Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी २१, २०२३

चंद्रपूरमध्ये जिओची 5G सेवा सुरू | Jio 5G service launched in Chandrapur





11 राज्यातील 20 शहरांमध्ये एकाच दिवशी 5G लाँच करून जिओ ने एकप्रकारे विश्वविक्रम केला. भारतामध्ये जिओ 5G उपलब्ध असलेल्या शहरांची संख्या 277 वर पोहोचली आहे. चंद्रपूर शहर आज जिओ ट्रू 5G नेटवर्क शी जोडले गेले.

आजपासून, जिओ वेलकम ऑफर चंद्रपूरसह महाराष्ट्रातील इचलकरंजी येथेही सुरू झाली. ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 Gbps+ वेगाने अमर्यादित डेटा मिळेल.

चंद्रपूरशिवाय महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, नांदेड, कोल्हापूर ,जळगाव, सांगली, इचलकरंजी आणी अहमदनगर येथे जिओ 5G सेवा सुरू करण्यात आली आहे.


याप्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “चंद्रपूर मध्ये जिओ ची 5G सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून चंद्रपूर शहरात 5G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे. आम्ही जिओ ट्रू 5G तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह चंद्रपूर आणि महाराष्ट्रातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. महाराष्ट्र डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत.”


आजपासून, शहरातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, 1 Gbps+ पर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल.


जिओ ही एकमेव कंपनी आहे जिने 4G नेटवर्कवर शून्य अवलंबित्व असलेले स्टँडअलोन ट्रू 5G नेटवर्क तैनात केले आहे. स्टँडअलोन ट्रू 5G सह, जिओ नवीन आणि शक्तिशाली सेवा देऊ शकते जसे की कमी लेटन्सी कनेक्टिव्हिटी, मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, 5G व्हॉइस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लाइसिंग.

जिओ ट्रू 5G सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ 5G नेटवर्क सुसंगत 5G हँडसेट, राहत्या / कामाच्या ठिकाणी 5G नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी 239 किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल.




JioTrue5G has 5G wireless technology that provides fastest speed, lower latency and stable connectivity. Know about 5G connection, 5G benefits,

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.