Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

चंद्रपूर खबरबात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चंद्रपूर खबरबात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑगस्ट ०७, २०२३

धक्कादायक! शाळेत शिक्षक नसल्याने पालकांनी काढली विद्यार्थ्यांची टीसी

धक्कादायक! शाळेत शिक्षक नसल्याने पालकांनी काढली विद्यार्थ्यांची टीसी

शिक्षक नसल्याने जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गळती

# ब्रम्हपुरी तालुका : तब्बल ७७ पदे रिक्त
# विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ
# तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था वाईट




विनोद चौधरी
 प्रतिनिधी ब्रम्हपुरी : शिक्षण या मुलभूत अधिकारापासून कुणीही वंचित राहू नये याकरिता शासनामार्फत खेडोपाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या.  प्राथमिक शाळेत आनंददायी शिक्षण मिळत असल्याने जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढू लागली. मात्र सध्या स्थितीत विरोधी पक्षनेते असलेल्या आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील ब्रम्हपुरी तालुक्याच्या शिक्षण विभागात ७७ पदे रिक्त असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्याला प्राथमिक शाळेतून काढून खाजगी शाळेत पाठविल्याने जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पटसंख्येला गळती लागल्याचे दिसून येत आहे. 

महाराष्ट्र शासनाने १० मे २०१० रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करून प्राथमिक शिक्षणाचा समावेश मूलभूत अधिकारांत केल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारने २७ ऑगस्ट २००९ च्या राजपत्रात ‘राइट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अ‍ॅण्ड कम्पल्सरी एज्युकेशन अ‍ॅक्ट, २००९’ प्रसिद्ध केला आहे. त्यात ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण भारतात लागू केला आहे. या कायद्यामुळे ६ ते १४ वर्षे वयोगटांतील सर्व बालकांना मोफत, सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची, त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची, उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनावर आहे. मात्र अनेक वर्षांपासून शिक्षक नोकर भरती प्रक्रिया झाली नाही. या कालावधीत अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. परिणामी शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.
      उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्ग असूनही शिक्षक संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. १ ते ७ वर्गाकरिता तीन ते चार शिक्षक प्रत्येक जिल्हा परीषद शाळेत असून अशातच त्यांच्या बदल्या होत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांसह पालक वर्गात संतापासह मुलांच्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. बहुतांश पालकांनी आपल्या पाल्याचा खासगी शाळेत प्रवेश दाखल केला असल्याने जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थ्यांची गळती लागली आहे. 

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग शिक्षकांकरिता निवेदन, शाळा बंद आंदोलन करित आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागात वर्ग संख्येनुसार शिक्षक नसल्याने अधिकाऱ्यांनाही शिक्षक पुरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाला नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. ही अवस्था अशीच राहिली तर तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेला घरघर लागण्याची नामुष्की ओढवली जाऊ शकते. मात्र ज्या पालकांची परिस्थिती बेताची आहे अशांची मुले  शिक्षणापासून वंचित राहून त्यांचे उज्वल भविष्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरे.

ब्रम्हपुरी तालुक्याची शिक्षण विभागाची सद्यस्थिती

ब्रम्हपुरी तालुक्यात एकूण  114 जिल्हा परिषद  शाळा आहेत. या करिता 11 पदे ही केंद्रप्रमुखांची म्हणुन मंजुर असून अकराही पदे रिक्त आहेत.तर मुख्याध्यापक पदे ही 26 आहेत कार्यरत 16 असून 10 पदे रिक्त आहेत. व  विषय  शिक्षक पदे 96 आहेत,यात कार्यरत 77 शिक्षक असून 19 पदे हि रिक्त आहेत. आणि 365  सहाय्यक प्राथमिक शिक्षकापैकी 328 शिक्षक कार्यरत आहेत. व 37 शिक्षक पदे रिक्त आहेत.


ब्रम्हपुरी या नगराला शिक्षणाचे माहेरघर असे संबोधले जाते. कारण गृह जिल्हा चंद्रपूर तसेच लगतच्या गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी ब्रम्हपुरी येथे शिक्षण घेण्यास येतात. तसेच राजकीय दृष्टया ब्रम्हपुरी या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. तेव्हा तालुक्यातील गोरगरीब घरच्या विद्यार्थ्यांना गावात शाळा राहून जर शिक्षकाविना शिक्षण मिळत नसेल तर हा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे. आणि याची जबाबदारी शासन, प्रशासन यांनी घ्यावी. अशी मागणी पालकवर्ग करत आहेत.

गुरुवार, जून १५, २०२३

निधीअभावी तालुक्यात सामाजिक सभागृहाचे बांधकाम रखडले

निधीअभावी तालुक्यात सामाजिक सभागृहाचे बांधकाम रखडले

निधीअभावी तालुक्यात सामाजिक सभागृहाचे बांधकाम रखडले


विनोद चौधरी
प्रतिनिधि ब्रम्हपुरी : तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले विविध ठिकाणी सामाजिक सभागृहाचे बांधकाम तीन वर्षापासून रखडले असून बांधकाम पूर्णत्वास न आल्यामुळे नागरिक मिळणाऱ्या सुविधेपासून वंचित आहेत.
ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे निधी अंतर्गत सन २०१९ -२० या वर्षात सार्वजनिक बांधकाम विभाग नागभिड तर्फे ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्यात आले. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे  आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनानंतर या सभागृहांच्या बांधकामाला गतीही प्राप्त झाली, मात्र राज्यात सत्ता बदलानंतर या विकास कामांना खीळ बसली आहे. निधी अभावी सामाजिक सभागृहाचे बांधकाम मंजूर असलेल्या ठिकाणी रखडले आहे. नागरिकांना लग्न व विविध समारंभाकरिता उपयोगात येणारे सामाजिक सभागृह पूर्णत्वास न आल्याने  वंचित राहावे लागत आहे. सामाजिक सभागृहाचे बांधकाम रखडल्याने परिणामी बांधकामाची दुरावस्था होत आहे.  अनेक गावात मंजूर असलेला विविध विकास कामांचा निधी मिळाला नसल्याने विकास कामे ठप्प पडली आहे.

          तालुक्यातील निलज, गांगलवाडी चौगान, जुगनाळा, मालडोंगरी, मुडझा, भुज,  हळदा, या ठिकाणी सामाजिक सभागृहाचे बांधकाम मंजूर असून बांधकाम अर्धवट करण्यात आलेले आहे. बांधकामाचा निधी रखडल्याने  व झालेल्या बांधकामात कंत्राटदारांचे पैसे गुंतले असल्याने काम करण्यास ठेकेदारांची उदासीनता दिसून येत आहे. तीन वर्षाचा कालावधी लोटूनही सामाजिक सभागृहाचे बांधकाम अद्याप पूर्णत्वास आलेले नाही. बांधकाम पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

रविवार, जून ११, २०२३

कुणबी समाज भवन निर्माणकरता कुणबी बांधवांनी बांधली वज्रमूठ

कुणबी समाज भवन निर्माणकरता कुणबी बांधवांनी बांधली वज्रमूठ

कुणबी समाज भवन निर्माणकरता कुणबी बांधवांनी बांधली वज्रमूठ 


ब्रम्हपुरी तालुक्यात समाज हितासाठी अखिल कुणबी समाज एकवटला

ब्रम्हपुरी-प्रतिनिधी:-

ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये कुणबी समाज मोठ्या संख्येने असून विविध पोट जातीमध्ये विखुरला असल्याने या समाजामध्ये एकी बघायला मिळत नव्हती. मात्र कुणबी समाजातील विविध पोट जातील मधील युवा वर्ग एकत्र येवून व अखिल कुणबी समाज मंडळाच्या अत्यारीत या युवावर्गांनी अनेक उपक्रम राबवण्याची योजना आखली आहे.

अखिल कुणबी समाज मंडळाद्वारे ब्रम्हपुरी येथे 36 आर शेतजमीन खरेदीचा करारनामा करण्यात आला असून या जागेची खरेदी करण्याकरिता एकूण 97 लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे व खरेदी पत्र बनवण्याकरिता अंदाजे तीन ते चार लाख रुपयाची परत गरज आहे .असे एकूण एक करोडच्या वर रुपये रक्कम या शेतजमिनीच्या खरेदी करिता लागणार आहे व बांधकामाकरिता याहीपेक्षा मोठी रक्कम लागणार आहे.याकरिता मुरलीधर मंदिर देवस्थान टिळक नगर ब्रम्हपुरी येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अखिल कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष ऋषी राऊत, गोविंदराव भेडारकर, प्रमोद चिमूरकर, योगेश मिसार, फाल्गुन राऊत, महेश भर्रे, गोवर्धन दोनाडकर, उमेश धोटे, विलास दुपारे, मोंटू पिल्लारे, विनोद झोडगे ,दामोधर शिंगाडे, भाऊराव राऊत, प्रेमलाल धोटे, संतोष पीलारे , विनोद चौधरी, राहुल भोयर,रुपेश देशमुख,प्रेमंचंद अवसरे, अविनाश राऊत, रामकृष्ण चौधरी , नारायण मेश्राम व कुणबी समाजातील सर्व बांधव उपस्थित होते. यावेळी कुणबी समाज भवन निर्माणकरता कुणबी बांधवांनी वज्रमूठ बांधली असून समाजातील दानसुर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.