स्थानिक संत श्री गजानन महाराज देवस्थान सरकार नगर येथे प्रगट दिनाचे औचित्य साधून सात दिवसीय भागवत सप्ताह आयोजित करण्यात आले आहे त्याच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरातील युवा गायक प्रणय गोमाशे (ह.मु मुंबई) यांचा अभंगवाणी हा अभंग व भक्तीगीत संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला.
जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक स्व.मुरलीमनोहर शुक्ल गुरुजी मुंबई व राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक श्री महेश काळे ह्यांचे शिष्य प्रणय गोमाशे यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत पंचावलीने सुरुवात केली, पुढे सूर निरागस हो या भक्ती गीताने वातावरण प्रफुल्लित केले, त्यानंतर सुखाचे जे सुखच चंद्रभागेच्या तटी,शेगविचे योगी गजानन,सुप्रसिद्ध अभंग माझे माहेर पंढरी, कानडा राजा सारख्या अभंगाने श्रोते अगदी मंत्रमुग्ध झाले,श्रोत्यांच्या आग्रहास्तव मन लागो रे गुरू भजनी ने कार्यक्रमाला नाव रंग आला...तर दिल की तपिश,मुरलीधर श्याम सारख्या बंदिशी ने रसिकांची भरपूर दाद मिळवली व अभिजात संगीताची प्रचिती आली. कार्यक्रमाच्या सरते शेवटी खेळे कान्हा या गवळणीने ठेका धरला तर कार्यक्रमाची सांगता साधुसंत येती घरा तोच दिवाळी दसरा या भैरवीने झाली. यावेळी साथसंगत म्हणून कीबोर्ड वर श्री. प्रवीण ढगे तबलावादक श्री. सतीश कौरासे हार्मोनियम वादक श्री.सुधीर नाकाडे, सहगायक व टाळकरी श्री.संदीप ढगे,श्री. बबनराव गेडाम, मृणाल गेडाम, शुभम नरवडे,अथर्व निचत मंडळी होती.
संत श्री. गजानन महाराज संस्थान सरकारनगर संस्थानाच्या वतीने श्री.लक्ष्मणराव धोबे श्री.बबनराव कडूकर श्री.संदीप आवारी श्री.हरिदास टोंगे श्री.प्रकाशराव घंटावर श्री.विलास गोरशेट्टीवार श्री.अशोक मुसळे श्री.नरेंद्र शर्मा श्री.गजानन ताजने श्री.गिरीश कडूकर श्री.नितीन खडकी श्री.सुमित घाटे श्री.पवन निनावे श्री.नामदेवराव माणूस मारे श्री.रोहित घाटे श्री.अशोकराव चांदेकर तसेच समस्त युवा मंडळी व महिला मंडळ यावेळी उपस्थित होते.