नागपूर/प्रतिनिधी : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बालक दिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक रा.पै. समर्थ स्टेडियम, चिटणवीस पार्क येथे बालक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहील. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, बसपा पक्षनेता मो. जमाल, शिवसेना पक्ष नेता किशोर कुमेरिया, राकाँ पक्षनेता दुनेश्वर पेठे, गांधीबाग झोनच्या सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक यावेळी उपस्थित राहतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकी संध्या मेडपल्लीवार यांनी केले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
चंद्रपूर येथे आज आरोग्य शिबिरचंद्रपू
नागपुरातील "हा" पूल होणार इतिहासजमा; 19 पासून "या" मार्गात वाहतूक बंद Railway Station Flyover Demolitioनागपूर : बहुप्रतिक्षित टेकडी उड्डाणपूल पाडण्याचे
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी डाबरने केले मार्गदर्शन Dabur डाबर इंडियाचा उपक्रमखेळाडूंच्या आरोग्य जनजागृतीबा
कोंढाळी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होणार.. रूपांतर होणारनागपूर -
आवळे जयंतीनिमित्त परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केल्या भावना कर्मवीर हरिदास आवळे हे आंबेडकरी चळवळीचे खरे ध्वजव
त्या अपघातातील जखमी पत्रकाराचे निधन sunil somkuvar🕯️ *निधन वार्ता* 🕯️ (adsbygoogle
- Blog Comments
- Facebook Comments