Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १८, २०२२

भोई समाजा तर्फे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ शहाजी राजे भोसले यांची जयंती साजरी

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ शहाजी राजे भोसले यांची जयंती भोई समाज महीला जिल्हाध्यक्ष अल्काताई पचारे यांच्या उपस्थिती नुकतीच साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ एक आदर्श आई ज्यांनी एका वीर शुरपुञाला जन्म दि ला व छञपती शिवाजी महाराज यांना अस घडवलं ज्याच्यामुळे आपण आज स्वातंञ या शब्दाचा खरा अर्थ जाणतो व त्यांचा आदर्श पुढे ठेवतो.
प्रत्येक आईनीं आपल्या लेकराला छञपती शिवाजी महाराज्या सारंख घडवावं असे विचार अल्काताई पचारे यांनी मांडले.
कार्यक्रमात साविञीच्या लेकींचा सन्मान करण्यात आला जिजाऊ ते साविञी हा ऊपक्रम राबविला गेला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून लाभलेली दिक्षा मडावी हीचा पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.  त्यांनी महीला समोर आपले विचार व्यक्त केले. महीलांनी सर्वच श्रेञात पुढे यांव, मुलींनी शिकुन खूप मोठं होऊन आपला व सर्व महीलांचा विकास कसा करता येईल याचा वरभर द्यावा.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिल्पा रूयारकर मा.नगरसेविका न.प.वरोरा, मायाताई रूयारकर, नंदा रूयारकर, संगीता रूयारकर, शारदा पचारे,
छाया करलूके, बेबी रूयारकर, पार्वता रूयारकर, नंदनी पचारे, लक्ष्मी करलुके, प्रियंका मोहीनकर, कविता रूयारकर, शंकुतला रूयारकर, प्रेमीला रूयारकर, चिनकाबाई रूयारकर,सरला पारशिवे, अल्का नागपुरे, शशिकला रूयारकर, शालु मांढरे ,कविता करलुके, शारदा करलुके, सिंधु दुर्गे, ज्योती रूयारकर, मंगला कामतवार शोभा करलुके क लावती करलुके पल्लवी रूयारकर, मिनल रूयारकर,अनिता करलुके भोई समाजातील महीलां उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.