आयुध निर्माण वसाहतीच्या सेक्टर पाचमधील घटना
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) : Leopard attacks woman
आयुध निर्माण येथील सेक्टर पाच लोकवस्तीतील बिबट्याने एका महिलेवर हमला करून गंभीर जखमी केले. उपचारार्थ चंद्रपुरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरीकांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हमला करणाऱ्या बिबट्याचा घटनास्थळ परिसरात वावर आहे. (Leopard Attack)
विमलादेवी टिकाराम ही 42 वर्षीय महीला नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरायला निघाली असता या भागात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हमला चढविला महिलेच्या मानेच्या मागील भागास गंभिर दुखापत केल्याने आयुध निर्माणी च्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारार्थ चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना - दि. 20 फेब्रुवारीला सायं. ६.१५ वाजता घडली. (Leopard Attack)
याच भागात दि. १८ फेब्रुवारीच्या पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट जेरबंद झाल होता. या लोकवस्तीत अनेक हिंस्र प्राणी वन्य प्राण्याचा वावर आहेत. वनविभाने आयुध निर्माणित प्रशासनाला मानव वस्ती भागातील जंगलाची कटाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतू त्यांनी अजूनपर्यंत दिलेल्या सूचना अमलात आणल्या नाही. नागरीकांनी सोबत कुत्र्यांना घेऊन फिरू नये, कुत्रे पाळू नये आणि पहाटे, सायंकाळी व रात्रीला रस्त्याने पायदळ, सायकल व दुचाकीने फिरू नये अशा बुचना दिल्या होत्या. परंतू याचे पालन केल्या जाती नाही. या भागात पिंजरे लावले असून घटनेची माहीती मिळताच क्षेत्र सहायक विकास शिंदे, वनरक्षक धनराज गेडाम यांनी भेट देवून महिलेला पुढिल उपचारार्थ चंद्रपूरला खाजगी रुग्णालयात रवाना केले.