Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वरोरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वरोरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै ०२, २०२३

राष्ट्रीय ओबीसी आयोग शिबिराचे उद्घाटन

राष्ट्रीय ओबीसी आयोग शिबिराचे उद्घाटन

राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, शोभाताई फडणवीस यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन


शिरीष उगे ( वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : स्व. विनायकराव वझे स्मृती प्रित्यर्थ सुयोग 
हॉस्पिटल वरोरा, भारतीय जनता पार्टी, व रोटरी क्लब वरोरा, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅमोग्राफी टेस्ट मॅमोग्राफी टेस्ट शिबिराचे आयोजन १जूलै ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे घेण्यात येत आहे.

राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी
ग्रामीण जनतेमध्ये मुख रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतात.  त्यामुळे अशा पद्धतीचे कॅम्प पक्षातर्फे घेण्याची योजना आम्ही आखत आहोत. दत्ता मेघे यांचे विदर्भात आरोग्य संबंधित सर्वात मोठे कार्य आहे. त्यांचा योग्य समज घेऊन डॉक्टर वाझे यांनी हा कॅम्प घेऊन गरीब लोकांचा वेळ, पैसा त्यांनी वाचवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी छोट्या छोट्या बाबींवर काम करणे सुरू केले होते. स्वच्छतेच्या बाबतीत स्वतः झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश सर्वांना दिला. त्यामुळे कॉलरा मलेरिया सारख्या साथीच्या रोगाचे प्रमाण कमी करण्यात यश आले. 
आरोग्य क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांनी नवीन योजना राबवून आमूलाग्र बदल केला आहे. 2014 साली सहा एम्स होते. यानंतर 15 एम्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सुरू झाले.
औषधी निर्मितीपासून विदेशात औषधी पुरवठा करण्यापर्यंतचे कार्य या सरकारने केले आहे. 

डॉक्टर सागर वझे यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देत पक्षातील कार्यकर्त्यांना जनतेसाठी  कार्य करत राहण्याचा संदेश दिला.

आज डॉक्टर्स दिवस  भारतरत्न डॉक्टर बीसी रॉय यांच्या जन्मतिथी निमित्त डॉक्टर दिवस साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून 1 जुलै 2023 ते 5 जुलै 2023 पर्यंत स्त्रियांमधील स्थानाचा कॅन्सर तपासणी व निदान करण्यात येत आहे. यालाच मॅमोग्राफी म्हटलं जातं मॅमोग्राफी ही एक एक्स-रे तपासणी आहे. विशिष्ट पद्धतीच्या तपासणी मधून स्त्रियांच्या स्तनांमधील गाठीची तपासणी कॅन्सर आहे की नाही हे बघण्यासाठी केला जातो. डॉक्टर्स डे च्या निमित्त आम्ही हा उपक्रम राबवतो आहे. भारतीय जनता पार्टी व रोटरी क्लब वरोरा या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.असे माजी आमदार शोभाताई फडणवीस यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

आज डॉक्टर्स दिवस  भारतरत्न डॉक्टर बीसी रॉय यांच्या जन्मतिथी निमित्त डॉक्टर दिवस साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून 1 जुलै 2023 ते 5 जुलै 2023 पर्यंत स्त्रियांमधील स्थानाचा कॅन्सर तपासणी व निदान करण्यात येत आहे. यालाच मॅमोग्राफी म्हटलं जातं मॅमोग्राफी ही एक एक्स-रे तपासणी आहे. विशिष्ट पद्धतीच्या तपासणी मधून स्त्रियांच्या स्तनांमधील गाठीची तपासणी कॅन्सर आहे की नाही हे बघण्यासाठी केला जातो. डॉक्टर्स डे च्या निमित्त आम्ही हा उपक्रम राबवतो आहे. भारतीय जनता पार्टी व रोटरी क्लब वरोरा या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. डॉक्टर सागर वजे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
        यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर खूजे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी आमदार शोभाताई फडणवीस, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, रेखाताई पाटील, सागर वझे व त्यांच्या मातोश्री व त्यांच्या पत्नी मीरा वझे, डॉक्टर विवेक तेला, करण देवतळे, रमेश राजूरकर, अहेतेशाम अली, समीर बारई, रोटरीचे अध्यक्ष पराग पत्तीवार, अदनान सिद्दीकोट, बाळूभाऊ पिसाळ, बंडू देऊळकर, डॉक्टर राहुल धांडे, डॉक्टर कपिल टोंगे, भाजपाचे भगवान गायकवाड, आदी  मान्यवर व्यक्ती व भाजपाचे व रोटरी क्लबचे सदस्य  या कार्यक्रमासाठी उपस्थित होते

बुधवार, मार्च २२, २०२३

ट्रक-कार चा भीषण अपघातात डॉक्टर पती पत्नीचा चा मृत्यू

ट्रक-कार चा भीषण अपघातात डॉक्टर पती पत्नीचा चा मृत्यू


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : वरोरा वणी मार्गांवरील शेंबळ गावाजवळ भरधाव ट्रक ने वणीकडे येत असलेल्या कारला जबर धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत कारला ट्रकने ओढत नेले. या भीषण अपघातात तरुण महिला डॉक्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पतीचा ही मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवार दि. 22 मार्चला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली.डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (31) असे मृतक डॉक्टर चे नाव आहे त्या पाच नंबर शाळे जवळ वास्तव्यास होत्या. तर त्या तीन दिवसापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.

डॉक्टर दाम्पत्य MH-34- AM- 4240 या कार ने वणीकडे येत होते तर विरुद्ध दिशेने ट्रक क्रमांक MH- 34-BZ-2996 हा ट्रक भरधाव वेगात होता. अचानक दोन्ही वाहने समोरासमोर भिडली. अपघात भीषण होता, यावेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तसेच पोलिसांना सुचविण्यात आले. जखमींला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.

शुक्रवार, मार्च १७, २०२३

 19 व 20 मार्चला जिल्ह्यातील हे मार्ग राहणार बंद

19 व 20 मार्चला जिल्ह्यातील हे मार्ग राहणार बंद

वरोरा ते वणी मार्गावरील पाटाळा पुलाच्या बांधकामादरम्यान

सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्णतः बंदी

19 व 20 मार्च रोजी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत राहणार वाहतुक बंद

पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलिस विभागाचे आवाहन






शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: वरोरा ते वणी या राष्ट्रीय महामार्गावरील पाटाळा पुलाचे काम सुरू असल्याने पुलाच्या बांधकाम दरम्यान 19 मार्च रोजी रात्री 8 वाजतापासुन ते 20 मार्च 2023 रोजीचे सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्णतः बंदी घालण्यात येत असुन वाहतूक वळविण्याबाबत आदेशीत करण्यात येत आहे.
पोलिस स्टेशन, माजरी हद्दीतील वरोरा ते वणी या मार्गावरील पाटाळा येथे नविन निर्माणाधिन पुलाचे बांधकाम करणे प्रस्तावित आहे. सदर पुलाच्या बांधकामादरम्यान जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतुक समस्या निर्माण होवून अडचण निर्माण होवू नये. तसेच अपघातासारखे प्रकार घडून जिवीत व वित्तहानी होवू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासंदर्भात नव्याने उपाययोजना करण्याचे आवश्यक झाले आहे.

या पर्यायी मार्गाचा करा अवलंब:
वरोरा कडून वणीकडे जाण्यासाठी वरोरा-भद्रावती-साखरवाही फाटा-घुग्गुस-वणी या मार्गाचा अवलंब करावा. तसेच वणीकडून वरोराकडे जाण्यासाठी वणी-घुग्गुस-साखरवाही फाटा-भद्रावती-वरोरा या मार्गाचा अवलंब करावा. व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

Chandrapur Breaking News | चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू

Chandrapur Breaking News | चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू



by Shirish Uge
वरोरा |  स्थानिक शेगाव येथुन जवळच असलेल्या चारगाव धरण येथे आज दुपार तीन वाजताच्या सुमारास दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  Two youths died due to drowning

      सविस्तर असे की बाहेर गावी शिकत असल्याने आज पोळ्या निमित्याने कॉलेज ला सुट्ट्या लागल्या असल्याने एन्जॉय म्हणून फिरण्याचा बेत घेऊन सर्व मित्र एकत्र येऊन चारगाव धरण येथे जाण्याचा बेत घेतला व इथे आले . सदर धरणाचे मनमोहक दृश्य पाहून फोटो काढण्यात सुरुवात केली तेव्हा मृतक हार्दिक विनायक गुळघाणे राहणार शेगाव बू.हा सेल्फी फोटो काढण्या करिता गेला असता पाय स्लीप होऊन पाण्यात पडला. तेव्हा मृतक आयुष चीडे राहणार वरोरा हा त्याला वाचविण्या करिता गेला असता तो सुधा पाण्यात पडला . तेव्हा या दोघाचा मृत्यू झाला.. यात हार्दिक विनायक गुळघाने वय १९ वर्ष राहणार शेगाव बू... तर दुसरा आयुष चिडे याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी घटना स्थळ गाठून मुलांना पाण्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गावातील श्री रामकृष्ण भट यांच्या सहकार्याने नाव्ह व लोखंडी गळ च्या साह्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले ...सदर मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्या करिता उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले . याचा अधिक तपास ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पोलीस कर्मचारी तपास करीत आहे . मृत युवक सोबत त्यांचे सवंगडी श्वेतम जयस्वाल राह.शेगाव बू. मयूर पारखी राह.वरोरा. आश्रय गोळगोंडे राह.वरोरा.हे मित्र तलाव बाहेर असल्याने त्यांचे प्राण वाचले..

Chandrapur News34 Mh 34 | Warora | Chandrapur Police

बुधवार, एप्रिल ०६, २०२२

आनंदवनात कर्णबधिर मुला - मुलींकरीता " शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क " या विषयावरमार्गदर्शन सत्र संपन्न

आनंदवनात कर्णबधिर मुला - मुलींकरीता " शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क " या विषयावरमार्गदर्शन सत्र संपन्न


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : महारोगी सेवा समिती निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगाची कर्मशाळा व आनंद मूकबधिर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिर मुला - मुलींकरीता " शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क " या विषयावर आनंदवनातील निजबल येथील प्रांगणात मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी मंडलिक, जयश्री सोमण ( मुंबई ), संधिनिकेतन अपंगाच्या कार्यशाळेचे अधिक्षक रवींद्र नलगिंटवार, आनंद मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भसारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
मार्गदर्शन सत्रात मुंबईहून आलेल्या व स्वतः कर्णबधिर असलेल्या नंदिनी मंडलिक आणि जयश्री सोमण यांनी साईन लॅग्वेज, कृती अभिनय, विद्यार्थी सहभाग या माध्यमातून प्रभावी संवाद साधला. ' शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क ' यावर आपले विचार मांडताना त्या म्हणाल्या की, शिक्षणामुळे व्यवहारज्ञान वाढते. समाजात , प्रवासात सामान्य व्यक्तींशी व्यवहार करण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी सामान्यांप्रमाणेच कर्णबधिरांनाही भाषेचा वापर करता आला पाहिजे. यासाठी त्यांनी सतत प्रश्न विचारत, माहिती घेत शब्दसंग्रह करावा,असा सल्ला त्यांनी दिला. समाजातील काही वाईट प्रवृत्तीकडून कर्णबधिर मुलींची फसवणूक होऊ शकते, या करिता आई - वडिलांचा सल्लामसलत करून निर्णय घ्या, असे ही त्यांनी मुलींना सुचविले. कुटुंबातील व्यक्तींना समजून घ्या, सहकार्य करा ,चांगली संगत ठेवा या बाबी त्यांनी नाट्यमय पद्धतीने व विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन समजावून सांगितले.
स्वत:च मूकबधिर असलेल्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शब्दाच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या भावना समजून घेत या उपक्रमाचा भरपूर आनंद लुटला
सुरूवातीला रवींद्र नलगिंटवार, यांनी आनंदवन निर्मित भेटवस्तू देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद मूकबधिर विद्यालयातील सेवानिवृत्त विशेष शिक्षक दीपक शिव यांनी केले. आभार मुख्याध्यापक विजय भसारकर यांनी मानले.
संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे व कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित मार्गदर्शन सत्रात दोन्ही शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्णबधिर व्यक्ती कर्णबधिर मुलांना किती तन्मयतेने व आपुलकीने समजावून सांगतात व मुलेही त्यांना कसा उत्तम प्रतिसाद देतात याचा प्रत्यय या कार्यशाळेतून आला.

शुक्रवार, मार्च ०४, २०२२

माळढोक पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन व जनजागृती करण्याकरिता मोटार सायकल रॅलीचे आयोजन

माळढोक पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन व जनजागृती करण्याकरिता मोटार सायकल रॅलीचे आयोजन


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : वनपरिक्षेत्र विभाग वरोराच्या वतीने दि.७ मार्च२०२२ रोजी सकाळी८:००वा माळढोक पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता व जनजागृती निमित्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेआहे. सदर मोटर सायकल रॅली वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा येथून सकाळी ८:००वा निघणार आहे. आणि रॅलीची सांगता धनोजे कुणबी मंगल कार्यालय वरोरा येथे करण्यात येत आहे. असे एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, माळढोक पक्षी भारतामध्ये फक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात ,मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यात आढळतो महाराष्ट्रात हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजेच (अहमदनगर )नागपूर व बीड जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात आढळतो सोलापूर जवळ नान्नज अभयारण्य येथे या पक्षासाठी संरक्षित अरण्य स्थापन झाले आहे, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील काही भागात माळढोक पक्षाचा वावर असल्याचे आढळते.

मंगळवार, मार्च ०१, २०२२

खासदार, आमदार दाम्पत्यांच्या हस्ते मोहबाळा - नायदेव रस्त्याचे लोकार्पण

खासदार, आमदार दाम्पत्यांच्या हस्ते मोहबाळा - नायदेव रस्त्याचे लोकार्पण


*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खासदार, आमदार दाम्पत्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा: वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना व येथील नागरिकांना कोणत्याच प्रकारे त्रास होणार नाही, त्यासाठी प्रशासनाने तत्पर राहून काम करण्याची आग्रही भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर व खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची असते. मोहबाळा ते नायदेव या मार्गावर कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे या भागातील शेतीचे धुळीमुळे नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच, पाठपुरावा करून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील मोबदला देण्यात आला.

यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते मोहबाळा - नायदेव रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी साई वर्धा पॉवर जनरेशन प्रायवेट लिमिटेड चे अधिकारी माटे, सरपंच नंदू टेमुर्डे तसेच सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

त्यासोबतच या रस्त्यातून कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतपिकांचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतीभाताई धानोरकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार मकवानी यांची उपस्थिती होती.

सोमवार, फेब्रुवारी २८, २०२२

भद्रावतीत भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अहेतेशाम अली यांची सदिच्छा भेट

भद्रावतीत भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अहेतेशाम अली यांची सदिच्छा भेट


*वरोरा माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा सत्कार करतांना
शिरीष उगे (भद्रावती/वरोरा प्रतिनिधी)
भद्रावती : आश्रय सेवा संस्था, भद्रावती आणि भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२/०२/२०२२ पासून होऊ घातलेल्या भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत भद्रावती येथे आज सदिच्छा भेट दिल्याबद्दल मा.नगराध्यक्ष-न.प. वरोरा अहेतेशाम अली यांचा आयोजक कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सुरु असलेल्या क्रिक्रेट स्पर्धेतील खेळाळूना अहेतेशाम अली यांनी आपल्या मनोगतातुन प्रोत्साहित केले. या दरम्यान आज होणारया रेशीमबाग़ जिमखाना नागपुर व ब्लास्टर11भद्रावती या दोन्ही संघाचा टॉस करून क्रिकेट स्पर्धे ची सुरवात केली. या प्रसंगी अहेतेशाम अली यांचा सोबत भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष-सुनील नामोजवार, माजी नगरसेवक-प्रशांत डाखरे, युवा मोर्चा चे पदाधिकारी अमित गुंडावार,इमरान खान, शीवा पांढरे, सामाजिक कार्यकर्ता-राहुल आत्राम, शेरू शेख, शहेबाज शेख, अजहर खान या प्रसंगी उपस्तित होते.

शुक्रवार, जानेवारी २८, २०२२

आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणावर २४ तास सूर्यनमस्कार करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम

आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणावर २४ तास सूर्यनमस्कार करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
         :"आजादी का अमृत महोत्सव ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प" या राष्ट्रीय अभियानाचा एक भाग म्हणून आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,क्रिडा भारती ,चंद्रपूर व हेल्थ डिपार्टमेंट, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित, आनंद निकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणावर २४ तास सूर्यनमस्कार करण्याचा मानस गणतंत्रदिनाच्या शुभसंध्येला पूर्ण करण्यात आला. 
         दि.२५जाने. २०२२ ला संध्याकाळी६ वाजता सुरु केलेले हे अभियान, दि.२६ जाने.२०२२ ला संध्याकाळ ६ ला पूर्ण झाले. यात एकून १६२ विद्यार्थी तसेच योगसाधकांचा सहभाग होता २४ तासात एकून ९९१० सूर्यनमस्कार करण्यात आले.
समारोपीय सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आ.न.वि.चे महाविद्यालयचे प्राचार्य मृणाल काळे प्रमुख अतिथी म्हणून लाभले, तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्य राधा सवाने व विशेष अतिथी म्हणून योग अध्यापक श्री.दीपक शिव, तसेच अतिथी म्हणून प्रा....सवाने व मा.बघीले सर, या अभियानाचे नियोजन करणारे महाविद्यालयाचे क्रिडा प्रमुख व समन्वयक प्रा.तानाजी बायस्कर व आयोजन समिति विद्यार्थी प्रमुख कुणाल दातरकर व आनंदवनाचे उपसरपंच श्री.शॊकत खान ,म.से.स. कार्यकर्ते श्री.अविनाश कुलसंगे व सर्व खेळाड़ू उपस्थित होते 
          या प्रसंगी सर्व मान्यवरानी मनोगत व्यक्त करून सहभागी साधकांचे अभिनंदन करून कॊतुक केले. या कार्यक्रमाचे संचलन महेश सोनवाने यांनी केले तर आभार. तानाजी बायस्कर यांनी मानले या कार्यक्रम स्थळावर मा.डाॅ.विकास आमटे यांनी भेट देऊन शुभाशीर्वाद दिले व आनंदवनवनाच्या वतीने उपक्रमाला शुभेच्छा दिल्या,वॆद्यकीय अधिकारी मा.डाॅ.भारती आमटे,संस्थेचे विश्वस्त मा.श्री.कॊस्तुभ आमटे ,सॊ.पल्लवी आमटे , विश्वस्त डाॅ.विजय पोळ,मा.श्री.सुधाकर कडू मा.सदाशिव ताजणे यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या! या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रत्यक्षीकरण यु ट्युब चॅनेलवर वरून प्रसारीत करण्यात आले भारत आणि इतर ५ देशात साधकांनी हा उपक्रम पाहिला आणि अभिनंदनचा वर्षाव केला!

गुरुवार, जानेवारी २७, २०२२

प्रजासत्ताक दिना निमित्त काव्यांगण साहित्य मंच तथा भारत माता सन्मान मंच च्या सयुक्त विद्यमाने काव्यसंमेलनवरोरा

प्रजासत्ताक दिना निमित्त काव्यांगण साहित्य मंच तथा भारत माता सन्मान मंच च्या सयुक्त विद्यमाने काव्यसंमेलनवरोरा


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)

: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था आणि भारतमाता सन्मान मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आँनलाईन(गुगलमीटच्या माध्यमातून) हिंदी भाषिक भव्यदिव्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
या संमेलनाचे अध्यक्ष काव्यांगण साहित्य मंचचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मान.राजू पाडेकर, अहमदनगर, संस्थापक राष्ट्रीय उपाध्यक्ष मान. सौ प्रांजली प्रविण काळबेंडे, वसई, संस्थापक राष्ट्रीय कार्याध्यक्ष मान. नीरज आत्राम,चंद्रपूर तसेच भारतमाता सन्मान मंचचे संस्थापक अध्यक्ष मान.ऍड.पुरूषोत्तम मित्तल ,राष्ट्रीय प्रभारी मान. ऋतू गर्ग, सिलिगुडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच आपापल्या संस्थेच्या हेतू आणि उद्दिष्टाबद्दल मनमोकळा सुसंवाद साधला.
भारत माता सम्मान मंच आणि काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था द्वारा सर्व कवींना सन्मानित करण्यात आले.
काव्य सम्मेलन चे कवीगण नामांकन लिस्ट
गायत्री पांडे - उत्तराखंड शगुफ्ता रहमान 'सोना' - उत्तराखंड
प्रवीण शर्मा ताल - रतलाम रमा बहेड - हैदराबाद
ऋषि तिवारी - सिवान बिहार,अलका गुप्ता प्रियदर्शिनी - लखनऊ उत्तर प्रदेश,एल. सी. जैदिया "जैदी" बिकानेर राजस्थान,ऋषि रंजन - दरभंगा बिहार,वंदना यादव चित्रकूट उत्तर प्रदेश,अर्चना शर्मा। दिल्ली, डाॅ.दिनेश व्यास "ललकार राजस्थान चित्तौड़ भीमगढ़ (भारत ), ऋषि रोही दरभंगा बिहार, शोभाराणी तिवारी, रेणू अब्बी रेणू चंडीगड, सुनीता गर्ग पंचकुला, दीपक (पलवल),भावना विधानी,नीरजा शर्मा, संगीता शर्मा कुंद्रा चंडीगड, मधु गोयल कैथल हरियाणा
,गरिमा पंचकूला, राजेश तिवारी मक्खन झांसी, माधुरी शर्मा मधुर हरियाणा, प्रकाश पिंपळकर चंद्रपूर आदी
निमंत्रितांच्या सर्व कविंच्या रचना सामाजिक संदेश देणा-या तसेच संविधानाचे महत्त्व पटवून देणा-या होत्या.
मान.रेणू अब्बी,मान. शोभा राणी,मान नीरजा मँम ,मान प्रविण शर्माजी ह्यांच्यासारख्या अनुभवी आणि नामवंत साहित्यिकांच्या कविता ऐकावयास मिळाल्या.
मान गायत्री पांडे ह्यांच्या कवितेने सुरुवात झाली.२६ जनवरी अमर रहे..असा नारा देणारी सुंदर रचना होती.
कवी ऋषी तिवारी ह्या कवीने युवा प्रतिनिधित्व करत समाजातील सर्व वयस्कर वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन मागितले. समाजाला दिशादर्शनासाठी युवावर्गाला मार्गदर्शक व्हा असा मोलाचा संदेश दिला.
काव्यसंमेलनाचे मुख्य आकर्षण बारावर्षिय हर्षिता शुक्ला आणि वडिल रवि शुक्ला हे बापलेक ठरले.रविजींच्या स्वरचित रचना दोघांनीही गोड स्वरात सादर केल्या.
कवयित्री माधुरी शर्मा ह्यांनी गेयप्रकारात कविता सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
डॉ दिनेश ललकार ह्यांच्या स्फूर्तीदायी रचनेने संमेलनाची सांगता झाली.
शेवटी ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक राजू सर,प्रांजली काळबेंडे,नीरज आत्राम सर यांचे हातभार लागले. तसेच यांनी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काव्यसादरीकरण केले.
एकमेकांच्या रचनांवर भरभरून प्रतिसाद, अभिप्राय देत प्रोत्साहित करीत आनंदोत्सवात हा सोहळा संपन्न झाला.
काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री प्रांजली काळबेंडे ह्यांनी करत सर्वांशी हसतखेळत संवाद साधला.कवी कवयित्री च्या साहित्यिक वाटचालीबद्दल.जाणून घेतले.काव्यांगण लेखणीचे हि संघटना तुम्हास कशी मदतनीस ठरू शकते याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आभार रेणू मॅडम यांनी मानले.

मंगळवार, जानेवारी १८, २०२२

भोई समाजा तर्फे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ शहाजी राजे भोसले यांची जयंती साजरी

भोई समाजा तर्फे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ शहाजी राजे भोसले यांची जयंती साजरी

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ शहाजी राजे भोसले यांची जयंती भोई समाज महीला जिल्हाध्यक्ष अल्काताई पचारे यांच्या उपस्थिती नुकतीच साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ एक आदर्श आई ज्यांनी एका वीर शुरपुञाला जन्म दि ला व छञपती शिवाजी महाराज यांना अस घडवलं ज्याच्यामुळे आपण आज स्वातंञ या शब्दाचा खरा अर्थ जाणतो व त्यांचा आदर्श पुढे ठेवतो.
प्रत्येक आईनीं आपल्या लेकराला छञपती शिवाजी महाराज्या सारंख घडवावं असे विचार अल्काताई पचारे यांनी मांडले.
कार्यक्रमात साविञीच्या लेकींचा सन्मान करण्यात आला जिजाऊ ते साविञी हा ऊपक्रम राबविला गेला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून लाभलेली दिक्षा मडावी हीचा पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.  त्यांनी महीला समोर आपले विचार व्यक्त केले. महीलांनी सर्वच श्रेञात पुढे यांव, मुलींनी शिकुन खूप मोठं होऊन आपला व सर्व महीलांचा विकास कसा करता येईल याचा वरभर द्यावा.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिल्पा रूयारकर मा.नगरसेविका न.प.वरोरा, मायाताई रूयारकर, नंदा रूयारकर, संगीता रूयारकर, शारदा पचारे,
छाया करलूके, बेबी रूयारकर, पार्वता रूयारकर, नंदनी पचारे, लक्ष्मी करलुके, प्रियंका मोहीनकर, कविता रूयारकर, शंकुतला रूयारकर, प्रेमीला रूयारकर, चिनकाबाई रूयारकर,सरला पारशिवे, अल्का नागपुरे, शशिकला रूयारकर, शालु मांढरे ,कविता करलुके, शारदा करलुके, सिंधु दुर्गे, ज्योती रूयारकर, मंगला कामतवार शोभा करलुके क लावती करलुके पल्लवी रूयारकर, मिनल रूयारकर,अनिता करलुके भोई समाजातील महीलां उपस्थित होत्या.

शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वरोरा येथे ट्रक-ट्रॅव्हल चा भीषण अपघात

चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वरोरा येथे ट्रक-ट्रॅव्हल चा भीषण अपघात

अपघातात दोन्ही ड्रायव्हर जागीच ठार
 
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
           : महामार्गावर वरोरा शहरातील आनंदवन चौक ते रत्नामाला चौक लागत लगान बार समोर झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाच वाजताच्या सुमारास घडली.        

अधिक माहिती नुसार चंद्रपूर वरून नागपूर कडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच. ३४ बीजी ९५४० ला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॉवेल्स क्र.एम.एच.४० एटी ४८१ ने वरोरा महामार्गावर द्विभाजक तोडून जबर धडक दिली. यात ट्रक चालक अमरदीयप बुजाडे, वय (३२) रा . चिखल गाव ता.वणी व ट्रॉव्हेल्स चालक शेख साबीर,वय (४८ ) रा. जलनगर चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला

         या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक २ तास खोळंबली होती. काही जख्मी प्रवासी ट्रॉव्हेल्स मध्ये फसल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी खूपच करावी लागली. जख्मीमध्ये हर्षदा झाडे, (वनली, ) सुमित मानकर,(वणी,) प्रवीण घाटे, (वरोरा,) प्रणाली नंदकटे, टेंभुर्डा सुरज दाते, मजरा, संतोष गाळगटे, (भद्रावती) रीना बागेसर, भोजराज बागेसर,अनिता परचाके (घुग्घुस),रूक्मा तुलस (कोरपना) सविता रांगडे, प्राची झगडे, सरस्वती डाहुले, आवेश अहमद (घुग्घुस) आदींचा समावेश आहे.
         ट्रॉव्हेल्स चालक मोबाईलवर बोलत असल्याने टॉवेल्स अनियंत्रित होऊन अपघात घटला असे सागितले जाते. तर टायर फुटल्याने ट्रॉव्हेल्स अनियंत्रित झाल्याचे बोलले जाते. याबाबत वरोरा पोलीस अधिक तपास करीत आहे.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जख्मींची विचारपुस केली.

ट्रॅव्हल्स चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने डीवाईडर वरील पोल तोडून ट्रकला धडक दिली. एवढी भीषण धडक होती की ट्रक व ट्राईव्हल्स चे दोन्ही ड्रायव्हर जागीच ठार झाले तर त्यांना क्रेनच्या साह्याने पात्रे तोडून काढावे लागले.  यामध्ये ट्रॅव्हल्स मधली दोन ते तीन प्रवासी ठार झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांची नावे अजूनही समोर आली नाही. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते काही गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

सोमवार, जानेवारी १०, २०२२

कवी पंडित लोंढे लिखित "वळण" काव्यसंग्रहाचे विमोचन

कवी पंडित लोंढे लिखित "वळण" काव्यसंग्रहाचे विमोचन





शिरीष उगे(वरोरा प्रतिनिधी)
:झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा चा २२ वा वर्धापन दिन सोहळा तथा कवी पंडित लोंढे यांच्या "वळण" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कर्मविर विद्यालय, वरोरा येथे दि.९/१/२०२२ ला दिमाखदार सोहळ्यात पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी साहित्तिक मा.धनंजय साळवे गटविकास अधिकारी पोंभुर्णा ,विशेष पाहुणे म्हणून मा.बाळुभाऊ धानोरकर ,मा.आमदार प्रतिभाताई धानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य ना.गो.थुटे जेष्ठ साहित्तिक,मा.मदनराव ठेंगणे,मा.लक्ष्मणराव गमे,मा.सुधाकर कडू ,मा.शरद तिखट हे होते.सर्व मान्यवरांचा सत्कार शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी सु.वि.साठे यांनी झाडीबोली गौरव गीत गायीले, प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष पंडित लोंढे यांनी केले त्यानंतर मा.तु खिरटकर यांनी दिवंगत संजयजी देवतळे माजी सांस्कृतीक मंत्री म.रा. व झाडीबोली साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत बापुरावजी टोंगे यांच्या यांच्या योगदानाप्रती शब्दसुमनातून अवगत केले व दिपप्रज्वलन माल्यार्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी साहित्तिक मा.धनंजय साळवे गटविकास अधिकारी पोंभुर्णा, विशेष पाहुणे म्हणून मा.बाळुभाऊ धानोरकर खासदार, चंद्रपूर ,मा.प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य ना.गो.थुटे जेष्ठ साहित्तिक, मा.मदनराव ठेंगणे, लक्ष्मणराव गमे,सुधाकर कडू, मा.शरद तिखट हे होते.ह्या सर्वांची भाषणे झाली.
कार्यक्रमात वळण काव्यसंग्रहाचे पुस्तकाचे भाष्यकार म्हणून मा.अविनाश पोईनकर युवा कवी तथा समाजसेवक तर मा.इरफान शेख प्रसिद्ध साहित्तिक यांचेसह विशेष अतिथी व मान्यवरांचे हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.मंडळाचे वतीने आमदार महोदय प्रतिभाताई व कवी पंडित लोंढे यांचा वाढदिवस संयुक्तरित्या केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष कवी पंडित लोंढे यांचा व आचार्य ना.गो.थुटे ८ वे राज्यस्तरिय मराठी बोली साहित्य संमेलनाध्यक्ष यांचा साहित्तिक कार्याबद्दल मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. साहित्य चळवळ, "वळण" काव्यसंग्रहावर तसेच वरोरा झाडीबोली मंडळाच्या २२ वर्षाच्या वाटचालीवर मा.बाळूभाऊ धानोरकर यांनी स्तुतिसुमने उधळली. व साहित्य हे लेखकांनी ,कविंनी निर्भिडपणे लोककल्यानासाठी, लोकजागृतीसाठी निर्भयपणे लिहावे व त्याच्या संवर्धनासाठी आमचे सहकार्य नक्की राहिल हे अभिवचन दिले. मा प्रतिभाताईंनी वरोरा झाडीबोली मंडळाच्या कार्याबद्दल व उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
त्यानंतर इतर मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय साळवे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून नव साहित्तीक मंडळींना पुढे आणण्यासाठी जुन्या जाणत्या साहित्तीकांनी प्रयत्न करावे,व एक सशक्त लोकचळवळ उभी करावी त्यासाठी त्यांना बळ देण्याचे कार्य प्रत्येक गावागावातून घडावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे संचालन दीपक शिव यांनी तर आभार चंद्रशेखर कानकाटे सचिव यांनी मानले.दुसरे सत्र स्व.बापुरावजी टोंगे यांचे स्मृतीप्रित्यर्थ निमंत्रितांचे बहारदार काव्यसंमेलन झाले या सत्राचे अध्यक्ष कवी नरेद्र कन्नाके होते तर मंचावर श्रीमती नानेबाई टोंगे व चंद्रकला मत्ते ह्या होत्या. हे होते त्या सत्रात तब्बल ३५ कविनी सहभाग घेतला त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सन्माणित करण्यात आले.संचालन कवयीत्री भारती लखमापूरे यांनी तर आभार कवी संजय जांभुळे यांनी मानले.
एकंदरित बहारदार असा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झा.बो.सा.मंडळाचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
कवी पंडित लोंढे लिखित "वळण" काव्यसंग्रहाचे विमोचन #valan #kavyasangraha

कवी पंडित लोंढे लिखित "वळण" काव्यसंग्रहाचे विमोचन #valan #kavyasangraha





शिरीष उगे(वरोरा प्रतिनिधी)
              :झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा चा २२ वा वर्धापन दिन सोहळा तथा कवी पंडित लोंढे यांच्या "वळण" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कर्मविर विद्यालय, वरोरा येथे दि.९/१/२०२२ ला दिमाखदार सोहळ्यात पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी साहित्तिक मा.धनंजय साळवे गटविकास अधिकारी पोंभुर्णा ,विशेष पाहुणे म्हणून मा.बाळुभाऊ धानोरकर ,मा.आमदार प्रतिभाताई धानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य ना.गो.थुटे जेष्ठ साहित्तिक,मा.मदनराव ठेंगणे,मा.लक्ष्मणराव गमे,मा.सुधाकर कडू ,मा.शरद तिखट हे होते.सर्व मान्यवरांचा सत्कार शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी सु.वि.साठे यांनी झाडीबोली गौरव गीत गायीले, प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष पंडित लोंढे यांनी केले त्यानंतर मा.तु खिरटकर यांनी दिवंगत संजयजी देवतळे माजी सांस्कृतीक मंत्री म.रा. व झाडीबोली साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत बापुरावजी टोंगे यांच्या यांच्या योगदानाप्रती शब्दसुमनातून अवगत केले व दिपप्रज्वलन माल्यार्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी साहित्तिक मा.धनंजय साळवे गटविकास अधिकारी पोंभुर्णा, विशेष पाहुणे म्हणून मा.बाळुभाऊ धानोरकर खासदार, चंद्रपूर ,मा.प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य ना.गो.थुटे जेष्ठ साहित्तिक, मा.मदनराव ठेंगणे, लक्ष्मणराव गमे,सुधाकर कडू, मा.शरद तिखट हे होते.ह्या सर्वांची भाषणे झाली.
कार्यक्रमात वळण काव्यसंग्रहाचे पुस्तकाचे भाष्यकार म्हणून मा.अविनाश पोईनकर युवा कवी तथा समाजसेवक तर मा.इरफान शेख प्रसिद्ध साहित्तिक यांचेसह विशेष अतिथी व मान्यवरांचे हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.मंडळाचे वतीने आमदार महोदय प्रतिभाताई व कवी पंडित लोंढे यांचा वाढदिवस संयुक्तरित्या केक कापून साजरा करण्यात आला.
 यावेळी मंडळाचे अध्यक्ष कवी पंडित लोंढे यांचा व आचार्य ना.गो.थुटे ८ वे राज्यस्तरिय मराठी बोली साहित्य संमेलनाध्यक्ष यांचा साहित्तिक कार्याबद्दल मान्यवरांचे  हस्ते सत्कार करण्यात आला. साहित्य चळवळ, "वळण"  काव्यसंग्रहावर तसेच वरोरा झाडीबोली मंडळाच्या २२ वर्षाच्या  वाटचालीवर मा.बाळूभाऊ धानोरकर यांनी स्तुतिसुमने उधळली. व साहित्य हे लेखकांनी ,कविंनी निर्भिडपणे लोककल्यानासाठी, लोकजागृतीसाठी निर्भयपणे लिहावे व त्याच्या संवर्धनासाठी आमचे सहकार्य नक्की राहिल हे अभिवचन दिले. मा प्रतिभाताईंनी वरोरा झाडीबोली मंडळाच्या कार्याबद्दल व उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
         त्यानंतर इतर मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय साळवे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून नव साहित्तीक मंडळींना पुढे आणण्यासाठी जुन्या जाणत्या साहित्तीकांनी प्रयत्न करावे,व एक सशक्त लोकचळवळ उभी करावी त्यासाठी त्यांना बळ देण्याचे कार्य प्रत्येक गावागावातून घडावे असे आवाहन केले.
       या कार्यक्रमाचे संचालन दीपक शिव यांनी तर आभार चंद्रशेखर कानकाटे सचिव यांनी मानले.दुसरे सत्र  स्व.बापुरावजी टोंगे यांचे स्मृतीप्रित्यर्थ निमंत्रितांचे बहारदार काव्यसंमेलन झाले या सत्राचे अध्यक्ष कवी नरेद्र कन्नाके होते तर मंचावर श्रीमती नानेबाई टोंगे व चंद्रकला मत्ते ह्या होत्या. हे होते त्या सत्रात तब्बल ३५ कविनी सहभाग घेतला त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सन्माणित करण्यात आले.संचालन कवयीत्री भारती लखमापूरे यांनी तर आभार कवी संजय जांभुळे यांनी मानले.
      एकंदरित बहारदार असा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झा.बो.सा.मंडळाचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

शुक्रवार, जानेवारी ०७, २०२२

जयपाल सिंग मुंडा यांची आदिवासी समाजातर्फे जयंती साजरी

जयपाल सिंग मुंडा यांची आदिवासी समाजातर्फे जयंती साजरी


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने १९२८ मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या भारतीय हाँकी टिमचे कँप्टन, राज्य घटना निर्मिती उपसमितीचे सदस्य व आदिवासी जमातींचे संविधानिक अधिकार सुरक्षित ठेवणारे माजी संसदपटू सदस्य मा. जयपाल सिंग मुंडा यांची ११९ वी जयंती आदिवासी समाज भवनाच्या खुल्या जत्रा मैदानावर वरोरा येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा वरोरा व आदिवासी कला संवर्धन समितीच्या वतीने नुकतीच साजरी करण्यात आली.
  यावेळी महिला सक्षमीकरण, वर्तमान समाजव्यवस्थेत आदिवासी महिलांचे स्थान तसेच आदिवासी महिलांनी विविध क्षेत्रांत केलेली उल्लेखनीय प्रगती, आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेला हारार्पण करून काव्यांगणचे राज्य कार्यकारी कार्याध्यक्ष प्रा. निरज आत्राम यांनी प्रतिमेचे पुजन केले. यावेळी शरद मडावी, आदिवासी कला संवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष परमानंद तिराणिक, नितीन आत्राम, ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा संघटिका रजनी मेश्राम, कोमल आत्राम, भोई समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अलका पचारे, जोशीला नागपूरे, आकाश सोयाम , रिया पचारे, अनिल मेश्राम, नत्थुजी वलादे व इतर सामाजिक कार्यक्षेत्रातील व्यक्तींची विशेष उपस्थिती होती.

गुरुवार, जानेवारी ०६, २०२२

मूकबधिर विद्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार

मूकबधिर विद्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार



शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
:आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवन ही कर्णबधिर मुला- मुलींना शिक्षण देणारी नामांकित शाळा आहे. सन १९८३ पासून सुरू झालेल्या या शाळेत अनेक प्रतिभावंत व गुणवंत शिक्षक कर्मचारी होऊन गेले. त्यांनी अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी सुद्धा घडवले आहेत. या शाळेतून अनेक कर्मचारी आता सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यापैकी काही शिक्षक कर्मचारी कोरोना प्रादुर्भावाच्या उच्चांक काळात सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला नव्हता.
दि.४ जानेवारी ला नववर्षाच्या पर्वावर व अंधाच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देणारे लुईस् ब्रेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार व कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेले सोपान हंगे, कनिष्ठ लिपिक रमेश क्षीरसागर, शाळा काळजीवाहक हिरामण शेरकी, दि. ३१ डिसेंबर २०२१ ला निवृत्त झालेले विशेष शिक्षक, दीपक शिव व ३१ जानेवारी २०२२ ला सेवानिवृत्त होणारे कर्मचारी नंदादीप देवगडे यांचा शाल, श्रीफळ, ग्रिटींग देवून सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान महारोगी सेवा समितीचे विश्वस्त तथा आनंद अंध विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुधाकर कडू यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून म.से.स. वरोराचे विश्वस्त व स्वरानंदवनचे प्रमुख सदाशिवराव ताजने,आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन च्या मुख्याध्यापिका विद्या टोंगे, संधिनिकेतन अपंगांच्या कर्मशाळेचे अधिक्षक रवींद्र नलगिंटवार, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर मंचावर उपस्थित होते. आनंद मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भसारकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला व भविष्यातील आव्हानेही मांडली तर शाळेतील वाचाउपचार तज्ज्ञ घोलप यांनी आपल्या मनोगतातून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. सदाशिवराव ताजने व सुधाकर कडू यांनी आपल्य भाषणातून शाळेच्या प्रारंभापासूनचा दृष्टीपट सादर केला. दीपक शिव, हंगे सर, हिरामण शेरकी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे वातावरण भावुक झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विशेष शिक्षिका सीमा बावणे व सामाजिक कार्यकर्ता गुलाब शेंडे यांनी केले तर सुहास देवडे यांनी अतिथींचे व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.या प्रसंगी श्रद्धेय बाबा व मातृतुल्य साधनाताई यांचे तैलचित्र काढल्याबद्दल शाळेतील कलाशिक्षक प्रल्हाद ठक यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव आदरणीय डाॅ.विकासभाऊ व डाॅ. भारतीताई आमटे यांचे आशीर्वाद लाभले. संस्थेचे विश्वस्त मा.कौस्तुभ आमटे व पल्लवीताई आमटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य प्राप्त झाले.

रविवार, जानेवारी ०२, २०२२

विद्यार्थ्यांना वरोरा पोलिस स्टेशनच्या वतीने सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती

विद्यार्थ्यांना वरोरा पोलिस स्टेशनच्या वतीने सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे सायबर गुन्हे कसे घडतात त्याला आपण कसे सतर्क राहावयास पाहिजे याबाबत आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे विद्यार्थ्यांना वरोरा पोलिस स्टेशनच्या वतीने जनजागृती एका कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. "जागरूक वा सुरक्षित रहा" सायबर साक्षर नारा असणाऱ्या सायबर जनजागृती कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकिरण मडावी यांनी सायबर युग म्हणजे काय हे सांगून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सायबर सुरक्षिततेची गरज बँक एटीएम संबंधित होत असलेली फसवणूक तसेच फेक लिंकचा वापर करून लोकांना फसवणे यासंबंधीचे मार्गदर्शन विविध व्हिडीओ क्लिप दाखवून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे विषयी जागरूक केले.
यासोबतच लैंगिक भावना भडकणाऱ्या व्हिडिओ पासून दूर राहण्याचे आवाहन केले . यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष्य नोपाणी व आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंद निकेतन महाविद्यालय वुमन ग्रीन असेल समन्वयक प्राध्यापक डॉ. रंजना लाड, सदस्य प्राध्यापक डॉ. धनश्री पाचभाई, प्राध्यापक डॉ. संयोगिता वर्मा, प्राध्यापक कल्याणी आत्राम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन किरण मेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार निकिता माणुसमारे यांनी मानले.

मंगळवार, डिसेंबर २८, २०२१

पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

*लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
*आठमुर्डी ग्रामपंचायत येथील घटना

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
:शेतात चार ते पाच घराचे सांडपाणी येत असल्याने पिकाचे नुकसान होते याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली त्याचा सकारात्मक अहवाल तक्रारकर्त्या च्या बाजूने देण्याकरिता पाच हजार रुपयाची लाच कंत्राटी ग्रामसेवकाने मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या चंद्रपूरच्या चमूने आज एका ग्रामसेवकाला अटक केल्याची घटना वरोरा तालुक्यातील आठमुर्डी येथे घडली.
वरोरा तालुक्यातील आठमुर्डी व खापरी येथील ग्रामपंचायत चा पदभार कंत्राटी ग्रामसेवक लोकेश नामदेव शेंडे यांच्याकडे आहे आठमुर्डी येथील गावालगतच्या शेतात चार ते पाच घरातील सांडपाणी येत असल्यामुळे पिकांचे नुकसान होते त्यामुळे सात महिन्यापूर्वी तक्रारदाराने वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली सदर कार्यालयाने मोका चौकशी करण्याकरिता पंचायत समितीला आदेश दिले पंचायत समितीने ग्रामसेवकास मोका चौकशी करण्याबाबत पत्र दिले 22 डिसेंबर रोजी तक्रारदाराने ग्रामसेवकास मोका चौकशीबाबत विचारणा केली असता सकारात्मक अहवाल तुमच्या बाजूने देतो त्याकरिता पाच हजार रुपये हवे आहे याबाबत तक्रारदाराने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे तक्रार दिली त्यानंतर तक्रारदारास ग्रामसेवकाने दोन-तीन दिवसात पाच हजार रुपये घेऊन ये असे सांगितले 27 डिसेंबर रोजी कंत्राटी ग्रामसेवक वरोरा पंचायत समिती कार्यालयांमध्ये आहो असे सांगत तक्रारदारास बोलवले तक्रारदार लाच देण्यास गेला असता ग्रामसेवकास संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही परंतु लाचेची मागणी केल्यावरून कंत्राटी ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चंद्रपूर च्या चमूने ताब्यात घेतले वृत्त लिहीपर्यंत कारवाई सुरू होती सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप अधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात अजय वाघे सर रोशन चांदेकर रवी डेंगळे वैभव गाडगे सतीश सिडाम आदींनी केली .

सोमवार, डिसेंबर २७, २०२१

मूकबधिर विद्यालयात श्रद्धेय बाबा-मातृतुल्य साधनाताई यांच्या तैलचित्राचे अनावरण

मूकबधिर विद्यालयात श्रद्धेय बाबा-मातृतुल्य साधनाताई यांच्या तैलचित्राचे अनावरण


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
            : बाबा आमटे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध महारांगोळीकार, आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवनचे कलाशिक्षक श्री.प्रल्हाद ठक यांनी काढलेल्या बाबा व ताई यांच्या तैलचित्राचे अनावरण व भारत जोडो अभियानाचे सहयोगी माजी प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे लातूर यांनी केले.
या प्रसंगी महारोगी सेवा समितीचे सचिव मा.विकासभाऊ आमटे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव मा.माधव बागवे, दगडुजी लोमटे(कवी) -भारत जोडो अभियान सहयात्री, म.से.स. चे विश्वस्त डाॅ.विजय पोळ, सुधाकर कडू व आनंदवनाचे ज्येष्ठ कार्यकर्ता कविश्वर काका, संधिनिकेतनचे अधिक्षक श्री. रवींद्र नलगिंटवार, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सेवकराम बांगडकर, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय भसारकर, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.काळे, आनंदवनाचे युवा कार्यकर्ता श्री. राजेश ताजने, आनंदवनचे उपसरपंच श्री.शौकत खान व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवनचे सामाजिक कार्यकर्ता गुलाब शेंडे, ज्येष्ठ शिक्षक श्री दीपक शिव, वाचाउपचार तज्ज्ञ श्री. रविकांत घोलप अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे याप्रसंगी सहकार्य लाभले. हे सुंदर व बोलके तैलचित्र आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवन येथे मुख्याध्यापक कार्यालयात लावण्यात आले आहे.

गुरुवार, डिसेंबर १६, २०२१

साहित्यगंध पुरस्काराने परमानंद तिराणिक सन्मानित

साहित्यगंध पुरस्काराने परमानंद तिराणिक सन्मानित


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: सामाजिक तथा कलाक्षेत्रातील सेवेसह उल्लेखनीय " एक लाख पोस्टकार्डावर " संविधानाची उद्देशिका" स्वहस्ताक्षरात लिहून जनजागृती करत असल्याबद्दल मराठीचे शिलेदार बहुउद्देशिय संस्था, नागपूर या सामाजिक संस्थेने परमानंद तिराणिक, कलाशिक्षक यांना डाँ. बाबासाहेब आंबेडकर, सांस्कृतिक सभागृहात "साहित्यगंध पुरस्काराने" मा.प्रा. प्रशांत मांजरखेडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
परमानंद तिराणिक अनेक वर्षांपासून विविध ताज्या घडामोडींवर आपल्या कलेच्या माध्यमातून "कचऱ्यातून कलानिर्मिती" हा प्रोजेक्ट हाती घेतला असून आदिवासी कला संवर्धन समितीच्या अंतर्गत टाकवू वस्तूपासून कलेच्या दृष्टीकोणातून निसर्गातच सोंदर्य कसे निर्माण करता येऊ शकते याचा ते प्रचार आणि प्रसार करून या माध्यमातून जनजागृती करीत आहेत..
यांच्या कार्याची दखल घेत त्यांना नागपूर येथे एका शानदार सोहळ्यात, पुष्पगुच्छ तथा साहित्यगंध दिवाळी अंक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजक मराठीचे शिलेदार बहुउद्देशिय संस्थाचे राज्य अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले होते. यावेळी प्रमुख पाहूने म्हणून सुधाकर भूरके, 'भेटी लागे जिवा' या मराठी चित्रपटाच्या निर्माती प्राजक्ता खांडेकर , शिवाजी नामपले, आदिवासी रणरागीणीच्या प्रमुख रजनी मेश्राम , अल्का पचारे, नागेश्वर गेडाम इत्यादी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती...