Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी १९, २०२२

पोम्भूर्णा नगर पंचायती वर भाजपाचा झेंडा, 10 जागा जिंकत स्पष्ट बहुमत #bjp




आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या झंझावाताची किमया


माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील पोम्भूर्णा नगर पंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली असून 17 पैकी 10 जागा जिंकत भाजपाने ही नगर पंचायत पुन्हा काबिज केली आहे.

पोम्भूर्णा नगर पंचायत क्षेत्रात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात विकासाची अभूतपूर्व अशी कामे करण्यात आली. या निवडणूकीत भाजपाने केलेल्या विकासाचा आलेख जनतेसमोर मांडला. नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासभिमुख शैलीवर विश्वास ठेवत बहुमताचा कौल बहाल करत नगर पंचायतीची सत्ता भाजपच्या हाती सोपविली आहे.

*पोंभूर्णा नगरपंचायत निवडणुकीतील विजयी भाजपा उमेदवार*


क्र.२ आकाशी सुगत गेडाम *भाजपा*

क्र.३ श्वेता महेंद्र वनकर *भाजपा*

क्र.४ सुलभाताई गुरुदास पिपरे *भाजपा*

क्र.८ नंदाताई ऋषी कोटरंगे *भाजपा*

क्र.९ शारदा प्रशांत गुरनुले *भाजपा*

क्र.१० लक्ष्मण उद्धव कोडापे *भाजपा*

क्र.१२ रोहिणी रुपेश ढोले *भाजपा*

क्र.१३ अजित अरुणराव मंगळगिरीवार *भाजपा*

क्र.१५ उषा सदाशिव गोरंतवार *भाजपा*

क्र.१७ दर्शन गजानन गोरंटिवर *भाजपा*



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.