गजेंद्र डोंगरे/कोंढाळी:-
काटोल तालुक्यातील कोंढाळी परिसरातिल कोंढाळी- तरोडा, महामार्ग ते चंदनपार्डी-मुर्ती,नांदोरा -सबकुंड-काटोल,कोंढाळी-दोडकी या ग्रामीण मार्गाच्या सडकांची अक्षरशाः चाळण झाली असुन ह्या मार्गावर खड्ढे पडले की मार्ग खड्ड्यातच गेला हे कळायला मार्ग नाही. राज्य सरकारच्या सार्वजिनिक बांधकाम विभाग असो की जि.प. बांधकाम विभाग सर्वच अधिकारी विकास निधी च्या अभावाची करने सांगतात, या भागाचे स्थानिक स्वराज्य संस्था आप आपल्या हद्दितील सडकांची दुरूस्तिंचे ठराव करून संबधित विभागाकडे पाठवितात तसेच आप आपल्या जनप्रतिनिधींकडे ठरावांचे प्रति पाठवुन ही या भागातिल तरोडा पुर्ण विजा भजा ,प्रवर्गातील नागरिक असतात यांना तरोडा -कोंढाळी मार्गाची अवस्थाफारच खराब झाली आहे.
हाच प्रकार महामार्ग ते चंदनपार्डी ते मुर्ती सडक मार्गाचा आहे. या मार्गावर माजि मंत्री अनिल देशमुख आमदार असतांना देखभाल दुरूस्ती करन्यात आली होती तेंव्हा पासुन या मार्गावर अजून देखभाल दरुस्तिच करन्यातसआली नाही अशी माहिती चंदनपार्डी चे उपसरपंच सतिश पुंजे व तरोडा निवासी शंकरगिरी सोळकी यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे नांदोरा -सबकुंड -काटोल व कोंढाळी दोडकी मार्गाची अवस्था आहे.

