Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

आज महापौर चषक शरीर सौष्ठव स्पर्धा

  • नागपूर महानगरपालिका आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे आयोजन

नागपूर/प्रतिनिधी  : नागपूर महानगरपालिका आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने १२ नोव्हेंबर रोजी लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर सायंकाळी ६ वाजता शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख मार्गदर्शक उपस्थित राहतील तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. यावेळी खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, आ. वी.बी.बी.ए.चे अध्यक्ष चंद्रशेखर गाडगीळ, आय.बी.बी.एफ.चे महासचिव चेतन पठारे, आ. जोगेंद्र कवाडे, अ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. नागो गाणार, आ.विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, बसपा पक्षनेता मो. जमाल, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, राकाँ पक्ष नेता दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेता किशोर कुमेरिया, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका मनिषा धावडे, आय.बी.बी.एफ.चे अध्यक्ष प्रेमचंद डेगरा उपस्थित राहतील. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे संयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, मनपाचे अपर आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.