नागपूर : जैन कलार समाज न्यासची निवडणूक अलीकडेच पार पडली. किचकट निवडणूक प्रक्रिया, मतमोजणीतील घोळ व निवडणूक अधिका-यांचे नियमबाह्य वर्तन यामुळे धर्मदाय आयुक्तांनी निकाल प्रक्रियेवर स्थगिती दिली आहे.
25 डिसेंबरला जैन कलार समाजाच्या मध्यवर्ती समितीसाठी तसेच जिल्हा समितीसाठी एकूण २६ केंद्रांवर मतदान पार पडले. २६ डिसेंबरला मतमोजणी अपेक्षित होती. मात्र, तसे न होता पाच दिवसांनंतरही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात आला नव्हता. मतमोजणी प्रक्रियेतील घोळामुळे मतांमध्येही मोठी तफावत दिसून आली. एकूण सभासद 18 हजार होते. पैकी 11 हजार 127 सभासदांनी मतदान केले. निकाल विलंबाने घोषित करणे, दबावतंत्राचा वापर करणे आणि अन्य मार्गाने निवडणुकीत बाधा पोहचविणे, अशा अनेक घटना घोटाळा झाल्याचे दर्शवितात. ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी आणि निवडणूक झाल्यास सत्ताधारी कार्यकारणीकडून खर्च वसूल करावा, अशी विनंतीही याचिकेद्वारे आपुलकी पॅनलने केली आहे.
या निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा आरोप आपुलकी पॅनलने केला. आता हे प्रकरण नागपूर धर्मादाय उपायुक्त कार्यालयात पोहचले आहे. . निवडणुकीच्या निकाल प्रक्रियेवर धर्मादाय उपायुक्त न्यायायाने स्थगिती दिली आहे.
पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जैन कलार समाजाचे लक्ष आता या सुनावणीकडे लागले आहे. तत्पूर्वी, आपुलकी पॅनलचे अनिल तिडके यांनी या सर्व प्रक्रियेत अनियमितता आणि घोळ झाल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता.
Jain Kalar Samaj Election Trouble: Charity Court Stays Proceedings
जैन कलार समाज न्यास निवडणुक २०२२ यात झालेला घोळ आणि चुकीची झालेली निवडणुक प्रक्रिया यावर उप धर्मदाय आयुक्त नागपुर यांनी निवडणुक प्रक्रिया उर्वरित मतमोजणी आणि पुनमोजणी तसेच निवडणुकीचा निकाल EXH.1 वर स्तगिती देण्यात आली आहे.
- अनिल तिडके,
अध्यक्ष, आपुलकी पॅनल
नागपूर
मो. 9168144839