नागपूर : नागपुरातील दयानंद पार्क परिसरात एकाच घरातील चौघांचे मृतदेह, आढळल्याने परिसरात तसेच नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.पत्नी,मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपासात समोर येत आहे.
आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करत स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहेत.
मदन अग्रवाल असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव असून मदन याने गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी किरण, मुलगा वृषभ आणि मुलगी तोषिता यांची चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मदन हा चायनीजचा स्टॉल चालवत होता.मागील अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्यावर अनेकांची उसनवारी होती. त्याच तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. दयानंद पार्क परिसरात ज्या भाड्याच्या घरी मदन अग्रवाल यांचे कुटुंब राहत होते. तिथे आज सकाळपासून कुठलीही हालचाल
झाली नाही.त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आल्याने अग्रवाल यांच्या ओळखीतल्या काही लोकांना घरात कुठलीही हालचाल नसल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी येऊन दार तोडून घरात प्रवेश केला तेव्हा मदन अग्रवाल हे गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. तर आतील खोलीत पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
The bodies of four were found in the same house Suicide of the head of the family by killing his wife and children