काँग्रेसचे 14 तर भाजपाचे 4 उमेदवार विजयी
प्रभाकर सेलोकर, प्रमोद मोटघरे सलग तिसऱ्यांदा विजयी
**ब्रम्हपुरी बाजार समितीवर काँग्रेसने वीस वर्षापासूनचे सत्तेचे वर्चस्व कायम*
*काँग्रेसचे 14 तर भाजपाचे 4 उमेदवार विजयी*
*प्रभाकर सेलोकर, प्रमोद मोटघरे सलग तिसऱ्यांदा विजयी*
*विनोद चौधरी शहर प्रतिनिधि ब्रम्हपुरी:*
ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलचे 14 उमेदवार निवडून आले तर भाजपा प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलचे चार उमेदवार निवडून आले आहेत. प्रतिष्ठेच्या व अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने बहुमताने विजय प्राप्त केला आहे. तर तिसऱ्या आघाडीला खातेही उघडता आले नाही. गेल्या वीस वर्षापासून बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. या निवडणुकीत दणदणीत विजयाने बाजार समितीवर सत्तेचे वर्चस्व पुन्हा काँग्रेसने कायम राखले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक यावर्षी अत्यंत चुरशीची झाली. माजी आमदार अतुल देशकर, दीपक उराडे यांच्या नेतृत्वात भाजप प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलने निवडणूक लढवली . तिसरी आघाडीही निवडणूक रिंगणात उतरली होती. काँग्रेस गोट्यातील इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न दिल्याने नाराज उमेदवारांनी भाजपचा हात पकडून भाजप प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनल कडून उमेदवारी अर्ज दाखल केले . काँग्रेस गोठ्यात इच्छुकांना उमेदवारी न दिल्याने गटबाजी उघड झाली होती. यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आले होते. अशातच मतदानाच्या दिनी काँग्रेसचे किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांनी तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्यावर मनमानी कारभाराचा खापर फोडत तिडके यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. यामुळे या निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार की काय असे चित्र दिसून आले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 18 पैकी 17 जागेंकरिता झालेल्या मतदान प्रक्रियेत 13 जागांवर विजय प्राप्त केला. तर भाजपला चार जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसचे प्रभाकर सेलोकर हे अविरोध निवडून आलेले आहेत. माजी आमदार अतुल देशकर, दीपक उराडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णा सहारे यांनी या निवडणुकीत प्राण प्रतिष्ठा पणाला लावली होती. काँग्रेस गोठ्यात गटबाजी उघड झाल्याने तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती यात त्यांना प्रतिष्ठा राखण्यात यश आले आहे. सलग तिसऱ्यांदा प्रभाकर सेलोकर , प्रमोद मोटघरे यांनी बाजी मारली आहे तर दुसऱ्यांदा सुनीता तिडके, केशव भुते, राजेश तलमले हे निवडून आलेले आहेत. तिसऱ्या आघाडीला खाते उघडता आलेले नाही. निवडणुकीत काँग्रेसचे थानेश्वर कायरकर,सुरेश दूनेदार, भाकपचे विनोद झोडगे , भाजपचे योगेश राऊत,नामदेव लांजेवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.
*काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार*
सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण गटातून , दिवाकर मातेरे, राजेश तलमले, अरूण अलोणे, प्रमोद मोटघरे, किशोर राऊत,सहकार क्षेत्रातील महिला राखीव गटातून सुनिता तिडके व अजंली उरकुडे ,व्यापारी गटातून काँग्रेसचे प्रशांत उराडे , ग्रामपंचायत राखीव गटातून सोनू ऊर्फ प्रेमानंद मेश्राम, ज्ञानेश्वर झरकर, उमेश धोटे, संजय राऊत, आर्थिक दुर्बल घटक गटातून ब्रम्हदेव दिघोरे.
*भाजप प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार*
सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण गटातून केशव भुते, किशोर बगमारे , व्यापारी गटातून यशवंत आंबोरकर, मापारी गटातून नरेंद्र ठाकरे.