Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २०, २०२३

तेली समाजाच्या कार्याध्यक्षपदी गोविल मेहरकुरे तर चंद्रपूर शहर अध्यक्षपदी गोपाल अमृतकर यांची नियुक्ती

बल्लारपूर येथे प्रा. सूर्यकांत खनके यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ तेली समाज महासंघाची बैठक




चंद्रपूर : जिल्ह्यात तेली समाज संख्येने मोठा असला तरी प्रत्यक्षात संघटित नसल्यामुळे सामाजिक राजकीय क्षेत्रात मागे आहे. करिता सभा ,संमेलने ,मेळावे व चिंतन सभा ,समाज प्रबोधन इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील बंधूंना ,भगिनींना व युवांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके यांनी केले.

बल्लारपूर येथील संताजी सभागृहात विदर्भ तेली समाज महासंघाची चिंतन बैठक पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी समाजाचे युवा नेतृत्व गोविल मेहरकुरे यांना विदर्भ तेली समाज महासंघाच्या कार्याध्यक्षपदी तर माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांची चंद्रपूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना नवनियुक्त कार्याध्यक्ष गोविल मेहरकुरे म्हणाले, जिल्ह्यात दोन तीन दशकाआधी तेली समाजाचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात नेतृत्व होते. त्यावेळी आपण महानगरपालिका व इतर क्षेत्रामध्ये देखील समाजाचे एक वजन होते. परंतु कालांतराने समाजाचे नेतृत्व हे हरवल्याचे दिसून येत आहेत. ज्या समाजाला योग्य नेतृत्व लाभत नाही. तो समाज गुलामगिरीकडे वाटचाल करीत असतो. त्यामुळे येत्या काळात समाजातील युवकांनी पुढे येऊन नेतृत्व करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

याप्रसंगी बल्लारपूर शहर अध्यक्ष सतीश बावणे म्हणाले, तेली समाज हा संख्येने मोठा आहे. परंतु संख्येप्रमाणे त्यांना राजकीय स्थान दिल्या जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. त्यासोबतच ग्रामीण भागातील मुलींना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

यावेळी चंद्रपूर शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर म्हणाले कि, तेली समाजाला प्रबोधनाची गरज आहे. अद्याप संताजी जगनाडे महाराज समाजाला कळले नाही. त्यामुळे येत्या काळात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी बंडू बावणे ,अक्षय देशमुख सरपंच तुळशीदास पिपरे बंडू गिरटकर नरेंद्र इटनकरअन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली. प्रा.डॉ. श्रावण बानासूरे यांनी उत्तम संचालन केले.

Govil Mehrakure appointed as Teli Samaja working president and Gopal Amritkar appointed as Chandrapur city president.

सभेमध्ये इटोलीचे सरपंच श्री तुळशीदास कवडूजी पिपरे व उपसरपंच श्री नरेश बुरांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .श्री अशोकराव झोडे अध्यक्ष तेली समाज बल्लारपूर, श्री यशवंतराव बोंबले सचिव तेली समाज बल्लारपूर, श्री संजय येनुरकर सहसचिव ,श्री संजय सुरकर ,श्री श्रावण बानासुरे सदस्य, पंकज भुते सदस्य ,अजय जुमडे सदस्य, किसनजी लोहबडे सदस्य, दिवाकर पिसे, धोंडूची दुधबळे इटोली, श्री पुंडलिक वासुदेव देवतळे इटोली, योगेश पिपरे इटोली, शुभम दुधबळे, विनोद गव्हारे, सुनील चीचघरे, श्री बंडू पैकण बावणे विसापूर, नरेंद्रजी इटनकर, रमेश बावणे, प्रभाकर कवलकर, रमेश शेंडे, रामभाऊ शेंडे ,गोपाल वैरागडे, गोपाल अमृतकर, गोविल मेहरकुरे चंद्रपूर, सतीश बावणे बल्लारपूर ,अशोक चांभारे उपाध्यक्ष तेली समाज बल्लारपूर ,तुळशीराम महाकाळकर कोषाध्यक्ष बल्लारपूर, श्री संतोष वैरागडे सहसचिव विसापूर, बंडू गिरडकर विसापूर, विजय गिरटकर, अक्षय देशमुख सचिव विसापूर , श्री मधुकर शेंडे बल्लारपूर, हरिदास आंबटकर, संतोष वैरागळे,मनोज बेले, श्री साईनाथ दुधबळे, राहुल कळंबे बल्लारपूर गणेश लोहबडे ,शुभम लोहबडे, लोमेश वैरागडे ,नवीन येनूरकर, पलाश कवलकर ,सतीश पाटील ,भरत कुंडले, राकेश रहाटे, भूपेंद्र खणके, कैलास रहाटे ,मनोज खणके ,गिरीश इटनकर, भाविदास गिरडकर सदर सभेला सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.*

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.