Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २९, २०२३

चंद्रपुरात निघाले हे आदेश | तंबाखु व गुटखा विक्री; आळा घालण्यासाठी कार्यवाही | Kharra Chandrapur -

 अवैध साठा शोधून तंबाखु व गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करा

Ø जिल्हाधिका-यांचे अन्न व औषध प्रशासनाला निर्देश





चंद्रपूरदि. 29 : जिल्ह्यात सुगंधित तंबाखूसुपारीगुटखा यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्रशहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा विक्री होत आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी अवैध साठा शोधून तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले. ( Kharra Chandrapur )

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सुरक्षित अन्न आणि निरोगी आहारासाठी सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळीअन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहितेअन्न सुरक्षा अधिकारी श्री. टोपलेपोलीस निरीक्षक रोशन पाठकपोलीस विभागाच्या अपर्णा मानकरजिल्हा महिला व बालविकास विभागाचे परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकरसहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडूरंग माचेवाडमनोहर चीटनुरवार तसेच ग्राहक संस्थेचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेअवैध सुगंधीत तंबाखूसुपारी गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन कार्यवाही करावी. पोलीस विभागाने याबाबत माहिती घ्यावी. ज्या अन्नपदार्थ विक्रेत्यांकडे व व्यावसायिकांकडे अन्न परवाना नाही, याबाबत चौकशी करून अशा आस्थापनांना भेटी द्याव्यात. अन्न व्यावसायिकांचे परवान्याचे नूतनीकरण करावेत. तसेच इट राईट चॅलेंज उपक्रमांतर्गत अन्नपदार्थाविषयक माहिती द्यावी. जेणेकरूननागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होईलअसे ते म्हणाले. Chandrapur Kharra News


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.