*लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
*आठमुर्डी ग्रामपंचायत येथील घटना
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
:शेतात चार ते पाच घराचे सांडपाणी येत असल्याने पिकाचे नुकसान होते याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली त्याचा सकारात्मक अहवाल तक्रारकर्त्या च्या बाजूने देण्याकरिता पाच हजार रुपयाची लाच कंत्राटी ग्रामसेवकाने मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या चंद्रपूरच्या चमूने आज एका ग्रामसेवकाला अटक केल्याची घटना वरोरा तालुक्यातील आठमुर्डी येथे घडली.
वरोरा तालुक्यातील आठमुर्डी व खापरी येथील ग्रामपंचायत चा पदभार कंत्राटी ग्रामसेवक लोकेश नामदेव शेंडे यांच्याकडे आहे आठमुर्डी येथील गावालगतच्या शेतात चार ते पाच घरातील सांडपाणी येत असल्यामुळे पिकांचे नुकसान होते त्यामुळे सात महिन्यापूर्वी तक्रारदाराने वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली सदर कार्यालयाने मोका चौकशी करण्याकरिता पंचायत समितीला आदेश दिले पंचायत समितीने ग्रामसेवकास मोका चौकशी करण्याबाबत पत्र दिले 22 डिसेंबर रोजी तक्रारदाराने ग्रामसेवकास मोका चौकशीबाबत विचारणा केली असता सकारात्मक अहवाल तुमच्या बाजूने देतो त्याकरिता पाच हजार रुपये हवे आहे याबाबत तक्रारदाराने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे तक्रार दिली त्यानंतर तक्रारदारास ग्रामसेवकाने दोन-तीन दिवसात पाच हजार रुपये घेऊन ये असे सांगितले 27 डिसेंबर रोजी कंत्राटी ग्रामसेवक वरोरा पंचायत समिती कार्यालयांमध्ये आहो असे सांगत तक्रारदारास बोलवले तक्रारदार लाच देण्यास गेला असता ग्रामसेवकास संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही परंतु लाचेची मागणी केल्यावरून कंत्राटी ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चंद्रपूर च्या चमूने ताब्यात घेतले वृत्त लिहीपर्यंत कारवाई सुरू होती सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप अधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात अजय वाघे सर रोशन चांदेकर रवी डेंगळे वैभव गाडगे सतीश सिडाम आदींनी केली .