Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कोंढाळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोंढाळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, जुलै २३, २०१८

प्रधानमंत्री सायकल योजनेच्या नावाने विद्यार्थांची फसवनुक

प्रधानमंत्री सायकल योजनेच्या नावाने विद्यार्थांची फसवनुक

खोट्या बातम्या पसरवीण्याऱ्यांवर कडक
 कारवाई करा- आकाश गजबे
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी
वार्ताहर- कोंढाळी,/गजेंद्र डोंगरे
 साईकिल वितरण योज़ना भारत सरकारच्या नावाने फसवुनक करणारे मेसेज व्हाट्सँप व फेसबुक गेल्या काही दिवसापासुन पसरत आहे. या योजने अंतर्गत सर्व ​विद्यार्थी- विद्यार्थीनींना सायकल वाटप १५ आँगस्टला वाटप करण्यात येणार असल्याचे मेसेज मध्ये नमुद आहे. तर मेसेज मध्ये http://Bharat-Sarkar.com/साईकिल/ या सारख्या अनेक बनावटी बेवसाईट नमुद आहे. प्रधानमंत्रीं व भारत सरकारच्या नावाने योजना बनवुन व भारत सरकारचा लोगो व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटोचा अनाधिकृत वापर करुन वैयत्तिक माहीती चोरुन विद्यार्थांची फसवनुक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी तिव्र मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपुर जिल्हा उपाध्यक्ष व सोशल मिडिया प्रमुख आकाश गजबे यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. आपली वैयक्तिक माहिती चोरून आर्थिक फसवणूक केली जात आहे. पंतप्रधान सायकल योजना, हेल्मेट योजना, बॅग योजना, पुस्तक योजना, लोन योजना अशा योजनांची नावे देऊन आपला डाटा जमविला जात आहे. पंतप्रधान सायकल योजनेच्या नावाखाली भारत सरकार डॉट कॉम या साइटवर माहिती एकत्रित केली जात आहे. काहीतरी मोफत मिळतेय म्हणून कोणताही विचार न करता त्या लिंकवर जाऊन नेटिझन्स आपली माहिती भरत आहेत. हा मेसेज खरा आहे की खोटा आहे हे समजून न घेता लोकांनी आमिषाला बळी पडु नये  असेही आव्हान आकाश गजबे यांनी केले.


कोंढाळी बस स्थानकावर सी.सी.टी.वी ची नजर

कोंढाळी बस स्थानकावर सी.सी.टी.वी ची नजर

वार्ताहर -कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:
  येथील  बस स्थानकावर सी सी टी वी कॅमेरा बसविण्याची मागणी रा.प. म. चे अध्य्क्ष  व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुर्ण केल्या बाबद स्थानीक प्रवासी , विद्यार्थी व  मागणी करणाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे.
  नागपुर -अमरावती राष्ट्रिय महामार्गावरील  कोंढाळी येथील बस स्टेशन   या परिसरातिल 43 गावांचे प्रवाशी  व विद्यार्थ्यांचे  मुख्य प्रवाशी केंद्र आहे . या बस स्थानकावरून दररोज 315 चे वर बस गाड्याच्या माध्यमातून  प्रवासी सेवा देन्यात येते, मात्र सध्या  या बस स्थानकावर लांब पल्याच्या अनेक बस चे  चालक बस नोंदी  न करता आपले वाहन पुढे  निधुन जातात, या मुळे बस  आली किंवा गेली या बाबद स्थानिक वाहुतक नियंत्रकास या बाबद माहिती नसते  व यातुन प्रवासी व वाहतुक नियंत्रकात नाहक वाद होत असतात.  आता येथील बस स्थानकावर सी सी टी वी कॅमेरे बसविल्या गेल्याने येथील नोंदी न घेनारे वाहनांचे चित्रिकरन  दिसुन येऊ शकते . त्याच प्रमाणे येथील बस स्टेशनवर  विद्यार्थिपास देने , ध्वनिक्षेपकावर बस फेर्यांची जाण्या  येण्याची  सुचना  करने, बसगाड्यांना वाहन तळावर वाहने व्यवस्थित लावने या करिता येथील बस स्थानकावर सोळासे विद्यार्थ्यांना पास देने या करिता एक अतिरिक्त वाहतुक नियंत्रक  नियुक्तिची मागणी करन्यात आली आहे.सध्या येथे दोन वाहतुक  नियंत्रक 06-00-ते14-00-व14-00-ते22-00अशी कामगिरी सुरू आहे, या दरम्यान   प्रवासी बस गाड्यांच्या नोंदी व पास बनविने एकच वाहतुक नियंत्रक कडून होऊ शकत नसल्याने  अनेकदा बस नोंदी होत नाही. या दरम्यान  प्रवाशी बस फेर्याबाबद  विचाल्यावर  पास वितरित करनारे वाहतुक नियंत्रक  व प्रवाश्यांमधे वाद निर्माण होत असतात, तसेच या महत्वाचे बस स्थानकावर दोन्ही वाहतुक नियंत्रकाचे आठवडी  दिवशी  किंवा  एखाद्या वाहतुक नियंत्रकाचे  रजे च्या प्रसंगी मात्र या बस स्थानकावर 09-30ते 17-30पर्यंत च एक वाहतुक नियंत्रक कामावर असतात . खरे तर कोंढाळी बस स्थानक हे राष्ट्रिय महामार्गावर असल्याने  व या मार्गाने लांब पल्याच्या बस से सेवा देत असतांना  मार्गस्थ होनारे बिघाड,  किरकोळ किंवा मोठे अपघात   किंवा बस स्थानकावर होनार्या घटनांची माहिती करिता  या बस स्थानकावर    नियमित  वाहतुक  नियंत्रका एवजी बदली कामावर नियमित दोन वाहतुक नियंत्रकांची नेमनुक करन्यात आल्यास अनेक समस्या सुटू शकतात अशी माहिती स्थनिक  ज्येष्ठ नागरिक  सुभाष पाटील ठवळे यांनी सांगितले आहे.
 येथिल बसस्थानकावर   बसविन्यात आलेल्या सी सी टी वी कॅमेर्या मुळे  सडक छाप मजनू, खिसेकापूंना जरब बसनार असल्याने  स्थानिक बस स्थानकावर   सी सी टी वी कॅमरे बसविन्याची मागणि करनारे स्वप्निल व्यास, सतीश  चव्हान, राष्ट्रपाल पाटील नीतीन ठवळे,  प्रशांत खंते,  आकाश गजबे, व नागरिकांनी  परिवहन मंत्री  दिवाकर रावते,  तसेच नागपुर जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र हरणे  , विभाग नियंत्रक  अशोक वरठे,  आगार व्यवस्थापक  डी एम रंगारी यांचे आभार व्यक्त केले आहे.


बुधवार, जून २७, २०१८

अखेर अहमदनर शाळेला मिळाले शिक्षक

अखेर अहमदनर शाळेला मिळाले शिक्षक



राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस सह अहमदनगरवासींच्या आंदोलनाला मिळाले यश
कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:
नागपुर जिल्ह्यातील काटोल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बाहूल अहमदनगर गावात सन 1984 मध्ये निर्मीत शाळा़ दोन वर्षांपुर्वी ५मे २०१६ला आलेल्या वादळामुळे येथील छप्पर उडले. येथील ग्रामपंचायत   ल शाळा व्यवस्थापन समिती  ने संबधित विभागाला वेळोवेळी  पत्रव्यवहार केल्यावरही छप्पर टाकण्यात आले नाही. येथील शाळेची पटसंख्या कमी असल्याचे कारण देत येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाऊने दोन किमी स्थित जंगली मार्ग असलेल्या हेटी  गावात जाण्यास भाग पाडले.  अहमदनगर हे गांव संपुर्णताः आदीवासी बाहुल व जंगलीभागात वसलेले आहे.येथे जंगली प्राण्यांचा वावर असतो. यामुळेच अहमदनगर चे नागरिक आपल्या पाल्यांना हेटीच्या शाळेत पाठविण्यास राजी नाही.। या परीस्थीतीत ग्रामीण आदिवासी विद्यार्थी आपल्या शिक्षणापासुन  वंचित होऊ नये म्हणुन 19मार्च ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते व प्रदेश उपाध्यक्ष सलिल देशमुख व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आकाश गजबे यांनी   अहमदनगरच्या विद्यार्थी व पालकांसह संविधान चौक नागपुर येथे आंदोलन केले. तसेच नागपुर जिल्हापरिषदच्या तत्कालीन मुख्यकार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या व शाळा चालु करण्याचे निवेदन केले. ज्यावर तोडगा काठण्याची माहीती दिली होती.  सी ई ओ यांच्या आदेशावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगरला भेट देऊन रिपोर्ट वरीष्ठांना दिला होता तरी सुद्धा विद्यार्थ्यांकरीता शाळा सुरु होऊ शकली नाही या समस्येवर माहीती घेण्यात आली असता असे निदर्शनास आले की येथें 53घरे असुन लोकसंख्या 202 आहे. ज्यात 175अनुसुचित जमाती  तर अनुसुचित जाती चे 27 नागरिक येथे वासत्व्यास आहे. व शाळेत ७ पटसंख्या आहे. ज्यात ३ विद्यार्थीनी व ४ विद्यार्थी आहेत. येथील शाळेचे समायोजन हेटी येथे झाल्यावर विद्यार्थ्यांनी शाळेत जावे बंद केले.  आता येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आंधारात असल्याचे दिसुन येते होते. विद्यार्थी आहे परंतु  शिक्षक नाही या परीस्थीती मुळे पालकवर्ग चिंतातुर आहे.  येथील सरपंच जानराव बाहे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक सोमकुवर ने सांगीतले कि या 
 नागपुर जिल्ह्यातील काटोल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बाहूल अहमदनगर गावात सन 1984 मध्ये निर्मीत शाळा़ दोन वर्षांपुर्वी ५मे २०१६ला आलेल्या वादळामुळे येथील छप्पर उडले. येथील ग्रामपंचायत   ल शाळा व्यवस्थापन समिती  ने संबधित विभागाला वेळोवेळी  पत्रव्यवहार केल्यावरही छप्पर टाकण्यात आले नाही. येथील शाळेची पटसंख्या कमी असल्याचे कारण देत येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाऊने दोन किमी स्थित जंगली मार्ग असलेल्या हेटी  गावात जाण्यास भाग पाडले. अहमदनगर हे गांव संपुर्णताः आदीवासी बाहुल व जंगलीभागात वसलेले आहे.येथे जंगली प्राण्यांचा वावर असतो. यामुळेच अहमदनगर चे नागरिक आपल्या पाल्यांना हेटीच्या शाळेत पाठविण्यास राजी नाही.। या परीस्थीतीत ग्रामीण आदिवासी विद्यार्थी आपल्या शिक्षणापासुन  वंचित होऊ नये म्हणुन 19मार्च ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते व प्रदेश उपाध्यक्ष सलिल देशमुख व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आकाश गजबे यांनी   अहमदनगरच्या विद्यार्थी व पालकांसह संविधान चौक नागपुर येथे आंदोलन केले. तसेच नागपुर जिल्हापरिषदच्या तत्कालीन मुख्यकार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या व शाळा चालु करण्याचे निवेदन केले. ज्यावर तोडगा काठण्याची माहीती दिली होती.  सी ई ओ यांच्या आदेशावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगरला भेट देऊन रिपोर्ट वरीष्ठांना दिला होता तरी सुद्धा विद्यार्थ्यांकरीता शाळा सुरु होऊ शकली नाही या समस्येवर माहीती घेण्यात आली असता असे निदर्शनास आले की येथें 53घरे असुन लोकसंख्या 202 आहे. ज्यात 175अनुसुचित जमाती  तर अनुसुचित जाती चे 27 नागरिक येथे वासत्व्यास आहे. व शाळेत ७ पटसंख्या आहे. ज्यात ३ विद्यार्थीनी व ४ विद्यार्थी आहेत. येथील शाळेचे समायोजन हेटी येथे झाल्यावर विद्यार्थ्यांनी शाळेत जावे बंद केले.  आता येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आंधारात असल्याचे दिसुन येते होते. विद्यार्थी आहे परंतु शिक्षक नाही या परीस्थीती मुळे पालकवर्ग चिंतातुर आहे.  येथील सरपंच जानराव बाहे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक सोमकुवर ने सांगीतले कि या आदिवासी गांवातील विद्यार्थी वरिष्ठ अभियंता, प्राध्यापक, सैन्य व पोलीसमध्ये में अधिकारी म्हणुन कार्यरत आहे. बंद करण्यात आलेली हि शाळा सुरु करण्याबाबत निवेदन आंदोलन करुन सुद्धा प्रकरण मार्गी लागले नाही या दरम्यान नागपुर जि.प. च्या सी ई ओ यांची बदली झाली. त्यापश्च्यात सलील देशमुख व आकआश गजबे यांनी अहमदनगरवासीयांना सोबत घेऊन नागपुरचे नव नियुक्त  सी ई ओ यांची भेट घेऊन पुन्हाः  अहमदनगर शाळेबाबत समस्येचा पाठा वाचला व शाळा सुरु करण्याची मागणी केली. अखेर सलिल देशमुख, जि.प.सदस्य रामदास मरकाम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष स्वप्निल व्यास, आकाश गजबे  रविंद्र साठे व त्यांचे राष्ट्रवादीचे सर्व सहकारी यांनी २६जुनला अहमदनगर येथील  शाळेला शिक्षक  नियुुक्त झाल्याची माहीती दिली.  या संदर्भात काटोलचे खंड शिक्षणाधिकारी दिनेश धवड यांच्याकडुन माहीती घेतली असता सांगीतले की अहमदनगर येथील शाळा प्रारंभ करण्यात आली आहे.  तर याबाबत विद्यार्थी आहे पण शिक्षक नाही या संदर्भात आपल्या वृत्तपत्रात दि.१४ एप्रिल ला वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

मंगळवार, जून ०५, २०१८

कोंढाळी बसस्थानकाच्या डांबरीकरणाची प्रक्रिया होणार तरी केव्हा?

कोंढाळी बसस्थानकाच्या डांबरीकरणाची प्रक्रिया होणार तरी केव्हा?

आमदार -खासदारांच्या सुचनांना एस टी प्रशासना कडून केराची टोपली
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवारांचा आंदोलनाचा ईशारा
कोंढाळी/गजेंद्र डोंगरे: 
 नागपुर -अमरावती महागार्ग क्र ६  वरिल  कोंढाळी हे  प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या गर्दी चे  महत्वाचे बस स्थानक आहे.  मागील पाच वर्षा पासुन येथील बस स्टेशन चे काम अजूनही पुर्ण झाले नाही, येथील मुलभुत गरजा व पायाभुत गरजा  अजूनही अपुर्ण आहेत, यात वाहन तळाचे डांबरी करन , सुरक्षा भिंत,.पिन्याचे पाणि व नास्त्या ची सोय  झाली  नसल्याने  या बस स्थानकावरून प्रवास करनारे प्रवाशी व विद्यार्थ्यांना  दररोज धूळ, ऊन, पाऊस या  सोबत झूंजावे लागत असते, येथील मुल भुत व पायाभुत सोयी अपुर्ण असुनही या भागाचे आमदार व खासदारांनी अपुर्ण कामातच या बसस्थानकाचे लोकापर्ण करून राजकिय व प्रशासकिय      अपरिपक्वते चे दर्शन घडवीले.
 या बस स्थानकाच्या पायाभुत सोईत वाहनतळाचे डांबरी करन अजूनही झाले नाही.यामुळे प्रवासी बस कोंढाळी बसस्थानकावर थांबताच बस स्थानकाचा पुर्ण परिसरात धुळ च धुळ पसरते. यातून  प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या  आरोग्यावर परिनाम होत आहे, तर येथी बस स्टेशन ला सामीरील भागाच्या मुख्य  ठिकाणी सुरक्षा भिंत नसल्याने   अवैध प्रवाशी वाहतूकिचा धूमाकुळ,  चोरट्यांना मोकळीक, अवैध   व नियमबाह्य साहित्य विक्रेत्यांचा हैदोश या पायभूत  व पिण्याच्या पाण्या ची  व नास्याची गैरसोय ही मुलभूत गरज  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महा मंडळा करून गेल्या पाच वर्षातही पुर्ण करन्यात आल्या नाही या बस स्थानकाचे उद्घाटण प्र संगी आमदार  आशिष देशमुख व खासदार कृपाल तुमाने यांनी   आपल्या भाषणात  मोठ्या थाटात नव नवीन आवश्य गरजा  लवकरच पुर्ण होईल या कडे एस टी प्रशासनाने लक्ष घालावे, असे स्पष्ट निर्देश ही दिले होते,याला ही 18महिने लोटून गेले तरी  आमदार ,खासदारांचे सुचना , निर्देशाचे मुळीच पालन झाले नाही एवढे मात्र खरे!
*आंदोलन एक मात्र मार्ग*
लोकशाहीचे मापदंडा नुसार ९५  वर्ष जुनाट बस स्टेशन  चे नवनिर्माण करण्यासाठी या भागाचे माजी आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी विषेश कार्य विकास निधी मधून वर्ष मार्च २०१३ ला  ५७ लाखाचा  विकास निधी  मंजूर करून १७ ऑगष्ट २०१३ ला रितसर अद्यावत सोयी सवलती पुर्ण असे  बस स्थानका  बनावे या करिता  भूमी पूजन केले होते, या बस स्थानकाचे बांधकाम नव महिन्यात पुर्ण करन्याचे  अॅग्रिमेंट मधे आहे. पण नव महिण्या ऐवजी  पुर्ण साठ  महिने लोटूनही आज घटकेच्या  वृत्त लिहे पर्यंत ही मुलभुत व पायाभूत सोयी पुर्ण झाल्या नाहीत,विद्यार्थि विद्यार्थिनीं ना पुर्ण पने ऊभेराहन्याच्या सोईचा ही आभाव आहे, येथील , ग्रा.प. -पं.स.-जि.प. तसेच विद्यार्थि नेते  प्रवासी मंडळानी सुद्धा अनेक निवेदने दिली तरी  एस टी चे मुजोर प्रशासन   कोणत्याही जन प्रतिनीधी, प्रसार माध्यमांचे ही ऐकून घेण्यास तयार नाही तर!या साठी आंदोलन करने एवढाच एक मार्ग शिल्लक राहिला आहे  असा ईशारा दैनंदिन प्रवास करनारे व  सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांनी दिला आहे.
 


सोमवार, जून ०४, २०१८

 चैतन्य धानोरकर याने निर्माण केले नव चैतन्य :डाॅ.शामसुंदर लद्धड

चैतन्य धानोरकर याने निर्माण केले नव चैतन्य :डाॅ.शामसुंदर लद्धड

गुणवंत विद्यार्थांनसह पालकांचाही सस्नेह सत्कार
कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:

येथील लाखोटीया-भुतडा -सी बी एस ई हायस्कूल च्या प्रथम तुकडी( फस्ट बैच)चा निकाल100टक्के लागला. ग्रामिण आदिवासी बाहूल भागातील लाखोटीया भुतडा सी बी एस ई हायस्कुल सुरूवातीस अनेक अडथळे पार करत या शाळेच्या सी बी एस ई शाखेला शासन मान्यता मिळाली, या हायस्कुल ची सी बी एस ई ची दहावी ची ही पहिलिच बैच (तुकडी)आहे. शाळेचा निकाल 100टक्के लागला. या प्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळा कडून 03जून रोजी हायस्कुलच्या च सभागृहात सकाळी साडे नव वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांचे पालका सह सस्नेह सत्कार सोहळ्याचे आयोजन करन्यात आले होते. या हायस्कुल तर्फे 20विद्यार्थि सी बी एस ई दहावी चे परिक्षेला बसले होते, यात चैतन्य विलासराव धानोरकर94%,सांख्यकि संजयराव ठवळे88%,खुषी गोपाल धिरण86%,प्राजक्ता साहेबराव ढोले83%,गौरव नामदेवराव गोरले82%व साक्षि पांडूरंग सरोदे81% टक्के प्रविण्य यादित तर अकरा विद्यार्थि, प्रथम श्रेणी आणि तिन विद्यार्थि द्वतिय श्रेणी गुणांकात उत्तिर्ण झाले ,यात प्राविण्य गुणांकातिल विद्यार्थी व त्यांचे पालकां चाही सत्कार करन्यात आला, या प्रसंगी सर्व प्राविन्यप्राप्त विद्यार्थ्यां नी आपल्या या शालेय जीवनातील आठवणिंना ऊजाळा देत शिक्षक व पालकांच्या सहकार्याची माहिती दिली. त्याच प्रमाणे पालक विलासराव धानोरकर , डाॅ. संजय ठवळे यांनी ही ला भु सी बी एस ई चे सर्व शिक्षक, व्यवस्थापक मंडळाचे आभार मानले, हायस्कुल च्या प्राचार्य ज्योती राऊत यांनी प्रास्ताविकेत सी बी एस ई शाळेची माहिती सांगितली, या प्रसंगी प्रा. सुनिल सोलव , सामाजिक कार्यकर्ते दुर्गाप्रसाद पांडे, प्रा. निकिता गुप्ता, प्रा. सुभाष राठी, यांनी ही हायस्कूल चे प्रथम तुकडी च्या शंभर टक्के निकाल व हायस्कुल चे अनेक विद्यार्थ्यांना हिंदी, गणित , विज्ञाण,इंग्रजी विषयात वैयक्तित 94ते97%गुणांक प्राप्त करनार्या विद्यार्थ्यांचे ही सत्कार करन्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी सत्कार सोहळ्या चे कार्यक्रमा चे अध्यक्ष स्थानी होते, संस्थे चे सचीव डाॅक्टर शाम सुंदर लद्धड यांनी आपले मार्गदर्शनात सांगितले की या हायस्कुल च्या दहावी च्या पहिल्या बैच ला प्रथम आलेल्या चैतन्य धानोरकर यांने आज या शाळेत नव चैतन्य निर्माण केले आहे हे या शाळा व संस्थे साठी अभिमानाची बाब आहे,तसेच या शाळे साठी लवकरच प्रशस्त क्रिडांगण, भव्य स्टेज , सुरक्षा भिंत बनविन्या येत असुन, विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, कला तसेच सी बी एस ई शिक्षणाला लागनार्या सर्व सोई सवलती उपलब्ध आहेत, संस्थेचे उपध्यक्ष सोमराज पालिवाल, ला. भु. कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य दामोदर कुहिटे,प्राचार्य ज्योती राऊत यांचे उपस्थितित व सी बीएस ई हायस्कुलच्या दहावी वर्गाच्या पहिल्या तुकडित शिक्षण घेणार सर्व विद्यार्थ्यी व त्यांचे पालक ही या प्रसंगी हाजर होते. या परिक्षेत 94%टक्के गुणांक मिळविणारा चैतन्य धानोरकर यांनी या प्रसंगी आपले आजी व आजोबां ना विषेश करून सोबत आनले होते व आपले मनोगत व्यक्त करतांना आई -वडिल व गुरूजनां सोबत आजी -आजोबांचे विषेश आभार मानून त्यांनी केलेल्या सहयोगाची माहिती ही दिली, कार्यक्रमाचे संचलन प्रा. योगेश चौधरी तर आभार यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सी बी एस ई हायस्कुल चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व पालकवर्ग हाजर होते तर आभार ज्योत्स्ना कडवे यांनी व्यक्त केले.

 

शनिवार, जून ०२, २०१८

वीज पडून पाच शेळ्या ठार

वीज पडून पाच शेळ्या ठार



बाजारगाव/गजेंद्र डोंगरे: 
 शुक्रवारी नागपुरात वाढली पावसाने चांगलेच धोपटले.गोंडखैरी परिसरात मुसळधार पाऊस गारा वा-यासह विजेचा कडकडाट पाच बकऱ्याचा मृत्यू झाला.  नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गलगत कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील आशिष पेट्रोल पम्प च्या मागील परिसर  शिवारातील इंगूनकली लक्ष्मण भोसले राहणार गोंडखैरी यांच्या मालकीच्या पाच बक-या मृत तर तीन बक-या जखमी विज पडून गंभीर जखमी झाल्या सदर घटना ही शुक्रवार दुपारी घडली. 
    शुक्रवारी १ जून ला दुपारच्या  सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात होताच आपल्या बक-या सह घरी जाण्यास निघाली असता  यावेळी मुसळधार पावसासह जोरदार विजेचा कडकडाट झाला  यावेळी अचानक वीज कोसळली सदर घटनेत इंगूनकली लक्ष्मण भोसले यांच्या पाच बक-या मृत तर तीन बक-या गंभीर जखमी झाल्या सदर घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांच्या मदतीला धावून त्यांची मदत करण्यात आली.या वाढली पावसात परिसरात ठिक-ठिकाणी झाडे पडलेत तर कुठे घरावरील सिमेंट पत्रे उडाले.यावेळी गारा देखील पडल्या. 


-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

मंगळवार, मे २९, २०१८

कचारी सांवगा येथील युनियन बॅंक लुटण्याचा प्रयत्न फसला

कचारी सांवगा येथील युनियन बॅंक लुटण्याचा प्रयत्न फसला

दोन संशयित कोंढाळी पोलिसांच्या ताब्यात
 कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:
नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कचारी सावंगा  येथिल  युनियन बॅंकेला 29 मे चे पहाटेस  (रात्री दोन बाजताचे दरम्यान) लुटन्याचा प्रयत्न करन्यात आला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न फसला .हि घटना मंगळवारी   सकाळी ६ वाजता उजेडात आली,व  घटनेची माहिती सकाळी ७  वाजता कोंढाळी पोलिसांना देण्यात आली  माहिती मिळताच उपनिरिक्षक पवन भांबूरकर आपल्या चमूसह घटनास्थळी पोहचले, कोंढाळी चे ठाणेदार अहेरकर रजेवर असल्याने काटोल चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस एस  राजपुत  ही त्वरित घटना स्थळी पोहचले व काटोल उपविभागिय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शना खाली  बॅंक  अधिकारी यांचे सहयोगाने व सी .सी टीव्ही  चित्रिकरनाच्या  माध्यमातून कोंढाळी उपनिरिक्षक पवन भांबूरकर ए एस आय सुरेश लोहकरे  शिपाई पन्नालाल बटाऊवाले  यांनी  कचारी सांवगा युथूनच दारू चे दुकानासमोरून पळ काढत असतांनाच  दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे तर बँकेतील तीजोरी व  लाॅकर तोडण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्या चोरांना  यश आले नाही अशी माहिती बैंक व्यवस्थापक सुरेश सोनकूसरे यांनी दिली  


-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



गुरुवार, मे २४, २०१८

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईच्या अनुदान कर्जात कपात न करण्याची मागणी

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईच्या अनुदान कर्जात कपात न करण्याची मागणी

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे काटोल तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
 कोंढाळी/ गजेंद्र डोंगरे:
काटोल तालुक्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये गारपीटीसह वादळी पाऊस झाल्याने तालुक्यातील ९हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात संत्रा, गहु, चना या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी  माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आंदोलन केले होते तर दुसरीकडे सत्ताधारी आमदार आशिष देशमुख यांनी सुद्धा काटोल येथे ठिय्या आंदोलनकरुन नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यामुळे शासनामार्फत सर्व्हे करुन मदत देण्यात आली. परंतु बँकेत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे अनुदान जमा होताच बँकेमार्फत शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जामध्ये परस्पर अनुदान कपात करण्यात आले. त्यामुळे खरीप हंगामाकरीता लागणारे बि-बियाने कशाने घ्यायचे असा मोठा आर्थिक पेच प्रसंग शेतकऱ्यांसमोर निर्मान झाला. शेतकऱ्यांना परत सावकाराच्या दारात गेल्याशिवाय पर्याय नाही.याकरीता बँकेद्वारे शेतकऱ्यांचे कर्जात कपात केलेले अनुदान परत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश बँकांना द्यावे अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य रामदास मरकाम व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाउपाध्यक्ष आकाश गजबे यांनी जिल्हाधिकारीयांना निवेदनामार्फत केली. सदर मागणीचे निवेदन काटोलचे तहसिलदार प्रसाद मते यांना शिष्टमंडळाद्वारे सुपुर्द करण्यात आल. सदर शिष्टमंडळात जि.प.सदस्य रामदास मरकाम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश गजबे, चंदनपारडीचे उपसरपंच सतिश पुंजे, दिपक मेश्राम, हरीष राठोड, आदी उपसथित होते.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

बुधवार, एप्रिल ११, २०१८

नांदोरा-काटोल,तरोडा-कोंढाळी व चंदनपार्डी मार्गाकडे चाळण सा.बा.दुर्लक्ष

नांदोरा-काटोल,तरोडा-कोंढाळी व चंदनपार्डी मार्गाकडे चाळण सा.बा.दुर्लक्ष

गजेंद्र डोंगरे/कोंढाळी:-
काटोल तालुक्यातील कोंढाळी परिसरातिल कोंढाळी- तरोडा, महामार्ग ते चंदनपार्डी-मुर्ती,नांदोरा -सबकुंड-काटोल,कोंढाळी-दोडकी या ग्रामीण मार्गाच्या सडकांची अक्षरशाः चाळण झाली असुन ह्या मार्गावर खड्ढे पडले की मार्ग खड्ड्यातच गेला हे कळायला मार्ग नाही. राज्य सरकारच्या सार्वजिनिक बांधकाम विभाग असो की जि.प. बांधकाम विभाग सर्वच अधिकारी विकास निधी च्या अभावाची करने सांगतात, या भागाचे स्थानिक स्वराज्य संस्था आप आपल्या हद्दितील सडकांची दुरूस्तिंचे ठराव करून संबधित विभागाकडे पाठवितात तसेच आप आपल्या जनप्रतिनिधींकडे ठरावांचे प्रति पाठवुन ही या भागातिल तरोडा पुर्ण विजा भजा ,प्रवर्गातील नागरिक असतात यांना तरोडा -कोंढाळी मार्गाची अवस्थाफारच खराब झाली आहे. 
हाच प्रकार महामार्ग ते चंदनपार्डी ते मुर्ती सडक मार्गाचा आहे. या मार्गावर माजि मंत्री अनिल देशमुख आमदार असतांना देखभाल दुरूस्ती करन्यात आली होती तेंव्हा पासुन या मार्गावर अजून देखभाल दरुस्तिच करन्यातसआली नाही अशी माहिती चंदनपार्डी चे उपसरपंच सतिश पुंजे व तरोडा निवासी शंकरगिरी सोळकी यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे नांदोरा -सबकुंड -काटोल व कोंढाळी दोडकी मार्गाची अवस्था आहे.
तरोड तसेच चंदनपार्डी गावांना सडक मार्गाची अक्षरशाः चाळन झाली आहे. या मार्ग दुरूस्ति साठी सार्वजनिक बांधकाम तसेच जि.प. सा.बा. ज्या कोणत्या विभागाकडे हे मार्ग आहेत त्या विभागाचे अधिकार्यांनी या मार्गांचे दुरूस्ती करून द्यावी अशी मागणी सतीश पुंजे,शंकरगिरी सोलंकी, सतीश घाडगे , मंगेश डोंगरे, हरिष राठोड, रामचंद्र चव्हान यांनी केली आहे.

मंगळवार, एप्रिल १०, २०१८

कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमेटीची बैठक संपन्न

कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमेटीची बैठक संपन्न

 कोंढाळी:गजेंद्र डोंगरे 
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे127व्या जयंती चे पर्वावर  होणारे कार्यक्रम अत्यंत  शांततेत पार पाडलाया जावा  या करिता पोलीस स्टेशन कोंढाळी हद्दितिल  सर्व गावाचे पोलीस पाटिल , शांतता कमेटी चे अध्यक्ष, तसेच राजकिय सामाजिक ,धार्मिक,  क्षेत्राती नागरिकांची 10एप्रिल रोजी दुपारी21-30वाजता पो स्टे चे सभा मंडपात   कोंढाळीचे ठाणेदार पुरूषोत्तम अहिरकर यांचे  अध्यक्षते खाली  शांतता कभेटी च्या बैठकिचे आयोजन करन्यात आले होते. या  प्रसंगी ठाणेदारारांनी सर्व उपस्थितितां बैठकिचे आयोजनाची मिहिती देत सांगितलेसकी  परम पुज्य  डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे  14एप्रिल रोजी  संपन्न केल्या जानारक जयंती शांततेत पार पडावी या साठी गावो गावचे प्रत्येक  नागरिकाचे कर्तव्य आहे. त्या प्रसंगी  पोलीस आपल्या मदती साठी सदैव तत्पर आहे.    14एप्रिल रोजी गावो गावी होनारे कार्यक्रमाची माहिती या प्रसंगी सर्व उपस्थितां कडून जानुन घेतली .  याप्रसंगी  सुरेंद्र भाजिखाये, मौलाना शाहिद सर, बालकिसन पालिवाल, आकाश गजबे यानी  14एप्रिल शांततेच व्हावे या साठी सर्वांना आवहन कलन्यात आले.  या प्रसंगी गावो गावचे सामाजिक तसेच धार्मिक व राजकिय  पदाधिकारी व कार्यकर्ते हाजर होते.   गुप्तचर शाखेचे सुभाष साळवे यांनी संचलन  व सर्व उपस्थितांचे आभार मानले.