अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे "लक्षवेधी"आंदोलन
जुन्नर /आनंद कांबळे
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यसमितीची सभा शिक्षक भवन नवीदिल्ली येथे नुकतीच संपन्न झाली .यात जुनी पेन्शन योजना लागु व्हावी यासाठी कालबद्ध आंदोलन करण्याचा निर्णय झाला
असून ,.याचाच भाग म्हणून लोकसभा व राज्य सभा सदस्यांच्या शासकीय बंगल्यावर जावून "जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणी साठी "नाँक द डोअर" ही मोहीम राबवून लोकप्रतिनिधी चे या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस सुभाष मोहरे व अध्यक्ष शिवाजीराव वाळके यांनी दिली.
या कार्यसमितीच्या सभेत संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन हे शालेय सुट्ट्यांच्या काळात व विद्यार्थ्यांचं शालेय नुसकान होऊ नये आणि शालेय शैक्षणिक कामकाजात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून आमचे अधिवेशन मे महिन्यात दिनांक ११ मे ते १३मे २०२३ दरम्यान गांधीनगर -गुजरात येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
त्याचबरोबर जुनी पेन्शन सह नवीन शैक्षणिक धोरणातील त्रुटी, शिक्षणसेवक योजना रद्द करणे त्याच बरोबर सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी नियोजन बद्ध आंदोलन कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी नुकतेच स्वाक्षरी मोहीम जिल्हा व राज्य मुख्यालयावर धरणे आंदोलन संघटनेच्या वतीने करण्याचा निर्त्णय घेण्यात आला.
तसेच लोकप्रतिनीधीचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी व संसदेत पेन्शनबाबत निर्णय घेण्यात यावा यासाठी पश्चिम दिल्ली लोकसभा क्षेत्राचे खा.प्रवेशसिंह वर्मा ,खा.जयप्रकाश निषाध, खा.मुझीबुल खान (ओरीसा) ,.के.एल वर्मा (उ.प्र),खा.ओमराजे निंबाळकर,उत्तराखंड चे माजी मुख्यमंत्री तथा खासदार तीर्थसिंह रावत,खा.विष्णु दयाल राम (बिहार),केंद्रीय मंत्री पुरोषोत्तम रुपाला, मनसुख मांडवीया (गुजरात), तसेच तेलगंणा भाजपा अध्यक्ष तथा खासदार बंडी संजय कुमार यांचे सह जवळपास ५० ते ६० खासदारांना निवेदन देण्यात आले.यापुढे राहिलेल्या सर्व लोकप्रतिनिधी यांना तसेच विरोधीपक्ष नेत्यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
तसेच पुर्व -पश्चिम-दक्षिण -उत्तर सीमेवरून पेन्शन संघर्ष यात्रा ५ सप्टेंबर शिक्षक दिनी काढण्यात येणार असून ५आँक्टो़ंबर जागतिक शिक्षक दिनी तालकटोरा ग्राउंड (नवीदिल्ली)येथे पेन्शन रँली आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष रामपालसिंह, महासचिव कमलाकांत त्रिपाठी, वरीष्ठ उपाध्यक्ष रामचंद्र दबास, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष .देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यांचे सह २४ राज्याचे संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
या निर्णयाचे स्वागत सुभाष मोहरे सरचिटणीस अखिल पुणे व शिवाजीराव वाळके अध्यक्ष अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ यांनी केले.