Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २३, २०१८

कोंढाळी बस स्थानकावर सी.सी.टी.वी ची नजर

वार्ताहर -कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:
  येथील  बस स्थानकावर सी सी टी वी कॅमेरा बसविण्याची मागणी रा.प. म. चे अध्य्क्ष  व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुर्ण केल्या बाबद स्थानीक प्रवासी , विद्यार्थी व  मागणी करणाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे.
  नागपुर -अमरावती राष्ट्रिय महामार्गावरील  कोंढाळी येथील बस स्टेशन   या परिसरातिल 43 गावांचे प्रवाशी  व विद्यार्थ्यांचे  मुख्य प्रवाशी केंद्र आहे . या बस स्थानकावरून दररोज 315 चे वर बस गाड्याच्या माध्यमातून  प्रवासी सेवा देन्यात येते, मात्र सध्या  या बस स्थानकावर लांब पल्याच्या अनेक बस चे  चालक बस नोंदी  न करता आपले वाहन पुढे  निधुन जातात, या मुळे बस  आली किंवा गेली या बाबद स्थानिक वाहुतक नियंत्रकास या बाबद माहिती नसते  व यातुन प्रवासी व वाहतुक नियंत्रकात नाहक वाद होत असतात.  आता येथील बस स्थानकावर सी सी टी वी कॅमेरे बसविल्या गेल्याने येथील नोंदी न घेनारे वाहनांचे चित्रिकरन  दिसुन येऊ शकते . त्याच प्रमाणे येथील बस स्टेशनवर  विद्यार्थिपास देने , ध्वनिक्षेपकावर बस फेर्यांची जाण्या  येण्याची  सुचना  करने, बसगाड्यांना वाहन तळावर वाहने व्यवस्थित लावने या करिता येथील बस स्थानकावर सोळासे विद्यार्थ्यांना पास देने या करिता एक अतिरिक्त वाहतुक नियंत्रक  नियुक्तिची मागणी करन्यात आली आहे.सध्या येथे दोन वाहतुक  नियंत्रक 06-00-ते14-00-व14-00-ते22-00अशी कामगिरी सुरू आहे, या दरम्यान   प्रवासी बस गाड्यांच्या नोंदी व पास बनविने एकच वाहतुक नियंत्रक कडून होऊ शकत नसल्याने  अनेकदा बस नोंदी होत नाही. या दरम्यान  प्रवाशी बस फेर्याबाबद  विचाल्यावर  पास वितरित करनारे वाहतुक नियंत्रक  व प्रवाश्यांमधे वाद निर्माण होत असतात, तसेच या महत्वाचे बस स्थानकावर दोन्ही वाहतुक नियंत्रकाचे आठवडी  दिवशी  किंवा  एखाद्या वाहतुक नियंत्रकाचे  रजे च्या प्रसंगी मात्र या बस स्थानकावर 09-30ते 17-30पर्यंत च एक वाहतुक नियंत्रक कामावर असतात . खरे तर कोंढाळी बस स्थानक हे राष्ट्रिय महामार्गावर असल्याने  व या मार्गाने लांब पल्याच्या बस से सेवा देत असतांना  मार्गस्थ होनारे बिघाड,  किरकोळ किंवा मोठे अपघात   किंवा बस स्थानकावर होनार्या घटनांची माहिती करिता  या बस स्थानकावर    नियमित  वाहतुक  नियंत्रका एवजी बदली कामावर नियमित दोन वाहतुक नियंत्रकांची नेमनुक करन्यात आल्यास अनेक समस्या सुटू शकतात अशी माहिती स्थनिक  ज्येष्ठ नागरिक  सुभाष पाटील ठवळे यांनी सांगितले आहे.
 येथिल बसस्थानकावर   बसविन्यात आलेल्या सी सी टी वी कॅमेर्या मुळे  सडक छाप मजनू, खिसेकापूंना जरब बसनार असल्याने  स्थानिक बस स्थानकावर   सी सी टी वी कॅमरे बसविन्याची मागणि करनारे स्वप्निल व्यास, सतीश  चव्हान, राष्ट्रपाल पाटील नीतीन ठवळे,  प्रशांत खंते,  आकाश गजबे, व नागरिकांनी  परिवहन मंत्री  दिवाकर रावते,  तसेच नागपुर जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र हरणे  , विभाग नियंत्रक  अशोक वरठे,  आगार व्यवस्थापक  डी एम रंगारी यांचे आभार व्यक्त केले आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.