Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

महापौर नंदा जिचकार जर्मनीत

नागपूर/ प्रतिनिधी - जर्मनीतील बॉन येथे होणा-या यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेमध्येमध्ये आयसीएलईआयच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रादेशिक कार्यकारी कमिटी सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह (साऊथ एशिया) च्या विभागीय कार्यकारी समितीवर (REXcom) निवडून आल्या आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून नागपूर आयसीएलईआय सदस्य असून आयसीएईआय दक्षिण आशिया सोबत अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि संसाधन कार्यक्षमता प्रकल्पांसाठी कार्यान्वित असून अर्बन नेक्ससच्या ऊर्जा, पाणी आणि अन्न यावर कार्य सुरू आहे.

आरईएक्सकॉमकरिता ऑनलाईन मतदान करण्यात आले होते. यामध्ये दक्षिण आशियामधून ४१ सदस्यांनी मतदान केले. भारताला या निवडणुकीत दुसरे सर्वाधिक म्हणजेच २८ मते मिळाली. मतदानाची प्रक्रिया महिनाभर सुरू होती. ६ ऑक्टोबर रोजी मतदान बंद करण्यात आले. निकाल १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. महापौर नंदा जिचकार ह्यांचा विषय संसाधन कार्यक्षमता हा असून या क्षेत्रातील कामांना नागपूर शहरातच नव्हे तर विभागात प्रोत्साहन देण्यासाठी त्या कार्य करतील. आरईएक्सकॉमच्या सदस्या म्हणून जर्मनी बॉन येथे १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित परिषदेत त्या सहभागी होणार आहेत. यात त्या नागपूरमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती जागतिक पातळीवर सादर करणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.