Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ३१, २०१९

मार्चअखेर संपूर्ण देश होणार भारनियमनमुक्त:आर.के.सिंग

क्षेत्रीय परीक्षण प्रयोगशाळेचे भूमिपूजन 
नाशिक/प्रतिनिधी:

गेल्या साडेचार वर्षांत देशाच्या वीजनिर्मिती क्षमतेत तब्बल एक लाख मेगावॅटने वाढली असून सर्व राज्यांमधील शहरांमधील भारनियमन संपुष्ठात आले आहे. आता मार्च 2019 पर्यंत संपूर्ण देश भारनियमन मुक्त होणार, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी केले.

नाशिक जवळच्या शिलापूर परिसरात केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेच्या क्षेत्रीय परीक्षण प्रयोगशाळेच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे ऊर्जामंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्री. हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शीतल सांगळे, आमदार श्रीमती देवयानी फरांदे, आमदार योगेश घोलप, आमदार श्री. राजाभाऊ वाजे, माजी मंत्री श्री. बबनराव घोलप, माजी खासदार श्री. समीर भुजबळ, माजी आमदार जयवंत जाधव, अनुसंधान संस्थेचे महासंचालक व्ही. एस. नंदकुमार, ऊर्जा मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार राज पाल यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. सिंग म्हणाले, ऊर्जा विभाग निरंतर विजेचे स्वप्न साकारत असून देशभरातील सर्वच ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यात खंड पाडणाऱ्या वीज पुरवठादारांना खंडित कालावधीसाठी दंड आकारून त्याचा लाभ वीज ग्राहकांना देण्याचा धोरणात्मक निर्णय मार्चनंतर लागू करण्यात येईल. देशभरातील 1 लाख 80 हजार किलोमीटरची वाहिनी एका ग्रीडला ओडून 'एक राष्ट्र एक ग्रीड' ही संकल्पनाही प्रत्यक्षात आणली आहे. एक हजार दिवसांच्या आत देशातील प्रत्येक गावात वीज पोहचविण्यात आली. तर वीजजोडणीपासून वंचित प्रत्येक घरात वज पोहचविण्याचे उद्दिष्टही जानेवारी अखेर पूर्ण होईल. सौभाग्य योजनेतून जोडणी देण्यासाठी राज्याला दोन टप्प्यात 800 कोटी रुपयांचा निधी दिला. ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांच्या मागणीनुसार वाहिनी विलगीकरणासाठी 2 हजार रुपये महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन श्री. सिंग यांनी दिले. देशात ऊर्जा क्षेत्रात गेल्या साडेचार वर्षात झालेल्या कामांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

खासदार श्री. गोडसे म्हणाले, शिलापूरमध्ये साकारत असलेल्या प्रयोगशाळेमुळे नाशिकची ओळख 'इलेक्टिक हब' म्हणून होणार आहे. तर प्रास्ताविक करताना राज पाल यांनी 115 कोटी रुपये निधीतून येत्या 18 महिन्यात प्रयोगशाळेचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.