चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये दिनांक 29 एप्रिल ते 03 मे 2023 रोजी आकाश आंशिक ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Meteorological department's warning again in Chandrapur district
चेतावणी-दिनांक 29 एप्रिल रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी विजांचाकडकडाट, मेघगर्जना व वादळ वारा (वेग 30-40किमी प्रति तास) व गारपीटीसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे तसेच दिनांक 30 एप्रिल ते 01 मे रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी विजांचाकडकडाट, मेघगर्जना व वादळ वारा (वेग 30-40किमी प्रति तास) व गारपीटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे तसेच दिनांक 02 ते 03 मे रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी विजांचाकडकडाट, मेघगर्जना व वादळ वारा (वेग 30-40 किमी प्रति तास) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.
Meteorological department's warning again in Chandrapur district
जिल्ह्यात खालीलप्रमाणे पाऊस पडन्याची शक्यता आहे .
29 एप्रिल 2023 ला 20.9 मिमी, 30 एप्रिल 2023 ला 11.5 मिमी, 01 मे 2023 ला 11.6 मिमी, 02 मे 2023 ला 6.4 मिमी व 03 मे 2023 ला 2.8 मिमी पाऊस पडेल असा अंदाज प्राप्त झाला आहे)
ग्रामीण कृषि मौसम सेवा
कृ सं केंद्र सिंदेवाही
Meteorological department's warning again in Chandrapur district