Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शेतकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेतकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, सप्टेंबर २९, २०२१

जमीन नावावर करायचा खर्च फक्त १०० रूपये

जमीन नावावर करायचा खर्च फक्त १०० रूपये

 जमीन नावावर करायचा खर्च फक्त १०० रूपये


शासनाने एक परिपत्रक काढले असुन त्यानुसार आता फक्त १०० रूपयात जमीन नावावर, हस्तांतरणाची वाटणी पत्र करता येणार आहे. 

जमीन नावावर करायचा खर्च फक्त १०० रूपये
☝परिपत्रक

वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन  हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन  त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत.

१०० रुपयांच्या स्टॅम्पवर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली  काढावीत अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना दिलेल्या आहेत.

सोमवार, सप्टेंबर १०, २०१८

आता शेतकऱ्यांची अडचण सोडवणार किसान कॉल सेंटर

आता शेतकऱ्यांची अडचण सोडवणार किसान कॉल सेंटर


Image result for किसान कॉल सेंटर' मुंबई/प्रतिनिधी:
कृषी मंत्रालयाने सुरू केलेल्या 'किसान कॉल सेंटर' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग यांनी केले आहे.
हे कॉल सेंटर राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये १४ विभिन्न ठिकाणी कार्यरत आहे. यासाठी ११ आकड्यांचा टोल फ्री क्रमांक १८००-१८०-१५५१ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर देशातील कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही मोबाइल/लॅन्डलाइन नेटवर्कवरून मोफत कॉल करता येतो. ही सेवा दररोज सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीमध्ये निरंतर सुरू असते. या क्रमांकावरून देशभरातल्या विविध २२ स्थानिक भाषांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांसाठी पुणे मुख्यालयी कार्यरत किसान कॉल सेंटरवरून मराठी व कोकणी या दोन भाषेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. दररोज दोन शिफ्टमध्ये चालणारे हे कामकाज ७२ विषयांच्या तज्ज्ञांच्या मदतीने चालविले जाते. कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान व माहितीसोबतच शेतकऱ्यांना भेडसवणाऱ्या आर्थिक व सामाजिक समस्यांवरदेखील समुपदेशन केले जाते.
किसान कॉल सेंटरचा प्रतिनिधी फार्म टेली अॅडव्हायजर (एफटीए) म्हणून ओळखला जातो. हा प्रतिनिधी कृषी किंवा कृषी मान्यताप्राप्त कृषी फलोत्पादन/ पशुसंवर्धन/ मत्स्यव्यवसाय/ कुक्कुटपालन/ मधमाशी पालन/ रेशीम उद्योग/ कृषिअभियांत्रिकी/ कृषिपणन इत्यादी विषयांतील पदवीधर किंवा उच्च पदवीधर असतो.
हे प्रतिनिधी स्थानिक भाषेमध्ये पारंगत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ताबडतोब प्रतिसाद देतात. फार्म टेली अॅडव्हायजरीद्वारे ज्या प्रश्नांची उत्तरे दिली जाऊ शकत नाहीत, ते प्रश्न उच्चस्तरीय विशेषज्ञांकडे पाठविले जातात. हे विशेषज्ञ राज्य कृषी विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राज्य कृषी विद्यापीठांचे विशेषज्ञ आहेत. किसान कॉल सेंटरद्वारे कृषिसल्ला व विविध वस्तूंच्या बाजार किमती याबाबत लघु संदेश (एसएमएस) प्राप्तीसाठी एम-किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणीसुध्दा करण्याची व्यवस्था आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.

बुधवार, फेब्रुवारी २१, २०१८

कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

चंद्रपूर/ब्रम्ह्पुरी: 
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोथुळना नवेगाव येथील शेतकरी  प्रविण वामन ठाकुर वय 36 वर्ष यांनी 21फरवरीच्या पहाटे सकाळी 04 वाजताच्या सुमारास उटुन सकाळी डब्बल फसल धानरोवनी करीता मोटार पंपाचे पाणी लावण्यासाठी जातो असे घरच्या कुटुंबीयांना सांगून गावालगत असलेले अरविंद नाकतोडे यांच्या शेताशिवात असलेल्या कडु लिंबू च्या झाडाला गळफास लावून आत्महत्या करुन आपली जिवन याञा संपवली ही घटना बुधवारी सकाळी  07:00 वाजताच्या सुमारास  येथील शेतमजुर शेतात काम करण्याकरिता गेला असता समोर आली.
मृतक शेतकरी प्रविण वामन ठाकुर याला अडीच एकर शेती असुन त्यावर सेवा सहकारी संस्था मधुन 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते,व श्तातील पिकांवर मावा,अळी, तूळतुळा रोगांनी शेतात नापिकी झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी प्रविण वामन ठाकुर हा आर्थिक विवंचनेत दिसत होता.मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांच्या पाठीमागे आई,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा,एक भाऊ असा बराच मोठा आपत्य परीवार आहे.सदर मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्या ने कोथुळना नवेगाव येथील जनतेत शोककळा पसरली आहे.शासनाकडून सदर पिढीत कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात याव्ही अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते विनोद झोडगे,गोविंदराव भेंडारकर,ड्रा .प्रेमलाल मेश्राम विनोद राऊत यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक चव्हाण तहसीलदार चव्हाण साहेब यांना फोन केले व पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती केली.
महाराष्ट्र शासनाने जरी कर्ज माफी केली असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्तेवर उपाययोजना सुचविल्या नसल्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्म्हत्तेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, यात मात्रालायातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत व शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेली आत्महत्या असो हे आत्मह्तेचे प्रकरण सरकारच्या भविष्यात  चांगलाच जिव्हारी लागू शकते,त्यामुळे आणखी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना व सूचना करणे गरजेचे झाले आहे.
 

सोमवार, जानेवारी १५, २०१८

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


वरोरा/प्रतिनिधी: 
रोगराईने पिके नष्ट झाल्याने तसेच कर्जाचे डोंगर असल्याने कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत असणाऱ्या एका शेतकऱ्याने जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरोरा तालुक्यातील ताडगव्हाण येथे घडली. सदानंद दादाजी सूर वय ४४ असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या पिकांवर अनेक रोगांनी घात घातला असून शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे. 
वरून शेतीसाठी कर्ज घेतलेले परत कसे करायचे यामुळे ते अस्वस्थ असायचे. त्यातच पिकांवर अनेक प्रकारची लागण झाल्याने संपूर्ण पीक नष्ट झाले होते याच विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून सदानंद हे चिंतेत असायचे .सोमवारी सकाळी उठून शेताकडे गेले व परिसरातील जंगलात झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती शेगाव पोलिसांना मिळताच घटनेचा पंचनामा केला व आकस्मित मृत्यूची नोंद केली.

सोमवार, नोव्हेंबर २७, २०१७

शेतकरी अस्मानी संकटापेक्षा सुलतानी संकटात जास्त - खा. राजू शेट्टी

शेतकरी अस्मानी संकटापेक्षा सुलतानी संकटात जास्त - खा. राजू शेट्टी

गजेंद्र डोंगरे/कोंढाळी:-
 स्वभिमानी शेतकरी संघटनेचे  संस्थापक  खासदार राजू शेट्टी यांनी अमरावतीकडे निघाले असतांना 
 नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्याचे जुनापानी व परिसरातील  शेतक-यांनी  जुनापानी येथील शेतकरी उत्तमराव काळे यांचे  नेतृत्वात   खासदार राजू शेट्टी याची  27नव्हेंबर ला साकाळी 10-30वाजता  जुनापानी गावात  भेट  घेऊन या भागातिल समस्या मांडल्या . 
 या प्रसंगी चंदनपारडी चे उपसरपंच सतीश पुंजे यांनी या भागात कापुस उत्पादक  शेतकरी लाल्या व बोंड अळीच्या प्रदुरभावाने कसा हवालदिल झाला आहे,तसेच संत्रा , सोयेबीन ची कशी वाट लागली व सरकार कडून होनारी पिळ नूकी बाबद  माहीती दिली.तर जि.प. सदस्य रामदास मरकाम यांनी जि.प. मधे शेतकर्याची अडवनूकीचा पाढाच वाचला,  उत्तम काळे व दिलीप  काळे यांनी  त सेच खासदारां सोबत आलेले वस्त्रोध्दोग महामंड़ळाचे  माजी अध्यक्ष रवीकांत तुपकर,युवा स्वभिमानी चे शामअवथ॓ळे यांनी शेतकर्यांच्या गर्हाणे व सत्यता मांडली.



 केंद्र  व राज्य सरकारचे धोरण शेतकरी  विरोधी
       या प्रसंगी खासदार शेट्टी यांनी  या भागातील शेतकर्यांचे कपाशी चे पीकाची पाहणी साठी स्वतः शेतकर्याचे कपाशी पहन्यास दिलीप काळे  यांचे शेतात पोहचले व कपाशी व त्यावरील बोंड़ अळी चा प्रदुरभाव व लाल्ल्या ची पाहणी केली. या प्रसंगी परिसरितील शेकडो शेतकर्यांशी संवाद साधत  म्हणाले हे मोदी सरकार शेतकर्यांटे जखमावर मीठ चोळत आहे,शेतकर्याना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आले आहे.

 शाश्वत शेती साठी मदत करत नाहीत,  पंतप्रधान पी क वीमा योजना ही शेतकर्या पेक्षा वीमा कंपण्यांनाच कश्या पोषक आहेत याचे उदाहरने देऊन सांगितले.  तर शेतकरी भिकारी   नसुन अन्नदाता आहे  सरकारचे शेतकरी वीरोधी धोरनाचा फटका शेयकर्याला बसत आहे या बाबद  सरकार ला अनेक दा निदर्शनात आनून दिले आहे.   या भागात कपाशी संत्रे वअन्य पीक कसी शेतकर्याच्या हातंन जात आहे तरी सरकार ढिम्म आहे. 

 डी बीटी चा फटका ही शेतकरीच सहन करत आहे  तेंव्हा युवा शेतकर्यांनी संघटीत होने गरजेचे आहे असे आवाहन ही  राजूशेट्टी  यांनी कली. या प्रसंगी शेतकर्यांनी कपाशी च्या हार घालून त्यांचे गावकर्यांनी स्वागत केले. या प्रसंगी दुध संघाचे अध्यक्ष भास्कर पराड यांनी दूध ऊत्पादक शेतकर्याच्या व्यथा मांड़ल्या तर प्रशांत खंते व आकाश गजबे  पं स  सद स्य डगदिश डोळे यांनी युवा शेतकर्यांच्या समस्या व डी बी टी बाबद  होनारी शेतकरी  अडचनीचे निवेदन दिले. या वेळी  शिवाजी जामदार,सुदर्शन डोंगरे, उत्तमकाळे,दिलीप काळे, बबनराव देशमुख,देवीदास सोमकूवर मानिकराव काळे, गजानन ढोबाळे, रामचंद्र टीपले,नथ्थुजी रमधम,नंदकिशोर  अवथळे नथ्थूजी देशमूख, भोजराज अवथळे,प्रदिप बारंगे यांनी  ही आप आपल्या समस्या माडल्या.