट रुंद मॉडेल असेल. मॉडेल घेऊन जाणार्‍या स्टेजला जारुल आणि ताम्हण या राज्य फुलांनी सुशोभित केले जाणार आहे.

सोमवार, सप्टेंबर १४, २०२०

श्रीमंत छत्रपती चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

श्रीमंत छत्रपती चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे प्रदीर्घ आजाराने निधन




राज्यसभेचे खासदार राजे उदयनराजे भोसले यांचे
काका माजी नगराध्यक्ष श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी श्री. छ. चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सातारा येथील अदालत राजवाडा येथे त्यांचे वास्तव्य होते.
सातारा शहरातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग होता, आमचे काका माजी नगराध्यक्ष श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी आमच्या काकी श्री. छ. चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सातारा येथील अदालत राजवाडा येथे त्यांचे वास्तव्य होते.

मंगळवार, एप्रिल ०७, २०२०

मायणी ग्रामपंचायतकडून आता कडक सुरक्षा

मायणी ग्रामपंचायतकडून आता कडक सुरक्षा



मायणी ता. खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे)
मायणी ग्रामपंचायत वतीने कोरोना विषाणूच्या विरोधात सुरुवातीपासून पाउले उचलली असली तरी अद्यापही दहा टक्के लोक बेफिकीर राहत असल्याने व आरोग्याची काळजी घेत नसल्याने मायनी ग्रामपंचायती च्या वतीने आता कडक सुरक्षा जारी करणार आहे अशी माहिती युवा नेते सचिन गुदगे यांनी दिली याचा एक भाग म्हणून संपूर्ण गावात परगावी असणारे बरेच लोक गावात आले आहेत अनेकजण भयभीत झाले आहेत तर अनेक जण बेफिकीर रस्त्यावर फिरत आहेत त्यासाठी पुन्हा एकदा सोडियम हैपो क्लोराईड फरून संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे अनेक संशयित रात्रीच्या वेळी परगावाहून येत आहेत त्यांच्यावर करडी नजर ग्रामपंचायत सदस्य व गावातील पोलीस पाटील व सामाजिक संस्था पोलीस मित्र व पोलीस आधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून त्याची माहिती घेऊन त्यांना लगेच मेडिकल टेस्ट साठी दवाखान्यात पाठवली जात आहे तसेच भाजीपाला फळे विक्रीसाठी दररोजची मंडई बंद केली असून भाजीपाला फळे विक्रेत्यांना पोलीस स्टेशनच्या मदतीने फिरून फळे भाजीपाला विक्रीस परवानगी दिली आहे अत्यावश्यक सेवा मेडिकल किराणा यांच्यासाठी दुकानाबाहेर तीन फूट अंतरावर चौकोन तयार करून वितरण व्यवस्था सुरू केली आहे तसेच एखाद्या दुकानदाराला याचा फायदा घेऊन चढ्या दराने विक्री करीत असेल तर ते दुकान कायमचे बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे विनाकारण गाडीवर फिरणाऱ्या ना आदल घडावी म्हणून त्यांच्या गाडी पोलिसांच्या मदतीने जप्त करण्यात येत आहेत तसेच रेशन दुकानदारावर करडी नजर ठेवली असून जर तक्रार असेल आणि त्यात तथ्य असेल तर दुकानदारांचे परवाने रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांना कळविण्यात येईल प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी आपापला प्रभाग मध्ये लक्ष ठेवून त्यांना योग्यती मदत पुरवण्याचे असून तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आव्हान युवा नेते सचिन गुदगे यांनी केली आहे.

शुक्रवार, एप्रिल ०३, २०२०

ज्योतिष शास्त्रातील सर्व उत्कृष्ट कार्याबद्दल अॅड. श्रीराम देव सन्मानित

ज्योतिष शास्त्रातील सर्व उत्कृष्ट कार्याबद्दल अॅड. श्रीराम देव सन्मानित





मायणी ता.खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे)
ज्योतिषशास्त्र हे प्राचीन शास्त्र असले तरी ते खगोलशास्त्र अश्नात्म.एशास्त्र विज्ञान यांच्याशी त्याची सांगड आहे सध्याच्या काळात विवाह जमणे अवघड आणि जमलंच तो टिकणे फार अवघड सध्या न्यायालयात अनेक घटस्फोटांची प्रकरणी निलंबित आहेत पूर्वीपेक्षा जास्त प्रकरणाची संख्या प्रत्येक पटीने वाढली आहे यासाठी प्रथम सल्ला मार्गदर्शन व नंतर समुपदेशन या समुपदेशनाने अनेकांचे संसार पुन्हा उभारा राहिले आहे ॲड. डॉ. श्रीराम भालचंद्र देव यांनी न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर सल्ला मार्गदर्शन व नंतर समुपदेशन करून विनामूल्य सेवा गेली पंचवीस वर्षे देत आहेत याबद्दल भागवत गीता अभ्यासक श्री पारेकर शास्त्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रख्यात ज्योतिषी विजय जकातदार यांच्या हस्ते व ग्राहसंकेत विद्यालयाचे प्राचार्य श्री श्रीधर कुलकर्णी यांच्या समवेत अँड. श्रीराम देव यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी भगवद्गीता अभ्यासक ला.कु. पारेकर शास्त्री बहुमानाची भास्कर आदित्य ही पदवी सदरच्या विद्यालया कडून बहाल करण्यात आली याप्रसंगी ज्योतिष अभ्यासक सौ आरती अमर घाटपांडे, श्री नंदकुमार जोशी खटाव ,प्रध्यापक दिलीप पुस्तके मयुरेश रिसबूड, अनिरुद्ध जेरे, तसेच ग्रहा संकेत विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते शेवटी नंदकुमार जोशी यांनी आभार मानले

बुधवार, एप्रिल ०१, २०२०

कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होळीचागाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होळीचागाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम





होळीचे गाव येथे सायकल वरून कोरणा संदर्भात जनजागृती करताना ग्रामपंचायत शिपाई मारुती होवाळे.

कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायकल वरून जनजागृती

मायणी,ःता.खटाव.जि.सातारा(सतीश डोंगरे)
संपूर्ण देशामध्ये वेगाने व्हायरल होत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश पातळीवरून राज्य पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत तसेच शहरी भागातील लोकांची खेड्याकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे गावातील ग्रामपंचायत चे काम वाढल्याचे दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या मार्फत विविध योजना राबवून कोरानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहेत
यातच होळीच्या गाव येथील ग्रामपंचायत मार्फत जनजागृती करण्यासाठी सायकलवर स्पीकर ठेवून जनजागृतीचे काम करण्याचे सुरु केले आहे यामध्ये गावातील ग्रामपंचायत मधील शिपाई सायकलवर छोटा स्पीकर ठेवून संपूर्ण गावामध्ये फेरी मारून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे यावेळी या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात येत आहे की घाबरून जाऊ नये याची काळजी घ्यावी जे लोक आले आहेत त्यांनी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी तसेच गावातील लोकांना सहकार्य करावे विनाकारण गर्दी करून थांबू नये घरांमध्ये रहावे अशा प्रकारचे आव्हान ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे. 

मंगळवार, मार्च ३१, २०२०

खटाव तालुका निर्जंतुकीकरणासाठी घेतला पुढाकार

खटाव तालुका निर्जंतुकीकरणासाठी घेतला पुढाकार



माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी खटाव तालुक्यातील प्रत्येक गावास देणार मोफत सोडियम हायड्रोक्लोराइड


मायणी :- ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)

गेल्या काही दिवसापासून कोरोना व्हायरसपासून देशभरात झालेली परिस्थिती पाहता खटाव तालुक्यातील नोकरी व्यवसायानिमित्त नोकरी व्यवसायानिमित्त परगावी असणारे बरेच लोक भयभीत होऊन पुन्हा आपल्या गावी आली आहेत . त्यातील बरेच जण गावच्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत. यामुळे प्रत्येक गावांची सार्वजनिक ठिकाणी व रस्ते यांचे निर्जंतुकीकरण करण्याची गरज आहे . यासाठी खटाव माण अँग्रोचे चेअरमन,माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी पुढाकार घेऊन खटाव तालुक्यातील प्रत्येक गावाला प्रथम फवारणीसाठी लागणारे सोडियम हायड्रोक्लोराइड मोफत देण्याचे जाहीर केले आहे.

त्याच बरोबर सातारा येथील कूपर उद्योग सोशल फाउंडेशन तर्फे तालुक्यातील प्रमुख गावांनाफवारणीचे वाहन व इतर साहित्य देण्यात येणार आहे.

याची सुरुवात आज हिंगणे ता-खटाव, वडूज शहरातून करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे,वडूज नगरीचे नगराध्यक्ष सुनील गोडसे, माजी नगराध्यक्षा सौ.शोभा माळी , नगरसेविका सौ.सुवर्णा चव्हाण, सौ सुनीता कुंभार ,सौ काजल वाघमारे, नगरसेवक विपुल गोडसे ,स्विकृत नगरसेवक संदीप गोडसे, माजी स्वि.नगरसेवक अभय देशमुख,युवा नेते सचिन माळी ,राजेंद्र चव्हाण राजू कुंभार, अमोल वाघमारे तानाजी पवार ,जितेंद्र गोडसे,महेश घार्गे,व्यंकटेश शेठ,खाडे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले,संपूर्ण देशात सध्या कोरोना व्हायरसमूळे भीतीचे वातावरण आहे . परंतु नागरिकांनी आरोग्य विभागाने सांगितलेल्या उपाययोजना योग्य प्रमाणे पाळल्यास या व्हायरस पासून आपण मुक्त होऊ. तसेच खटाव तालुक्‍यातील असणारी सर्व गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणारे सोडियम हायड्रोक्लोराइड मोफत देण्याचे ठरवले आहे. याच बरोबर नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे कूपर उद्योग  फाऊंडेशनच्या माध्यमातून काही प्रमुख गावांना फवारणी करण्यासाठी लागणारे वाहन व इतर साहित्य उपलब्ध करून देणार आहेत.

                  
  संपूर्ण खटाव तालुक्यातील कोरोना व्हायरसशी दोन हात करण्याकामी  तहसीलदार अर्चना पाटील यांना दिलेल्या निवेदनात गावोगावचे ग्रामसेवक,मंडल अधिकारी,तलाठी,पोलीस पाटील,कोतवाल यांना  गावोगावचा परिसर निर्जंतुकीकरण कारण्याकामी सहकार्य करण्यास आपण आदेश करून या गंभीर परिस्थितीशी लढण्यास व सहकार्य करण्यास वचनबद्ध असल्याचे प्रभाकर घार्गे यांनी म्हंटले आह

सोमवार, मार्च १६, २०२०

महिला ज्योतिष 2020 पुरस्काराने पद्मा कासट सन्मानित

महिला ज्योतिष 2020 पुरस्काराने पद्मा कासट सन्मानित



मायणी. ता.खटाव.जि.सातारा
गुरुकुल ज्योतिष विद्यापीठ पुणे व संजीवनी ज्योतिष प्रशांत प्रशासक मंडळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने यंदाचा महिला ज्योतिष पुरस्कार 2020 सातारा येथील ख्यातनाम ज्योती शिक्षिका सौ पदमा जगदीश कासट यांना नुकताच जाहीर झाला व महिला दिनानिमित्त देण्यात आलेल्या महिला अधिवेशनात श्री माननीय नंदकुमार जोशी, डॉक्टर मालती शर्मा ,संजीवनी ज्योतिष मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात सौ.पदमा कासट यांनी 1992 -93 मध्ये व दा भट यांच्या ज्योतीस विद्यापीठातून विशारद परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सण 1993 94 महाराष्ट्र ज्योतिष मंडळ डोंबिवली येथून शास्त्री परीक्षा विशेष श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण 1996 97 मध्ये राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनात सक्रिय सहभाग भालचंद्र ज्योतिष विद्यापीठ पुणे मार्फत आदर्श ज्योतीष शिक्षिका पुरस्कार 2018 मध्ये झालेल्या अधिवेशनात गौरव पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय ज्योतिष विद्यापीठातर्फे ज्योतिष पुरस्कार सतत पंचवीस वर्षे सातारा ज्योतिष मंडळामार्फत सुरू असलेल्या वर्गासाठी मार्गदर्शन तसेच ज्योतिष शास्त्र सोबत जातकास समुपदेशन गरज आहे समुपदेशनामुळे अनेक तुटणारे संसार पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले आहेत पुरुषापेक्षा महिलांच्या समस्या वेगळ्या असतात त्या जाणून त्यावर संशोधन सल्ला मार्गदर्शन व समुपदेशन करून अनेकांचे संसार पुन्हा उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या या यशाचे सातारा ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य रमणलाल शहा संचालक गोविंद कोष्टी सपना पवार सचिव श्री राम देव, पत्रकार दिलीप पुस्तके सहसचिव महेश कुलकर्णी डॉक्टर रमेश दर्भे महेश जोशी डॉक्टर विकास खिलारे यांनी अभिनंदन केले.

शुक्रवार, मार्च १३, २०२०

अतिरेक्यांशी झुंजणारे मारोती फड यांना राज्यस्तरीय शौर्यरत्न पुरस्काराने सन्मानित

अतिरेक्यांशी झुंजणारे मारोती फड यांना राज्यस्तरीय शौर्यरत्न पुरस्काराने सन्मानित




परळीच्या सुपुत्राला लातूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव

पुरस्कार माझी नैतिक जबाबदारी वाढविणारा - मारोती फड


सातारा (प्रतिनिधी) :- मुंबई 26/11 अतिरेकी हल्ल्यातील मुख्य सुत्रधाराशी प्रत्यक्ष झुंजणारे व सध्या सहकार आणि पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे स्विय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले मारोती फड यांना आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय "आदर्श शौर्यरत्न" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लातूर येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात मारोती फड यांना सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी करून परळीचे नाव उंचावल्याबद्दल शौर्यरत्न पुरस्कार प्राप्त मारोती फड यांच्यावर महाराष्ट्रभरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्काराचा मी निमित्य मात्र असुन. हा पुरस्कार नैतिक जबाबदारी वाढविणारा आणि उल्लेखनीय काम करण्याची ऊर्जा मिळवून देणारा असल्याचे मत फड यांनी व्यक्त केले.

लातुर येथील आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने दयानंद सभागृह लातूर येथे नुकताच पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण व संस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित देशमुख तसेच कार्यक्रमास पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, लातूर महानगरपालिका महापौर विक्रांत गोजमगुंडे आदींची उपस्थिती होती. दिमाखदार सोहळ्यात मारोती फड यांना राज्यस्तरीय शौर्यरत्न पुरस्कार सन्मानचिन्ह , सन्मान पत्र देऊन सन्मानित करून कार्याचे कौतुक करण्यात आले. आपण धर्मापुरी, ता. परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे प्रतिकुल परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केले. मुंबई येथे वाहनचालक म्हणून नौकरी करत असताना २६/११ च्या हल्ल्यात अचानक समोर आलेल्या अतिरेक्याशी शौर्याने मुकाबला करण्याचे धाडस आपण दाखवले. अतिरेक्यासोबत झालेल्या झटापटीत बंदुकीच्या गोळ्यांनी उजव्या हाताची बोटे गमावली, कमरेमध्ये गोळ्या लागल्या, पण आपण डगमगला नाहीत. आपल्याच मुख्य साक्षीने अजमल कसाबला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवले. आपल्या प्रसंगावधानाने व अलौकिक शौर्याने आपण देशभक्तीचा आदर्श समाजासमोर ठेवला. मराठवाडा आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे आपले शौर्य आहे. येणा-या पिढयांना आपल्या कर्तृत्वाचा दीपस्तंभ मार्गदर्शक ठरेल असेच आपले आजवरचे कार्य आहे. आपल्या कार्याला आदर्श मैत्री फाऊंडेशनचा मानाचा मुजरा! आपणास पुढील वाटचालीस व नियोजित कार्यास गती प्राप्त होवो व दीर्घ आयुष्य लाभो, यासाठी आम्ही सदिच्छा व्यक्त करून आपणास हे 'आदर्श शौर्यरत्न सन्मानपत्र' आदर आणि कृतज्ञापूर्वक प्रदान करत आहोत. अशा आशयाचे गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
आपल्या कार्याचा गौरव म्हणुन आपल्याला ‘राज्यस्तरीय शौर्यरत्न पुरस्कार' प्रदान करताना आम्हाला आनंद होत असल्याचे म्हटले आहे. मारोती फड हे परळी यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय सेवेत रुजू झाले. वैद्यकीय क्षेत्रात वाहनचालक या पदावर काम करीत असतांना वैद्यकीय सचिव यांचे ते वाहन चालक होते. मारोती फड 26,/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात तीन गोळ्या लागून जखमी झाले. फड हे या थराराचे साक्षीदार असुन अतिरेक्यांच्या तीन गोळ्या लागुन मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले. अतिरिक्यांशी धाडसाने तोंड दिलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे वाहनचालक असुनही धैर्याने तोंड दिले. मारोती फड हे सध्या ना. बाळासाहेब पाटील, मंत्री, सहकार, पणन तथा पालकमंत्री, सातारा यांचे स्वीय सहायकपदी कार्यरत आहेत. लातूर येथील आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष सतिष बिराजदार यांनी शौर्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. दरम्यान ना. देशमुख म्हणाले की, देशसेवा करणाऱ्या मारोती फड यांचा देश पातळीवर सन्मान होईल व राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी शिफारस लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ना. बनसोडे म्हणाले की, फड माझे चांगले मित्र आहेत. मुंबईत मी कार्यकर्ता असल्यापासून त्यांनी खुप मदत केली आहे. व गोरगरिबांना सतत मदत करत असतात असे ते म्हणाले.
           यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना मारोती फड म्हणाले की, या पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी व काम करण्याची नैतिक जबाबदारी वाढली आहे. हा पुरस्कार माझा उत्साह वाढविणारा आहे. मला सकारात्मक ऊर्जा देत माझी प्रेरणा वाढवीत आहेत. या  पुरस्काराने आनंद द्विगुणित केला आहे. माझ्या कार्याची दखल घेवून आदर्श फाऊंडेशनचे सतिष बिराजदार यांनी मला सन्मानित केले.  ही माझ्यासाठी प्रेरणा असून, भविष्यकाळात सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील आणखी जोमाने काम करण्याची उर्जा मला मिळाली आहे असे मत फड यांनी व्यक्त केले. पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी बीड व लातूर जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने सभागृह फुलून गेले होते. शौर्यरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल फड यांचे ना.बाळासाहेब पाटील यांच्यासह मोटेगावकर व विविध क्षेत्रातील उद्योजक तसेच  बीड, परळी तालुक्यातील शासकीय, पत्रकार,  क्रिडाप्रेमी, शैक्षणीक, सामाजिक, राजकीय व शेतकरी बांधव तथा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून मारोती फड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

रविवार, मार्च ०१, २०२०

श्री सद्गुरु यशवंतबाबा महाराज यांच्या चांदीच्या नवीन मुखवटाची पालखीतून भव्य मिरवणूक

श्री सद्गुरु यशवंतबाबा महाराज यांच्या चांदीच्या नवीन मुखवटाची पालखीतून भव्य मिरवणूक




यशवंत नाम घेता| हरे संसाराची चिंता ||
म्हणऊनीया शरणांगत|आम्ही विठोबाचे दूत||
दैन्य दुःख सोडविले|निजवर्म दाखविले||
दास म्हणे यशवंत| जगामाजी कीर्तिवंत||




मायणी. ता.खटाव जि.सातारा.(सतीश डोंगरे)
मायणी व मायणी परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांच्या भाविक भक्तांनी महाराजांच्या पालखी मध्ये ठेवण्यासाठी श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराजांचा चांदीचा मुखवटा बनवून दिला आहे त्याची पालखीतून भव्य मिरवणूक गुरुवार दिनांक ५.३.२०२० रोजी सायंकाळी चार वाजता ब्राह्मण विठोबा मंदिरापासून ते श्री सद्गुरु यशवंत बाबा समाधी स्थळापर्यंत श्री पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी तालुका तासगाव जिल्हा सांगली तसेच संत सावतामाळी तरुण भजनी मंडळ माळीनगर(मायणी) व मायणी परिसरातील सर्व भजनी मंडळाच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी असे आव्हान श्री सद्गुरु यशवंत बाबा भजनी मंडळ मायणी यांनी केले आहे
दुष्काळी भागातील महत्वाकांक्षी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विध्यार्थ्यांना मोठे कुतूहल

दुष्काळी भागातील महत्वाकांक्षी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विध्यार्थ्यांना मोठे कुतूहल




खटाव माण अँग्रो येथे अभ्यास सहलीमार्फत गावोगावचे विद्यार्थी घेऊ लागले औद्योगिककरणाचे धडे

मायणी :-ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)

खटाव माण तालुका अँग्रो. पडळ कारखान्यास सातारा जिल्ह्यातील विविध गावाच्या शाळा अभ्यास सहलींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भेटी देत आहेत . या अभ्यास सहलीत औद्यागिकीकरणाचे धडे घेताना दुष्काळी भागातील महत्वाकांक्षी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विध्यार्थ्यांना  मोठे कुतूहल व आनंद व्यक्त होताना दिसून येत आहे . 

                    सध्याच्या शिक्षण प्रणाली मध्ये परिसर अभ्यास , भूगोल या विषयातून विध्यार्थी - विद्यार्थिनी उद्योग, दळणवळण, नद्या, संपर्क साधने, हवामान, नकाशा आदी घटकांची माहिती मिळवत असतात. पण पुस्तकात दिलेली उद्योग व कारखान्यांची माहिती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देऊन पूर्वज्ञानाची सांगड घालण्यासाठी आजवर भारतमाता ज्युनिअर कॉलेज, कला वाणिज्य महाविद्यालय मायणी ,जि. प. शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालय ,एनकुळ,जि.प. शाळा पडळ, दातेवाडी, कणसेवाडी,कलेढोण,गारळेवाडी,कानकात्रे, च्या विद्यार्थ्यांनी तसेच  रिद्धी-सिद्धी महिला बचत गट धोंडेवाडी यांनी  खटाव माण तालुका अँग्रो साखर कारखान्याची क्षेत्रभेटीसाठी निवड केली. 

        याठिकाणी  विद्यार्थ्यांनी औद्योगिकीकरणाचे धडे घेत ,आपल्या रोजच्या आहारात विविध पदार्थांमध्ये आवश्यक असणारी साखर प्रत्येक्ष कोणत्या कोणत्या प्रक्रियेतून तयार होते. गव्हाणी ते साखर गोदाम असा साखर निर्मितीचा प्रत्येक्ष अनुभव व या निर्मितीसाठी  लागणारी यंत्रसामग्री कोणती याची माहिती कारखान्याचे इंजिनिअर अभिजित बाबर,प्रशासन विभागाचे दत्ता कोळी ,मल्हारी नाकाडे ,सेफ्टी विभागाचे रुपेश कणसे यांचेकडून दिली जाते . 

         चालू २०१९-२० चा प्रथम गळीत हंगाम चालू असून कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे यांच्या दूरदृष्टीतून तसेच को चेअरमन मनोज घोरपडे यांच्या साथीने निर्माण झालेल्या या  कारखान्यात असणारी मोठी यंत्र सामग्री ,भली मोठी धूर सोडणारी चिमणी,मोठमोठ्या रसाच्या,पाण्याच्या टाक्या,वीज निर्माण कक्ष हे सर्व पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असतो . मुलांनी येथे काम करणाऱ्या काही कामगार बंधूंशी सुद्धा संवाद साधतात . निर्माण झालेली ताजी साखर खाऊन विद्यार्थी आनंदी होतात. 


 
दुष्काळी भागात निर्माण झालेला खटाव माण अँग्रो हा प्रकल्प साखर निर्मितीबरोबरच वीजनिर्मिती तसेच इतर उपपदार्थ  निर्मिती करतो . कमीतकमी कर्मचाऱ्यांवर चालणाऱ्या या कारखान्यात असणारी संपूर्ण मिशनरी तसेच साखर निर्मिती ची संपूर्ण प्रक्रिया पाहण्याची संधी  दिल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे व को-चेअरमन मनोज घोरपडे यांचे धन्यवाद . 
-एस एस देशमुख, शिक्षक ,भारतमाता ज्युनिअर कॉलेज मायणी 

शुक्रवार, फेब्रुवारी ०७, २०२०

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे मानवतेची जोपासना करण्याचे व्यासपीठ : संचालक दिगंबर पिटके

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे मानवतेची जोपासना करण्याचे व्यासपीठ : संचालक दिगंबर पिटके





मायणी दि.७ ता.खटाव. जि.सातारा(सतीश डोंगरे): "राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे मानवतेची जोपासना करण्याचे व्यासपीठ आहे. श्रमसंस्काराच्या माध्यमातून समाज सेवेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शिबिर महत्त्वाचे असते. ग्राम स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता झाली तर शिबिर यशस्वी झाले, असे म्हणता येईल ", असे प्रतिपादन मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दिगंबर पिटके यांनी केले. ते येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या मौजे गुंडेवाडी (मराठानगर) येथील श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. पूनम दादासाहेब निकम होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, सौ. अाक्काताई निकम, सुभाष निकम, सदाशिव निकम, श्रीरंग उदंडे, सौ. लतिका देशमुख, उपसरपंच श्री संतोष निकम, श्री दत्तात्रय निकम, श्री महादेव निकम, मुख्याध्यापक श्री घोसपुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
   प्रारंभी प्रा शिवशंकर माळी यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. 'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत' हे चालू वर्षाचे ब्रीद वाक्य आहे. यावेळी कोमल माळी, निलोफर जमादार, वैभव चव्हाण आदींची मनोगते झाली. उपसरपंच श्री संतोष निकम यांनी ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. 
          सात दिवसाच्या या शिबिरात शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी  कैलास सुतार यांचे 'संमोहन आणि अंधश्रद्धा निर्मूलन' या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी शांतिनाथ मांगले यांचे कथाकथन, तर सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी कृषी अधिकारी अरुण जाधव यांचे 'कृषी विषयक शासकीय योजना' या विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी डॉ. विजया कदम यांचे 'महिला सबलीकरण' या विषयावर व्याख्यान होईल. बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी डॉ. लक्ष्मण जठार यांचे 'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत' या विषयावर व्याख्यान होईल. 
       गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य व मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री सुरेंद्र गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा समारोप होणार आहे. शिबिरामध्ये दररोज ग्रामस्वच्छता, जलसंधारण व वृक्षारोपणाचे काम केले जाणार आहे. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. शिबिराचे संयोजन डॉ. उत्तम टेंबरे व प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी केले आहे.

रविवार, फेब्रुवारी ०२, २०२०

माण मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

माण मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर




अध्यक्षपदी दिलिपराज कीर्तने तर सचिवपदी आकाश दडस, उपाध्यक्ष अहमद मुल्ला उपाध्यक्ष योगेश गायकवाड निवड


मायणी ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)
माण मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्षपदी दिलीप कीर्तने सचिवपदी आकाश दडस उपाध्यक्ष अहमद मुल्ला उपाध्यक्ष योगेश गायकवाड खजिनदार  सुशील त्रिगुणे कार्याध्यक्ष विजय ढालपे  जिल्हा प्रतिनिधी अशोक हांडे सहसचिव केराप्पा काळेल यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या आहेत.


दि (२)  फेब्रुवारी रोजी माण मराठी पत्रकार संघाची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह म्हसवड येथे पार पाडण्यात आली यावेळी माण मराठी पत्रकार संघाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या सर्वांमध्ये माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप कीर्तन तर सचिवपदी आकाश दडस बिनविरोध निवड करण्यात आलेल्या आहेत .माण तालुक्यातील पत्रकार दुष्काळाच्या बातम्या सातत्याने वार्तांकन करत असतात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही एकत्र येऊन काम करणार आहे पत्रकारांना योग्य मानधन मिळवण्यासाठी पत्रकारांचा एकत्रित लढा उभा राहणार आहे असे मत माण  तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव बनसोडे यांनी केले.


यावेळी संस्थापक पोपट बनसोडे,
ज्येष्ठ पत्रकार राजेश इनामदार,अजित काटकर ,अजित कुंभार ,सागर बाबर ,विजय भागवत ,शिवशंकर डमकले ,जयराम शिंदे ,विशाल माने, राजेंद्र केवटे ,धनंजय पानसांडे सिद्धार्थ सरतापे आदी तालुका  पत्रकार बांधव उपस्थित होते.


यावेळी अध्यक्ष दिलीपराज कीर्तने म्हणाले की ही संघटना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असून ग्रामीण भागातील मराठी पत्रकार यांच्या न्यायासाठी कार्यरत राहणार आहे . माण  तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव आकाश दडस म्हणाले की सर्वसामान्य सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी व परिसरातील अन्यायग्रस्त नागरिकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासन दरबारी आवाज उठवण्याचे काम करणार असून सर्वसामान्यांच्या अडचणी सदैव माण तालुका पत्रकार संघ सदैव तत्पर असल्याचे ग्वाही यांनी दिली .यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची विधानपरिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील ,राज्यमंत्री शंभूराज देसाई माण खटावचे आमदार जयकुमार गोरे,शिवसेना नेते शेखर गोरे, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, देशमुख माणदेशी महिला बँक संस्थापक अध्यक्ष चेतना सिन्हा, रणजित देशमुख यांनी आभिनंदन केले.
वाकळवाडी गावाच्या विकासात निधी कमी पडू देणार नाही

वाकळवाडी गावाच्या विकासात निधी कमी पडू देणार नाही

माजी आमदार डॉ. दिलीपरावजी येळगावकर



मायणी. ता.खटाव. जि.सातारा(सतीश डोंगरे)
मा.आ.डॉ.दिलीपरावजी येळगावकर साहेब यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वाकळवाडी कदम वस्ती येथे बंधारा घेण्यात आला.त्यावेळी बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन करताना माआ.डॉ.दिलीपरावजी येळगावकर साहेब,मा.बोधे साहेब, मान तालुका युवा मोर्चा अध्यक्ष ब्रह्मदेव काटकर,युवा नेते निलेश जाधव,उपसरपंच सुवर्णा जाधव,ग्रा.स. महेश माने, ग्रा.स.दादा जाधव, ग्रा.स.विजय सुर्वे,माजी चेअरमन हरी माने ,आजी माजी सरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

शुक्रवार, जानेवारी ३१, २०२०

महिलांना सन्मान देऊन सामाजिक भेदाभेद नष्ट केला पाहिजे :- कुंदा कांबळे लोखंडे

महिलांना सन्मान देऊन सामाजिक भेदाभेद नष्ट केला पाहिजे :- कुंदा कांबळे लोखंडे



मायणी,ता.खटाव जि.सातारा
माणूस म्हणून सगळ्यांच्या आयुष्याचे मोल सारखेच असते म्हणून निसर्गाच्या अवकृपेने अकाली वैधव्य आलेल्या महिलांना आपण सन्मान देऊन सामाजिक भेदाभेद नष्ट केला पाहिजे असे प्रतिपादन कुंदा लोखंडे कांबळे यांनी केले .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचामळा यांच्या वतीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या यावेळी एकात्मिक प्रकल्प अधिकारी पाटोळे मॅडम फुलपा खरात, सविता रोकडे ,माधुरी देवकर ,सुषमा शिंदे ,भावना चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती .
पुढे त्या म्हणाल्या" संक्रात हा महिलांचा आनंद आणि उत्साहाच सण आहे  परंतु त्यापलीकडे जाऊन अनेक वीरमाता ,वीरपत्नी त्यांच्या आयुष्याचे समर्पण अधिक असते त्यांच्या त्यागाचे आणि माणूसपणाचे मूल्य जपणे समाजातील सर्व स्त्रियाचे कर्तव्य आहे हे मानून मार्गक्रमण करणे हे शिक्षनातून शिकवलं जातं आहे .आपणच सर्व महिलांनी एक पाऊल उचलून सर्व महिलांना आत्मसन्मान दिला पाहिजे.

यावेळी उपस्थित असलेल्या श्रीमती मीना माने, शांता देशमुख ,मीनाक्षी माळी, मंगल माळी या महिलांनी निसर्गाच्या अवकृपेने नंतर खूप वर्षांनी मिळालेल्या सन्मानामुळे अश्रू अनावर होऊन आनंदितमनाने शाळेचे आभार मानले. हा सन्मानआयुष्यात कधीही विसरणार नाही   असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास पार्वती जाधव, लक्ष्मी कुंभार, मीरा देशमुख ,,वंदना पवार ,शारदा देशमुख ,सुजाता जाधव ,कविता जाधव इत्यादी उपस्थित होते शिल्पा खरात यांनी आभार मानले

गुरुवार, जानेवारी ३०, २०२०

दुष्काळी भागातील व्यथांची जान असणारा आमदार स्वर्गिय धोंडीराम वाघमारे - आमदार शहाजीबापू पाटील

दुष्काळी भागातील व्यथांची जान असणारा आमदार स्वर्गिय धोंडीराम वाघमारे - आमदार शहाजीबापू पाटील



आठवणीतील स्वर्गिय धोंडीराम वाघमारे दादा यांच्या कार्याचा उलगडा करताना अनेकांनी भावनिक होऊन मनोगत व्यक्त केल्याने या वेळी अनेक उपस्थितांना हुंदका आवरला आला नाही.


मायणी ः ता. खटाव जि. सातारा(सतीश डोंगरे)
कायम दुष्काळी माणच्या मातीला कवी मनाचा, संवेदनशील, दुष्काळी भागातील व्यथांची जान असणारा आमदार स्वर्गिय धोंडीराम वाघमारे दादा यांच्या रूपाने लाभल्यानेच आपल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात शासनदरबारी,माण तालुक्याला वरदान ठरणार्या उरमोडी व जिहेकटापुर सिंचन योजना मंजूर करून पाया घातल्याने, खर्या अर्थाने स्वर्गिय धोंडीराम वाघमारे दादा हे माणवासियांच्या मनात चिरंतन राहतील असे भावपुर्ण उदगार आमदार शहाजीबापू पाटील यांनी काढले

म्हसवड येथे माजी आमदार  स्वर्गिय धोंडीराम वाघमारे दादा यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिना निमित्त आ.पाटील बोलत होते. या वेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख,अॅड. भास्करराव गुंडगे, अनिलभाऊ देसाई, विश्वभंर बाबर, नगरसेवक शहाजी लोखंडे, विकास गोंजारी,अर्जुनराव खाडे, प्रा. बापुराव देवकर, श्रीमती निर्मला धोंडीराम वाघमारे, अभय वाघमारे, शामराव पवार, केशव वनवे, कारभारी खाडे सपोनि गणेश वाघमोडे, एम के भोसले, गोविदराव काटकर, तुळशीराम काटकर आदि मान्यवर उपस्थित होते.  

                                                                      पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले  कायम दुष्काळी माण तालुक्याचे आमदार म्हणून धोंडीराम वाघमारे यांनी 10 वर्षे अपक्ष आमदार म्हणून कारकिर्द गाजवली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दुष्काळी माण तालुक्याला वरदान ठरणाऱ्या उरमोडी, जिहेकटापुर योजना मंजूर करून घेऊन, आंधळी, ढाकणी तलाव पुर्ण करून घेत तालुक्यात जलसंधारणाची अनेक छोटी मोठी कामे करून तालुक्याच्या विकासाला गती देण्याचे काम केले. तसेच त्यांनी 'हुंदका'या काव्यसंग्रहातून दुष्काळी माण तालुक्यातील जनतेच्या दु:ख दारिद्र्य   राज्याच्या पटलावर मांडून शासनाला जाग आणण्याचे काम केले होते.सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या धोंडीराम वाघमारे यांनी दुष्काळी शेतकरी बांधवांचे दुःख जवळून पाहिले होते .इथला दुष्काळ हटवायचा असेल तर  सिंचन योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले .निस्वार्थी व दुष्काळाच्या झळा सोसून दुष्काळाच्या व्यथा आपल्या हुंदका या काव्यसंग्रहातून मांडून सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता या तालुक्याला लाभला .त्यांच्याच दूरदृष्टीवर आताच्या राजकारण्यांनी पाऊल ठेवले तर निश्चितपणे माण च्या विकासाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल .असे मा .आ धोंडीराम वाघमारे यांच्या 5 व्या पुण्य स्मरण दिनानिमित्त सांगोल्याचे आ .शहाजीबापू पाटील यांनी भावनिक उदगार काढले 

         या वेळी बोलताना माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी स्वर्गिय धोंडीराम वाघमारे यांच्या दूरदृष्टी व कल्पक नेतृत्वा मुळे कायम दुष्काळी माण तालुक्याच्या मातीला सिंचन योजना मंजूर केल्याने खर्या अर्थाने ते या योजनांचे जनक मानले गेले आहेत. तर अॅड भास्करराव गुंडगे म्हणाले मी दादा बरोबर दहा वर्षे सतत सोबत राहलो त्यांनी सर्व सामान्य जनतेत मिसळून चटणी भाकरी खाऊन  माणच्या मातीला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम करून तालुक्यात विकासाचे जाळे निर्माण करत तालुक्यातील बहुतांश ज्युनिअर कॉलेज, पतसंस्था उभ्या करण्यासाठी सहकार्य केल्याने तालुक्यात मुला मुलींचा शिक्षणासाठी फायदा झाला शिवाय पतसंस्था उभ्या राहिल्याने शेतकर्याची बाजार पेठेत पत निर्माण करण्याचे कामही त्यांनीच केले असल्याचे सांगितले, तर अनिलभाऊ देसाई यांनी वाघमारे दादा हे विकासाभिमुख नेतृत्व होते त्यांनी कधीही अडवा अडवी व जिरवा जिरवीचे राजकारण न करता पाणी आडवा पाणी जिरवा ही कामे करून तालुक्याच्या विकासाला गती देण्याचे काम केल्याचे सांगितले, या स्वर्गिय धोंडीराम वाघमारे दादा यांच्या पत्नी श्रीमती निर्मला वाघमारे यांनी माणवासिय जनतेच्या ॠणात वाघमारे कुटुंबिय कायम राहिल असे सांगून तालुक्यातील जनतेनं दादांवर अफाट प्रेम केले होते.तर अभय वाघमारे यांनी हुंदका या काव्यसंग्रहातून सन1983 मध्ये माणच्या व्यथा मांडून वाघमारे दादा यांनी दुष्काळी भागातील तडफडणार्या मनाला स्पर्श केला होता. आज 37वर्षी नंतर माण आवस्था दयनीय आहे. पुढिल काळात या मध्ये बदल करण्यासाठी या मातीवर प्रेम करणार्या संवेदनशील माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी भावना व्यक्त केली. 

      या वेळी प्रा. विश्वभंर बाबर, कारभारी खाडे, प्रा बापुराव देवकर यांनी मनोगत व्यक्त केले तर तुळशीराम काटकर यांनी सुत्रसंचालन केले पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमास माण खटाव फलटण तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी सहसचिव नंदकुमार मारूती शिलवंत यांना या वेळी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.  

रविवार, जानेवारी १९, २०२०

पिंच्याक सिल्याट" स्पर्धेत छोट्या श्रवण लावंडची चमकदार कामगिरी

पिंच्याक सिल्याट" स्पर्धेत छोट्या श्रवण लावंडची चमकदार कामगिरी




मायणी ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)
दुसऱ्या वेस्ट झोन "पिंच्याक सिल्याट" स्पर्धेत छोट्या श्रवण लावंड ची चमकदार कामगिरी
मध्यप्रदेश पिंच्याक सिल्याट असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या वेस्ट झोन चॅम्पियन स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील दरुज च्या श्रवण लावंड या छोट्या विद्यार्थ्यांने सुवर्ण पदक पटकावले. दि 10 व 11 जानेवारी रोजी देवास, मध्यप्रदेश येथील श्रीमंत तुकडोजी पवार स्टेडियम मध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.मध्यप्रदेश बरोबरच महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा,दमण आदी ठिकाणचे स्पर्धकानी यामध्ये सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत श्रवण लावंड याने टंडिंग फाईट व तुंगल
अशा दोन्ही खेळ प्रकारात आपलं वर्चस्व राखत सुवर्ण पदक पटकावले. श्रवण ला भारतीय पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले,अनुज सरनाईक, अंशुल कांबळे, ओमकार अभंग, बिरज रावत,मुस्कान मुलाणी, शिवराज वरे, प्राजक्ता जाधव आदी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. छोट्या श्रवण च्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

शनिवार, जानेवारी १८, २०२०

पडळच्या कार्यक्रमात शरद पवार व येळगावकरांची चर्चा

पडळच्या कार्यक्रमात शरद पवार व येळगावकरांची चर्चा





प्रत्यक्ष सिंचन योजनेचा नकाशात खा शरद पवार यांना दाखवून पाण्याची उपलब्धता कोणत्या प्रकारे होऊ शकते हे पटवून देताना डॉ दिलीपराव येळगावकर यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,मकरंद पाटील,मनोजदादा घोरपडे..


कारखाना स्थळावर बोलवून घेतला पवारांनी खटाव माण मधील सिंचन योजनांचा आढावा


मायणी - ता.खटाव जि.सातारा(सतिश डोंगरे)
माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात पाणीप्रश्नाची जाण असणारा नेता अशी ओळख आहे आणि याची प्रत्यक्ष प्रचिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार बुधवारी खटावच्या दौऱ्यावर असताना खटाव माण अँग्रो च्या साखर पोती पूजनाच्या कार्यक्रमात आली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवारांनी राजकीय चिमटे काढत त्यांनी विरोधकांना घायाळ करतानाच आगामी वाटचालीच्या दृष्टीने व्यूहरचना करणाऱ्या खेळ्याही खेळल्या. खटाव माण चा पाणीप्रश्‍न सोडवण्याच्या दृष्टीने पवारांनी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना साद घालून आपल्या शेजारी बोलावून घेतले यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या.सदर वेळी शरद पवार यांनी डॉ येळगावकर यांची माहिती लक्षपूर्वक जाणून घेतली. यामुळे पक्ष गट तट निवडणूकी पुरतेच प्रथम सामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य याची उपस्थितांना प्रचिती आली.

यावेळी टेंभू ,जिहे कटापुर,उरमोडी,तारळी,ब्रम्हपुरी योजनांचा चांगला अभ्यास असणाऱ्या डॉक्टरांकडून पवारांनी सिंचन योजनांचा आढावा घेतला व राजकीय साखर पेरणीही केली. पडळ येथील माण-खटाव अँग्रो साखर कारखान्याच्या दोन लाख एकावन्न हजार साखर पोत्यांच्या पूजन सोहळ्यासाठी खा. शरद पवार खटाव तालुका आले होते.

यावेळी बोलताना पवारांनी माण-खटाव तालुक्यातील पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेवून पाणीप्रश्‍न मार्गी लावू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पवार यांनी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना जवळ बोलावून त्यांच्याकडून पाणी सिंचन योजनांची माहिती घेतली. यावेळी डॉ. येळगावकर यांनी टेंभू योजनेचे पाणी मायणी तलावातून सोळा गावांना पिण्यासाठी मिळविले आहे व माण तालुक्‍यातील वरकुटे- मलवडी येथील पाणी सिंचन योजनेसंबधी माहिती देताना माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर महाबळेश्‍वरवाडी तलावातून त्या परीसरातील १६ गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले. सिंचनासाठी टेंभू योजनेच्या टप्पा क्र.३नंतरच्या घाणंद कालवा सा.क्र. ४०००मीटर (तलांक) ७३५.५१ नेऊन तेथून पाणी पंपाद्वारे उचलून १५०० मीटर लांबीच्या ऊर्ध्वगामी नलिकेतून ९५ मीटर उचलून नजीकचा डांगरमाथा (तलांक ८३० मीटर) येथे वितरण होदात सोडून ते पाणी पाईपलाईनद्वारे माण-र खटाव व आटपाडी तालुकयातील वंचित भागाला देणे शक्‍य असल्याचे डॉ. येळगावकर यांनी शरद पवार यांना सांगितले. तसेच वितरण हौदापासून कलेढोण -गारळेवाडी ता. खटाव येथे ८ कि.मी. लांबीच्या बंदिस्त नलिकेद्वारे खटाव तालक्यातील मुळीकवाडी, पाचवड, विखळे, पडळ, कान्हरवाडी, कानकात्रेवाडी, ढोकळवाडी, हिवरवाडी, दातेवाडी या गावांचा समावेश करता येईल. तसेच डोंगररांग ओलांडून दुसरी बंदिस्त नलिका आटपाडी तालुक्‍यातून तरसवाडी, विभूतवाडी, गारूडीपासून बागलाचीवाडी, विरळी, जानेवाडी, कुडवाड, दोरग्याचीवाडी अशा एकूण ३० कि.मी भागाला बंदिस्त नलिकेद्वारे लाभ मिळू शकतो. यातून खटाव माण तालुक्यातील ७३२६ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते, असे ही त्यांनी नमूद केले. तारळी योजनेचे पळसगाव, धोंडेवाडी परिसरातील बांधकाम लवकर पूर्ण करुन मायणी-चितळी पर्यंतच्या वंचित क्षेत्रास सिंचन लाभ द्यावा, अशीही मागणी डॉ. येळगावकर यांनी केली. जिहे कठापूर योजनेतून नेर तलावातून दरुज-दरजाई तलावाद्वारे सातेवाडी, पेडगाव ते एनकूळ, कणसेवाडी चा टँकर्रस्त भागाला बंदिस्त पाईपलाईनद्वारे प्रवाही पद्धतीने पाणी देणेबाबत सर्वे पूर्ण झाला आहे. तो प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.


चौकट - पडळ कारखान्यावरील सर्व पक्षीय ,राजकारण विरहित पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेले पवार साहेबांचं स्वागत, तसेच रासप चे मामुशेठ वीरकर, रणजितसिंह देशमुख,अनिल देसाई यांची उपस्थिती यासर्वात डॉ दिलीपराव येळगावकर यांनी खा शरद पवार व विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी केलेली चर्चा व पवार साहेबांना या भागातील सिंचन योजनेचा दाखवलेला नकाशा यामुळे शरद पवार व डॉ.येळगावकर यांच्या व्यासपीठावरील भेटीची सर्वात जास्त चर्चा झाली.

गुरुवार, जानेवारी १६, २०२०

मायणीचा नागरी विकास हाच आमचा ध्यास -  युवा नेते सचिन गुदगे

मायणीचा नागरी विकास हाच आमचा ध्यास - युवा नेते सचिन गुदगे



मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा(सतीश डोंगरे)

सातारा जिल्ह्यातील संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या मायणी गावचा विकास राजकीय द्वेषापोटी रखडला होता परंतु आता युवापिढीने कारभार हातात घेतल्याने जुनी जळमटे काढून टाकली असून 2017 पासून विकासाची नवीन पहाट उगवली आहे आत्ताच्या तरुण मंडळीने पाणीप्रश्न आरोग्य अंगणवाडी गटार इत्यादी योजनेवर फोकस टाकला असून यापुढील काळात मायणी चा नागरी विकास हाच आमचा ध्यास आहे असे ठोस प्रतिपादन युवा नेते सचिन गुदगे यांनी मायणी येथे बोलताना व्यक्त केले मायणी येथे 14 व्या वित्त आयोगातून 25 ,15 योजनेअंतर्गत रामोशी वाडा येथे गटार बांधणे गटार बंदिस्त करण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते आपल्या भाषणात सचिन गुदगे पुढे म्हणाले रामोशी वाडा हा आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला आहे येथील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी प्रथम रामोशी वाडा येथे निधीची नियोजन करत आहे यावेळी गावठाण येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सचिनदादा गुदगे उपसरपंच आनंदा शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला या उद्घाटन प्रसंगात ग्रामपंचायत सदस्य विजय कवडे राजू ठोंबरे आनंदा शेवाळे अभिजीत माळी विलास झोडगे मुबारक मुलानी सौ कदम, विठ्ठल तळेकर दत्तात्रेय काबुगडे, सै पाटोळे, दैवान जाधव केशव पाटोळे सुरज जाधव मनोहर पाटोळे व रामोशी वाडा येथील गावठाण हद्दीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी अभिजीत माळी यांनी आभार मानले



रविवार, डिसेंबर २२, २०१९

रस्सीखेच स्पर्धेत प्राथमिक शाळा मायणीची निवड

रस्सीखेच स्पर्धेत प्राथमिक शाळा मायणीची निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायणी मुले , शाळेची तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा मध्ये रस्सीखेच स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धेत निवड




मायणी. ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)
स्व. यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा तालुकास्तर  सन २०१९ - २०२० मध्ये लक्ष्मीनारायण हायस्कूल , खटाव ता.खटाव जि.सातारा येथे तालुका स्तरांवर घेण्यातआलेल्या स्पर्धेत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायणी मुले , शाळेची तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा मध्ये रस्सीखेच क्रिडा प्रकारात अजिंक्यपदाची हॅट्रीक मिळवून जिल्ह्यातील स्पर्धेत निवड झाली
 यामध्ये कर्णधार हर्षद पाटोळे , साद बागवान , ओंकार सुर्यवंशी , आर्यन झोडगे , जितेंद्र चौधरी , नरेश चौधरी , असद बागवान , पियुष डोंगरे , वरुण पाटोळे , आर्यन कुकडे  इत्यादी मुलांनी चमकदार कामगिरी केली . या सर्वांचे शालेय व्यवस्थापन समिती ग्रामस्थ यांनी कौतुक केले. 

यशस्वी विद्यार्थ्यांना क्रिडा समन्वयक श्री. रामचंद्र जगताप, जयश्री निकम  यांचे मार्गदर्शन लाभले .
यशस्वी विद्यार्थांचे गट शिक्षणाधिकारी श्री .लक्ष्मण पिसे , विस्ताराधिकारी सौ. सुजाता जाधव मॅडम , केंद्रप्रमुख श्री. प्रमोद जगदाळे , शा. व्य. समिती अध्यक्ष व सदस्य , मुख्याध्यापक सौ. उमा वडगांवकर , सर्व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले.
गडकोटांशी दोस्ती करण्यासाठी आला परदेशी पाहुणा

गडकोटांशी दोस्ती करण्यासाठी आला परदेशी पाहुणा


मायणीतील पोलीस व सामाजिक संस्थेने केले त्याचे केले स्वागत

बेल्जियन अभियंत्याकडून 199 किल्ले सर आता 200वा किल्ला भुषण गड सर करण्यासाठी मायणी त पोलिस ठाण्यात दिला आसरा




मायणी तालुका खटाव /जिल्हा सातारा
 बेल्जियम मधील अभियंता गेल्या दोन ते तीन महिन्यापासून महाराष्ट्र राज्यातील गड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेत आहे आत्तापर्यंत त्यांनी 199 गड-किल्ले जाऊन येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या  काळातील इतिहास व महाराजांचा पराक्रम त्याची राज्यकारभाराची पद्धत रयते विषयी याचा अभ्यास करत आहे  पीटर गेट असे त्याचे नाव असून किमान दोनशे ते अडीचशे किल्ल्यावर जाऊन छत्रपती विषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करायचा आहे असे तो आवर्जून सांगतो पीटर हे बेल्जियम मधील कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होते दोन वर्षांपूर्वी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली एका कामासाठी चेन्नई आला व भारतातील निसर्गसौंदर्याची त्याला मोहात पडला आणि तेथील  निसर्ग सौंदर्य पाहण्याचा त्याला मोहन झाला त्यांना छत्रपती शिवाजी महाराजाविषयी माहिती मिळाली त्यांच्या व्यक्तिमत्वाने फिटर भारावून गेला आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळावी तसेच कृतज्ञता आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील दोनशे किल्ल्यावर जाण्याचे जाण्याचे फिटर ने ठरवले आणि त्यांची तातडीने अंमलबजावणी केली  फार खर्च येणार नाही ही याची काळजी घेत आहे पाठीवर सेट त्यात दैनंदिन वापराच्या वस्तू छोटासा तंबू आणि दुचाकी घेऊन भटकंती सुरू केली तो  हॉटेलमध्ये न राहता कोणत्याही ठिकाणी जिथे सोय झाली नाही तिथं तंबू ठोकुन तसेच त्यात बंद प्लॅस्टिकच्या बाटलीतील प्लॅस्टिकचा कमी वापर असल्यामुळे गडावर प्लास्टिक नको ही त्यामागची भूमिका आहे आहे फिटर हे धावपटू असल्याने त्याचा फिटनेस प्रचंड आहे  मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला होता  त्याच जोरावर त्यांनी एका दिवसात आठ किल्ले सर करण्याचे ही किमया साधली किल्ले सर करण्याचे ही किमया साधली महाराष्ट्रातील माणसे अगदी प्रेमळ त्यांच्या अगत्यशील असे ते सांगतात अतिथी विषयी त्यांच्यात मनात आदराची भावना दिसून येते कोणाच्याही घरी राहतो तर सकाळी  केल्यानंतर याविषयी तो अनेक आठवणी सांगीतल्या  महाराष्ट्रात राहून आपल्याला पिठलं-भाकरी आवडायला लागली आहे असे ते कौतुक करून सांगतात  ते अजिबात विसरत नाही.