- तरुणांच्या सर्वांगीण विकासाकरिता पीआरसीआय आणि रायसोनी ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम
नागपूर : पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय), नागपूर विभाग आणि रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स येथे तरुण संवादकांच्या विकासासाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आयआयएम नागपूरमध्ये कार्यरत आणि तब्बल ३८ वर्षांचा अनुभव असलेले प्रतिष्ठित प्राध्यापक धर्मेंद्र सेंगर यांना "हाऊ टू बिकम ॲन अचिव्हर" या विषयावर त्यांचे अनुभव कथन करण्यासाठी अतिथी वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रा. सेंगर हे आयआयएम लखनऊचे संस्थापक अध्यक्ष आणि कायदेशीर व्यवस्थापनाचे प्राध्यापक म्हणून सुपरिचित आहेत. ते भारतीय कायदा संस्थेचे संचालक आणि मोहनलाल सुखदिया विद्यापीठ, राजस्थान येथे कुलगुरू पदांवर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे जगभरातील तेरा देशांतील चाळीसहून अधिक संस्थांमध्ये शिकवण्याचा अनुभव आहे.
(PRCI -Public Relations Council of India)
आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी स्वतःला सक्षम करण्यासाठी, प्रा. सेंगर यांनी तरुण संवादकांना नावीन्यपूर्ण, उत्तम आणि दीर्घकालीन टिकेल असे काम करण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन केले. तरुणांना उत्साह आणि प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातील अनुभव आणि प्रेरणादायी कथा सांगितल्या. आपल्या संबोधनात त्यांनी सांगितले की, जर तरुण शिस्तबद्ध आणि समर्पित असतील तर त्यांची स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील. स्पष्ट उद्दीष्ट, निर्णय क्षमता, मोठी स्वप्ने पाहण्याची सवय आणि आपल्या कामात उत्कृष्ट असणे ही यशाची मूलभूत तत्त्वे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. तरुणांना जीवनात शंभर टक्के समर्पण आणि निर्भयपणे पुढे जाण्याची प्रेरणा प्रा. सेंगर यांनी दिली. सत्राच्या शेवटी, त्यांनी सर्व तरुण संवादकांना सकारात्मकतेची प्रतिज्ञा दिली आणि त्यांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी ही शपथ घेण्याचे आवाहन केले. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या व्यवस्थापन आणि इतर अभ्यासक्रमाच्या तीनशेहून अधिक तरुण संवादकांनी या सत्राचा लाभ घेतला.
PRCI -Public Relations Council of India)
तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन पारंपारिक पद्धतीने दीप प्रज्वलन करून झाले. सत्राच्या सुरुवातीला रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे सीईओ सचिन उंटावळे यांनी प्रा. धर्मेंद्र सेंगर आणि डॉ. आरती देशपांडे, डायरेक्टर रायसोनी बिझनेस स्कूल यांच्या हस्ते पीआरसीआय नागपूर विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री. आशिष तायल यांचा सत्कार केला. या विशेष सत्रादरम्यान प्रा. श्री. अभिषेक मोहगावकर (सचिव), श्री. निखिलेश सावरकर (ट्रेजरर), आणि पीआरसीआय, नागपूर विभागाच्या कु. बरखा मुनोत (कार्यकारी सदस्य), डीन ॲकॅडेमिक्स, रायसोनी ग्रुप कु. ज्योती महाजन आणि वरिष्ठ प्राध्यापक सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
PRCI -Public Relations Council of India)