Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर २५, २०१८

सरसंघचालकांच्या जन्मगावी कॉंग्रेसचे फलक

स्वातंत्रलढ्यातील स्तुतीचे मानले जाहीर आभार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे जन्मगाव असलेल्या चंद्रपूर येथे काँग्रेसने फलक लावून जाहीर आभार मानले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मोहनजी भागवत यांनी दिल्ली येथील कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन केले होते. काँग्रेसने केलेल्या योगदानाची स्तुती जाहीर रित्या केली होती. यानिमित्त चंद्रपूर शहर काँग्रेसने सरसंघचालकांचे आभार मानणारे फलक शहरात लावून सर्वांचे लक्ष वेधले आहे. डॉक्टर मोहनजी भागवत यांचा जन्म चंद्रपूर येथे झाला. त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथेच घेतले. चंद्रपूर येथे त्यांचे मूळ घर असून,  ते नियमित येत असतात. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.