आमदार -खासदारांच्या सुचनांना एस टी प्रशासना कडून केराची टोपली
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवारांचा आंदोलनाचा ईशारा
नागपुर -अमरावती महागार्ग क्र ६ वरिल कोंढाळी हे प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या गर्दी चे महत्वाचे बस स्थानक आहे. मागील पाच वर्षा पासुन येथील बस स्टेशन चे काम अजूनही पुर्ण झाले नाही, येथील मुलभुत गरजा व पायाभुत गरजा अजूनही अपुर्ण आहेत, यात वाहन तळाचे डांबरी करन , सुरक्षा भिंत,.पिन्याचे पाणि व नास्त्या ची सोय झाली नसल्याने या बस स्थानकावरून प्रवास करनारे प्रवाशी व विद्यार्थ्यांना दररोज धूळ, ऊन, पाऊस या सोबत झूंजावे लागत असते, येथील मुल भुत व पायाभुत सोयी अपुर्ण असुनही या भागाचे आमदार व खासदारांनी अपुर्ण कामातच या बसस्थानकाचे लोकापर्ण करून राजकिय व प्रशासकिय अपरिपक्वते चे दर्शन घडवीले.
या बस स्थानकाच्या पायाभुत सोईत वाहनतळाचे डांबरी करन अजूनही झाले नाही.यामुळे प्रवासी बस कोंढाळी बसस्थानकावर थांबताच बस स्थानकाचा पुर्ण परिसरात धुळ च धुळ पसरते. यातून प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिनाम होत आहे, तर येथी बस स्टेशन ला सामीरील भागाच्या मुख्य ठिकाणी सुरक्षा भिंत नसल्याने अवैध प्रवाशी वाहतूकिचा धूमाकुळ, चोरट्यांना मोकळीक, अवैध व नियमबाह्य साहित्य विक्रेत्यांचा हैदोश या पायभूत व पिण्याच्या पाण्या ची व नास्याची गैरसोय ही मुलभूत गरज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महा मंडळा करून गेल्या पाच वर्षातही पुर्ण करन्यात आल्या नाही या बस स्थानकाचे उद्घाटण प्र संगी आमदार आशिष देशमुख व खासदार कृपाल तुमाने यांनी आपल्या भाषणात मोठ्या थाटात नव नवीन आवश्य गरजा लवकरच पुर्ण होईल या कडे एस टी प्रशासनाने लक्ष घालावे, असे स्पष्ट निर्देश ही दिले होते,याला ही 18महिने लोटून गेले तरी आमदार ,खासदारांचे सुचना , निर्देशाचे मुळीच पालन झाले नाही एवढे मात्र खरे!
लोकशाहीचे मापदंडा नुसार ९५ वर्ष जुनाट बस स्टेशन चे नवनिर्माण करण्यासाठी या भागाचे माजी आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी विषेश कार्य विकास निधी मधून वर्ष मार्च २०१३ ला ५७ लाखाचा विकास निधी मंजूर करून १७ ऑगष्ट २०१३ ला रितसर अद्यावत सोयी सवलती पुर्ण असे बस स्थानका बनावे या करिता भूमी पूजन केले होते, या बस स्थानकाचे बांधकाम नव महिन्यात पुर्ण करन्याचे अॅग्रिमेंट मधे आहे. पण नव महिण्या ऐवजी पुर्ण साठ महिने लोटूनही आज घटकेच्या वृत्त लिहे पर्यंत ही मुलभुत व पायाभूत सोयी पुर्ण झाल्या नाहीत,विद्यार्थि विद्यार्थिनीं ना पुर्ण पने ऊभेराहन्याच्या सोईचा ही आभाव आहे, येथील , ग्रा.प. -पं.स.-जि.प. तसेच विद्यार्थि नेते प्रवासी मंडळानी सुद्धा अनेक निवेदने दिली तरी एस टी चे मुजोर प्रशासन कोणत्याही जन प्रतिनीधी, प्रसार माध्यमांचे ही ऐकून घेण्यास तयार नाही तर!या साठी आंदोलन करने एवढाच एक मार्ग शिल्लक राहिला आहे असा ईशारा दैनंदिन प्रवास करनारे व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांनी दिला आहे.