Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ३१, २०२०

खटाव तालुका निर्जंतुकीकरणासाठी घेतला पुढाकार



माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी खटाव तालुक्यातील प्रत्येक गावास देणार मोफत सोडियम हायड्रोक्लोराइड


मायणी :- ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)

गेल्या काही दिवसापासून कोरोना व्हायरसपासून देशभरात झालेली परिस्थिती पाहता खटाव तालुक्यातील नोकरी व्यवसायानिमित्त नोकरी व्यवसायानिमित्त परगावी असणारे बरेच लोक भयभीत होऊन पुन्हा आपल्या गावी आली आहेत . त्यातील बरेच जण गावच्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत. यामुळे प्रत्येक गावांची सार्वजनिक ठिकाणी व रस्ते यांचे निर्जंतुकीकरण करण्याची गरज आहे . यासाठी खटाव माण अँग्रोचे चेअरमन,माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी पुढाकार घेऊन खटाव तालुक्यातील प्रत्येक गावाला प्रथम फवारणीसाठी लागणारे सोडियम हायड्रोक्लोराइड मोफत देण्याचे जाहीर केले आहे.

त्याच बरोबर सातारा येथील कूपर उद्योग सोशल फाउंडेशन तर्फे तालुक्यातील प्रमुख गावांनाफवारणीचे वाहन व इतर साहित्य देण्यात येणार आहे.

याची सुरुवात आज हिंगणे ता-खटाव, वडूज शहरातून करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे,वडूज नगरीचे नगराध्यक्ष सुनील गोडसे, माजी नगराध्यक्षा सौ.शोभा माळी , नगरसेविका सौ.सुवर्णा चव्हाण, सौ सुनीता कुंभार ,सौ काजल वाघमारे, नगरसेवक विपुल गोडसे ,स्विकृत नगरसेवक संदीप गोडसे, माजी स्वि.नगरसेवक अभय देशमुख,युवा नेते सचिन माळी ,राजेंद्र चव्हाण राजू कुंभार, अमोल वाघमारे तानाजी पवार ,जितेंद्र गोडसे,महेश घार्गे,व्यंकटेश शेठ,खाडे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले,संपूर्ण देशात सध्या कोरोना व्हायरसमूळे भीतीचे वातावरण आहे . परंतु नागरिकांनी आरोग्य विभागाने सांगितलेल्या उपाययोजना योग्य प्रमाणे पाळल्यास या व्हायरस पासून आपण मुक्त होऊ. तसेच खटाव तालुक्‍यातील असणारी सर्व गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणारे सोडियम हायड्रोक्लोराइड मोफत देण्याचे ठरवले आहे. याच बरोबर नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे कूपर उद्योग  फाऊंडेशनच्या माध्यमातून काही प्रमुख गावांना फवारणी करण्यासाठी लागणारे वाहन व इतर साहित्य उपलब्ध करून देणार आहेत.

                  
  संपूर्ण खटाव तालुक्यातील कोरोना व्हायरसशी दोन हात करण्याकामी  तहसीलदार अर्चना पाटील यांना दिलेल्या निवेदनात गावोगावचे ग्रामसेवक,मंडल अधिकारी,तलाठी,पोलीस पाटील,कोतवाल यांना  गावोगावचा परिसर निर्जंतुकीकरण कारण्याकामी सहकार्य करण्यास आपण आदेश करून या गंभीर परिस्थितीशी लढण्यास व सहकार्य करण्यास वचनबद्ध असल्याचे प्रभाकर घार्गे यांनी म्हंटले आह

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.