Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २९, २०२३

मन की बात @100 । अभिनेता अमीर खानसह चंद्रपूरचे बंडू धोत्रे सहभागी | Man ki bat Bandu Dhotre

नवी दिल्लीतील मन की बात @100 राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील सात जण सहभागी 

अभिनेता अमीर खानसह चंद्रपूरचे बंडू धोत्रे सहभागी



केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ Man ki bat या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विशेष कार्यक्रमाचे ९९ भाग पूर्ण झाले असून, येत्या रविवारी ३० एप्रिल रोजी याचा १०० वा भाग प्रसारित होणार आहे. याचे औचित्य साधून आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर, विभागाचे सचिव अपूर्व चंद्र व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यात चंद्रपुरातील पर्यावरण प्रेमी बंडू सीताराम धोत्रे सहभागी झाले होते.


आतापर्यंत प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी ७०० पेक्षा अधिक वेळा लोकांशी संवाद साधला आहे. या ३०० संघटनाचा उल्लेख केला असून यामधले ३७ व्यक्ती आणि १० परदेशी संस्था आहेत.


महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर या राष्ट्रीय परिषदेस विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान, रवीना टंडन, चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, बंडू सीताराम धोत्रे, सोनाली हेलवी, राजेंद्र यादव, डॉक्टर रोहीदास बोरसे, चंद्रकिशोर पाटील आणि शर्मिला ओसवाल, वेदांगी कुलकर्णी, शैलेश भोसले, डॉ. अन्यया अवस्थी या काही लोकांचा समावेश आहे.


पुण्याचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी, आपल्या १६,००० रुपयांच्या मासिक निवृत्तीवेतनातून दरमहा ५,००० रुपये, स्वच्छता मोहिमेसाठी देण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपुरचे बंडू सीताराम धोत्रे, ‘पर्यावरण संरक्षण संघटना’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेने, चंद्रपूरचा किल्ला आणि आसपास स्वच्छता मोहीम राबवली. साताऱ्याची सोनाली हेळवी ही महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार आहे. राजेंद्र यादव हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर करुन लसीकरणासाठी उपयुक्त वाहन तयार केले. पुण्याचे डॉ. बोरसे हे कोविड योद्धा आहेत.


चंद्रकिशोर पाटील यांच्या नाशिकमध्ये गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठीच्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता. अलिबागजवळील केनाड येथील रहिवासी असलेल्या शर्मिला ओस्वाल गेल्या २० वर्षांपासून अनोख्या पद्धतीने भरड धान्यांचे उत्पादन करत असून त्यांना ‘मिलेट्स वुमन’ म्हणून त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.



उद्घाटनपर सत्रात उपराष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. त्यापैकी पहिले पुस्तक “मन की बात @१००” हे कॉफीटेबल पुस्तक आहे यामध्ये या कार्यक्रमाची आतापर्यंतची वाटचाल तसेच या कार्यक्रमामुळे प्रधानमंत्री आणि सामान्य नागरिक यांच्या दरम्यानच्या थेट संवादाला उत्तेजन देण्याचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत.



दुसरे पुस्तक प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.वेम्पती यांनी लिहिलेले “कलेक्टिव्ह स्पिरीट, काँक्रीट ॲक्शन.” मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांच्या हृदयात असलेल्या ज्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणविषयक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक तसेच तंदुरुस्तीविषयक समस्यांसह विविध संकल्पनांवर चर्चा केली त्यांची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहेत.



देशाच्या सर्वोच्च नेत्याचा लोकांशी संवाद असल्याशिवाय लोकशाही सक्षम होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनसंवाद साधून लोकशाही मजबूत केली, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणी कार्यक्रमाचे रविवारी, ३० एप्रिल रोजी शतक पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने बुधवारी आयोजित केलेल्या ‘मन की बात @१००’ या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात शाह बोलत होते.





मोदींचा जनसंवाद महत्त्वाचा – आमिर


देशाचा सर्वोच्च नेता (मोदी) तुमच्यासोबत संवाद साधतो, ही बाबच तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते. पंतप्रधान महत्त्वाच्या विषयांची चर्चा करतात, देशाला पुढे नेणारे विचार मांडतात, विविध सल्ले देतात. जनसंवादातून देशाचे योग्य रीतीने नेतृत्व करता येऊ शकते. मोदींनी मनातील गोष्टी लोकांना सांगितल्या, देशाला पुढे नेण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगितले, त्यांना लोकांनी प्रतिसाद दिला, असे मत सिनेअभिनेता आमिर खान यांने व्यक्त केले.



चंद्रपूरच्या किल्ल्याचे वैभव

Chandrapur शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन म्हणजेच ‘इको-प्रो’ या संस्थेतर्फे सुरू असलेल्या चंद्रपुरातील किल्ला परकोट स्वच्छता अभियानाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ ऑक्टोबर २०१७ रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात केला. संस्थेच्या या कार्याचा गौरव केला. यामुळे चंद्रपुरातील या उपक्रमाची दखल घेतल्याने शहरातील सेवाकार्याच्या सन्मानात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता करून परकोट आणि बुरूजांचे संरक्षण करण्यात येत असल्याने चंद्रपूरच्या किल्ल्याचे वैभव या अभियानांतर्गत जपले जात आहे.




चंद्रपूर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वास्तू आहेत. यात चंद्रपूरचा किल्ला, राजा बिरशहाची समाधी, विविध मंद‌िरे अस्तित्वात असून शहराला ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. शहरातील या साऱ्या वास्तू पाहताना आपणास इतिहासाची आठवणच नव्हे, तर गोंडकालीन गौरवपूर्ण, वैभवसंपन्न परंपरा व संस्कृतीची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. या ऐतिहास‌िक वास्तू आणि स्थळांना सुरक्षित ठेवावे, या स्थळांच्या संवर्धनासाठी लोकलढा निर्माण झाला पाह‌िजे, या उद्देशाने इको-प्रोतर्फे गेल्या १ मार्च २०१७ रोजी ‘भारत स्वच्छता अभियान अंतर्गत’ चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान सुरू केले. त्यात सातत्य कायम राखले आहे.




या अभियानांतर्गत चंद्रपूर शहरात गोलाकार बांधण्यात आलेला गोंडकालीन ५५० वर्षे जुना किल्ला परकोट आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात वृक्ष-वेली, झाडी-झुडपे वाढलेली होती. किल्लाच्या मार्गावरही कचरा टाकण्यात आला होता. तसेच किल्ल्यालगतच्या घरांतील अडगळसुद्धा यावर ठेवण्यात आली होती. ही सर्व सफाई करून किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज ११ किमी भितींपैकी जवळपास ७ कि.मी. लांबीची भिंत स्वच्छ करण्यात आली आहे. एकूण ३९ बुरुजांपैकी २५ बुरूज स्वच्छ करण्यात आले आहेत. ४ मुख्य दरवाजे, ५ खिडक्या पैकी ४ खिडक्या स्वच्छ करण्यात आल्या आहेत.




पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये, सलग २०० दिवस सातत्यपूर्णरित्या राबविलेल्या या अभियानाचे तसेच कार्यकर्त्यांचे कौतुक केले होते . स्वच्छताच नाहीतर आपला ऐतिहासिक वारसा जतन केला जावा, याकरितासुद्धा या अभियानाचे महत्त्व आहे. अशाप्रकारे सर्व ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात कार्य केले गेले पाह‌िजे, असा उल्लेख पंतप्रधानांनी केला. स्वच्छतेचा हा भगीरथ प्रयत्न सौंदर्य, सामूहिकता व सातत्याचे अद्भूत उदाहरण आल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले होते.

100 Episodes of Mann ki Baat: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हर महीने प्रसारित होने वाले अपने लोकप्रिय रेडियो कार्यक्रम 'मन की बात' के 100वें एपिसोड में आज देश की जनता के सामने अपनी बात रखेंगे। आपको बता दें कि साल 2014 में केंद्र में नरेंद्र मोदी की सरकार बनने के बाद से यह रेडियो कार्यक्रम 52 भाषाओं में लगातार प्रसारित हो रहा है। आज के 100वें एपिसोड का संयुक्त राष्ट्र मुख्यालय में भी सीधा प्रसारण किया जाएगा।


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.