Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १०, २०२३

निलज येथे शनिवारी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन आयोजन Health

निलज येथे शनिवारी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन आयोजन




शहर प्रतिनिधी ब्रम्हपुरी:
ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज येथे 11 फेब्रुवारीला ग्रामपंचायत च्या वतीने तथा अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होम आरमोरीच्या सहकार्याने आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.


निलज येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतच्या वतीने गावातच नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी व रोगावर उपचार व्हावा तसेच गावातील आजाराविषयी माहिती मिळावी याकरिता आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 11 फेब्रुवारीला दुपारी बारा ते तीन या दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले आहे .

 अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होम (Anusaya Maternity Surgical & Nursing Home) आरमोरीच्या महिला रोग तज्ञ डॉ. शिलू चिमुरकर व आरमोरी येथील प्रसिद्ध डॉ. महेश कोपुलवार हे  शिबिरातील रुग्णांची तपासणी करणार आहेत. निलज येथील नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.