Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १०, २०२३

हडस्ती_येथे_जगन्नाथ_बाबा_पालखी_सोहळ्यामध्ये_भाविकांची_उसळली_गर्दी


पालखी सोहळयामध्ये 20 भजन मंडळीचा सहभाग




हडस्ती (बल्हारपूर):- श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा मुर्तीस्थापना व श्री. मारोती (महाराज) जन्मोत्सव सोहळा महोत्सव दि. 08/02/2023 रोज बुधवार ला ह.ज. प. प्रविण नवले महाराज यांचे किर्तनाने सुरूवात झाली. श्री. जय जगन्नाथबाबा यांच्या जय जय काराने हडस्ती नगरी दुमदुमली.

दि. 09/02/2023 रोज गुरूवारला पहाटे तरूणवर्ग व समस्त नागरीकांनी ग्रामसफाई केली व महिलांनी घरासेमार रांगोळी टाकली, गावातील सर्व नागरीक शेतीकडे पाठ दाखवुन पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित होते व महिलामध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. श्री. जगन्नाथ बाबा मंदिर (नविन वस्ती) येथुन सकाळी 10 वाजता श्री. मारोती महाराज यांची दमनीमध्ये बसुन पालखी सोहळयाला सुरूवात झाली.

गावातील तरुणवर्ग यांनी पालखी सोहळयामध्ये सहभाग असणा-या भजन मंडळी व भाविक भक्तांसाठी अल्पोहार व श्री. जगन्नाथ बाबा काळा याची व्यवस्था केली होती. पालखी सोहळा झाल्यानंतर काल्याचे किर्तन ह.भ.प. साखरकर महाराज व दहीहंडी श्री. मारोती महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले व त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.

पालखी सोहळयामध्ये उपस्थित झालेल्या सर्व भजन मंडळीचे मंदिरातर्फे सत्कार करण्यात आला. पालखी सोहळ्यामध्ये श्री. पावडे महाराज (कायर-पिपरी), श्री. पवन महाराज (विठ्ठलवाडा) श्री. पावडे महाराज (हिरापुर) व गावोगावुन आलेले हजारो भाविक भक्त उपस्थित होते. गावातील नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.