Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल २८, २०२३

श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. शिवनाथजी कुंभारे यांची फेरनिवड

श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. शिवनाथजी कुंभारे यांची फेरनिवड : प्राचार्य भाऊ पत्रे जिल्हा प्रचार प्रमुख



डॉ. कुंभारे यांचा सत्कार करताना गुरूकुंज आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, बाजुला बंडोपंत बोढेकर, अरविंद वासेकर, भाऊराव पत्रे


गडचिरोली (प्रतिनिधी)-
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल जगताला मानवतेचा संदेश दिला . त्यांनी आपल्या साहित्यातून ग्राम परिवर्तनाची प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण सेवा कार्याचे व्रत सदैव जोपासले पाहिजे, असे प्रतिपादन अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांनी केले. ते श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या मुख्य सामुदायिक प्रार्थना मंदिर सभागृहात ते बोलत होते.


याप्रसंगी डॉ. शिवनाथजी कुंभारे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, दलितमित्र नानाजी वाढई, पंडित पुडके, सुखदेव वेठे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढील तीन वर्षासाठी जिल्हा सेवाधिकारी म्हणून सर्वानुमते सुप्रसिद्ध समाजसेवी शिवनाथजी कुंभारे यांची फेरनिवड करण्यात आली तर जिल्हा प्रचार प्रमुख म्हणून प्राचार्य भाऊराव पत्रे यांची निवड करण्यात आली. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी आपल्या भाषणातून डॉ. कुंभारे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण परिवर्तनवादी सेवा कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.


याप्रसंगी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. उप सेवाधिकारी चरणदास बोरकुटे पाटील, जिल्हा सचिव अरविंद पाटील वासेकर, जिल्हा कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कुळमेथे, जिल्हा संघटक सुखदेव वेठे, भजनप्रमुख कडूजी येरमे ,युवक प्रमुख दीपक चौधरी, महिला प्रमुख सौ. विश्रोजवार तर कार्यकारणी सदस्य म्हणून मधुकर भोयर, अनिल धात्रक, घनश्याम जेंगठे, मारोतराव उईके, पंडित पुडके, अमित तिवाडे ,सौ. सुनंदा वेठे आदींचा समावेश करण्यात आला आहे. सेवा मंडळाच्या संघटन आणि प्रचार- प्रसाराच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्याचे दोन प्रभाग करण्यात आले . त्यात जिल्हा सेवाधिकारी डॉ. कुंभारे आणि प्रचारक भाऊराव पत्रे यांचेकडे तालुका गडचिरोली ,चामोर्शी, मूलचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली आणि भामरागड इत्यादी तालुक्याचा प्रभार देण्यात आला आहे.
सूत्रसंचालन पंकज भोगेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन पंडित पुडके यांनी केले. कार्यक्रमास माजी शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, विलास निंबोरकर, विलास पारखी, केशवराव दशमुखे , तसेच शिवनी, वाकडी ,मारकबोडी, टेंभा येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
👇


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.