Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०३, २०२१

राज्यातील कुठल्याही महानगरपालिका, नगरपालिकांना विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही- नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे

 राज्यातील कुठल्याही महानगरपालिका, नगरपालिकांना विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही- नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे

 

        मुंबई, दि. 3 : मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत राज्यातील कुठल्याही महानगरपालिका व नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.

          नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत निधी अप्राप्त असल्याबाबत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते.

          कोविड -19 च्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन  करण्यात आला होता तसेच राज्याच्या उत्पन्नावरही मर्यादा आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्राधान्यक्रमाने विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नागपूर महानगरपालिकेत कुठलीही विकासकामे थांबविण्यासाठी नगरविकास विभागाने आदेश दिलेला नाही. ज्या कामांची कार्यादेश निघाले आहेत ती कामे थांबणार नाहीत आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी माहिती मंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

       कोकणातील ज्या नगरपालिकांची स्थिती बेताची आहे, त्यांना मूलभूत सोयी - सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी  एका उप प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

          यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरसदस्य डॉ. परिणय फुके यांनी सहभाग घेतला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.