Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी २१, २०२३

बापरे! चंद्रपूरच्या जंगलात वाघ आणि बिबट्यात झाली मोठी झुंज; बिबट ठार

Chandrapur tiger
वाघ, बिबट आणि वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता जंगलात वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. मागील तीन-चार महिन्यांमध्ये वन्य प्राण्यांच्या झुंजी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, यामध्ये वन्य प्राण्यांचे जीव जाऊ लागले आहेत. आज मंगळवारी सिंदेवाही तालुक्यातील पाथरी रोडवर असलेल्या तांबेगडी मेंढाजवळ एका वाघाने बिबट्याशी झुंज केली आणि त्यात बिबट्याला ठार केले.




रोडावर पट्टेदार वाघाच्या झुंजीत बिबट ठार झाला वनपरिक्षेत्र प्रादेशिक अंतर्गत येत असलेल्या उपवनपरीक्षेत्र तांबेगळी मेंढा मधील मरेगाव तुकुम्म खैरी पासून एक किलोमीटर अंतरावर रोडवर आज मंगळवारला सकाळी वाघाच्या झुंजीत बिबट ठार झाल्याची घटना घडली आहे .घटनेची माहिती मिळतात वनपरिक्षेत्र अधिकारी व टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पुढील तपास चालू आहे.

Chandrapur Maharashtra India Tiger tadoba andhari National Tiger Reserve


A tiger and a leopard had a big fight in the forest of Chandrapur; Leopard killed 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.