Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १०, २०२३

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर राष्ट्रउभारणीची मुक्त कार्यशाळा - डॉ. रुबिना अन्सारी Dr. Rubina Ansari

    समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण शिबिराचे उद्घाटन




कामठी:राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेम निर्माण करणारी एक संधी तर प्राप्त होतेच सोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वाव देणारे मुक्त ज्ञानमंच त्यांना लाभते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे राष्ट्र उभारणीची अत्यंत प्रभावी अशी मुक्त कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी यांनी केले.


समाजकार्य महाविद्यालय कामठीद्वारा ' युवकांचा ध्यास -  ग्राम, शहर  विकास ' या संकल्पनेवर आधारित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय भाषण करताना त्या बोलत होत्या. या प्रसंगी प्रमुख अतिथी पारशिवनी पंचायत समितीच्या सभापती मंगला निंबोणे, उपसभापती करुणा भोवते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गिरिधर धोटे, उपाध्यक्षा अश्विनी गजभिये,  मुख्याध्यापक खुशाल कापसे, पोलीस पाटील संदीप मेश्राम, माजी सरपंच चुडामन ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

सात दिवस चालणाऱ्या ह्या शिबिरात ग्राम स्वच्छता अभियान, तज्ज्ञ मार्गदर्शकांचे बौद्धिक व्याख्याने , आरोग्य जनजागृती, समाज प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, गाव सर्वेक्षण, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

उद्घाटनीय समारंभाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी  प्रा.डॉ राष्ट्रपाल मेश्राम, सूत्रसंचालन शेखर घाटोळे आणि वैष्णवी बोंदरे, आभार प्रदर्शन लखन लाखे यांनी केले.

शिबिराच्या यशस्वितेसाठी शिबिर समन्वयक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, सहसमन्वयक डॉ.प्रणाली पाटील, प्रा.शशिकांत डांगे, प्रा.गिरीश आत्राम, शिबिरार्थी विद्यार्थी आदींनी परिश्रम घेत आहेत. मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.