Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

महापौर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महापौर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

 महापौर नंदा जिचकार जर्मनीत

महापौर नंदा जिचकार जर्मनीत

नागपूर/ प्रतिनिधी - जर्मनीतील बॉन येथे होणा-या यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेमध्येमध्ये आयसीएलईआयच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रादेशिक कार्यकारी कमिटी सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह (साऊथ एशिया) च्या विभागीय कार्यकारी समितीवर (REXcom) निवडून आल्या आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून नागपूर आयसीएलईआय सदस्य असून आयसीएईआय दक्षिण आशिया सोबत अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि संसाधन कार्यक्षमता प्रकल्पांसाठी कार्यान्वित असून अर्बन नेक्ससच्या ऊर्जा, पाणी आणि अन्न यावर कार्य सुरू आहे.

आरईएक्सकॉमकरिता ऑनलाईन मतदान करण्यात आले होते. यामध्ये दक्षिण आशियामधून ४१ सदस्यांनी मतदान केले. भारताला या निवडणुकीत दुसरे सर्वाधिक म्हणजेच २८ मते मिळाली. मतदानाची प्रक्रिया महिनाभर सुरू होती. ६ ऑक्टोबर रोजी मतदान बंद करण्यात आले. निकाल १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. महापौर नंदा जिचकार ह्यांचा विषय संसाधन कार्यक्षमता हा असून या क्षेत्रातील कामांना नागपूर शहरातच नव्हे तर विभागात प्रोत्साहन देण्यासाठी त्या कार्य करतील. आरईएक्सकॉमच्या सदस्या म्हणून जर्मनी बॉन येथे १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित परिषदेत त्या सहभागी होणार आहेत. यात त्या नागपूरमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती जागतिक पातळीवर सादर करणार आहे.
१४ नोव्हेंबर रोजी मनपातर्फे चिटणीस पार्क येथे बालदिन

१४ नोव्हेंबर रोजी मनपातर्फे चिटणीस पार्क येथे बालदिन

नागपूर/प्रतिनिधी  : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बालक दिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक रा.पै. समर्थ स्टेडियम, चिटणवीस पार्क येथे बालक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहील. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, बसपा पक्षनेता मो. जमाल, शिवसेना पक्ष नेता किशोर कुमेरिया, राकाँ पक्षनेता दुनेश्वर पेठे, गांधीबाग झोनच्या सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक यावेळी उपस्थित राहतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकी संध्या मेडपल्लीवार यांनी केले आहे.

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार यांची नवी मुंबईच्या महापौरपदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार यांची नवी मुंबईच्या महापौरपदी निवड

नवी मुंबई  – नवी मुंबईच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयवंत सुतार यांची  निवड झाली आहे. आज पार पडलेल्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीत सुतार यांना ६७ मते मिळाली. तर, शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांना केवळ ३८ मते मिळाली. सुतार हे नवी मुंबईचे १३ वे महापौर म्हणून आपला कारभार पाहणार आहेत. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी म्हात्रे या निवडून आल्या आहेत. म्हात्रे यांना एकूण ६४ मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांना ३८ मते मिळाली.