Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नगरपालिका ते मनपा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नगरपालिका ते मनपा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, नोव्हेंबर १९, २०१७

चंद्रपूर येथे आज आरोग्य शिबिर

चंद्रपूर येथे आज आरोग्य शिबिर

चंद्रपूर - महानगरपालिका तथा महिला बाल कल्याण समिति व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने बाहय-संपर्क आरोग्य शिबिर २० नोव्हेंबर ला
शेडमाके सभागृह , मस्जिद रोड बाबूपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे.

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

मनपा उपायुक्तांसह पीएने घेतले २० हजार

मनपा उपायुक्तांसह पीएने घेतले २० हजार


अकोला/प्रतिनिधी: बिअरशॉपीच्या परवाण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मनपा उपायुक्तांना स्वीयसहायकासह अटक करण्यात आली.

३० वर्षीय फिर्यादी यांचे हॉटेल आहे. त्यांनी बिअरशॉपीच्या शॉपॲक्टसाठी मनपाकडे अर्ज केला. या अर्जाच्या परवानगीसाठी मनपा उपायुक्त (प्रशासन व विकास) समाधान चांगो सोळंके यांच्याकडे आला. अर्जदाराला बुधवारी दुपारी समाधान सोळंके यांनी त्याच्या कक्षात बोलावून स्वीयसहायक राजेश रामदास जाधव (४३) यांच्यातर्फे २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे फिर्यादींनी ठरविले. स्वीयसहायक राजेश जाधव व त्याचे दोन साथीदार हे रात्री साडेआठ वाजता फिर्यादीच्या हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता व पैसे घेण्याकरिता गेले. फिर्यादीने त्यांना २० हजार रुपये दिल्याबरोबर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने राजेश जाधव यास पैसे स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या अटकेनंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याचे सांगितल्यानंतर एसीबीने सोळंके यांना रामनगरमधील म्हाडा कॉलनीतील बंगला नं. दहा मधून अटक केली. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. एसीबीकडून या दोघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

१४ नोव्हेंबर रोजी मनपातर्फे चिटणीस पार्क येथे बालदिन

१४ नोव्हेंबर रोजी मनपातर्फे चिटणीस पार्क येथे बालदिन

नागपूर/प्रतिनिधी  : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बालक दिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक रा.पै. समर्थ स्टेडियम, चिटणवीस पार्क येथे बालक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहील. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, बसपा पक्षनेता मो. जमाल, शिवसेना पक्ष नेता किशोर कुमेरिया, राकाँ पक्षनेता दुनेश्वर पेठे, गांधीबाग झोनच्या सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक यावेळी उपस्थित राहतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकी संध्या मेडपल्लीवार यांनी केले आहे.

बुधवार, नोव्हेंबर ०८, २०१७

कोंढाळी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होणार.. रूपांतर होणार

कोंढाळी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होणार.. रूपांतर होणार

नागपूर - आज दि 8 नोव्हेंबर ला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,फडणवीस यांचेशी वर्षा येथे कोंढाळी ग्रामपंचायत चा दर्जावाढ करणेबाबत बैठक झाली.
या चर्चेत मा.आमदार देशमुख साहेब, सरपंच लालीतमोहन कालबांडे, संजयजी राऊत, स्वप्नीलजी व्यास, प्यारुजी पठाण, गोपालजी माकडे, विजयजी डहाट, प्रमोद चाफले, राठोड साहेब, नागेश गौरखेडे उपस्थित होते.
मा.मुख्यमंत्री साहेबांनी मंत्री समितीचे अध्यक्ष मा. सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांचे मार्फत कोंढाळी (ता. काटोल) नगरपंचायत करण्यासंदर्भात प्राथमिक उद्घोषणा करण्यात येईल असे सांगितले, तसेच शासन दरबारी कागदपत्रांची पूर्तता लवकरच करून घेऊन हि उद्घोषणा करण्यात येईल असे ठरले.