आई-वडिलांचे स्वप्न चित्रपटसृष्टीमध्ये जाऊन आपण साकार केले! अभिनेत्री आशु सुरपूर
सुनिल ज्ञानदेव भोसले/पुणे
मराठी चित्रपटासह हिंदी चित्रपटांमध्ये उदयास येत असलेली फिल्म अभिनेत्री आशु सुरपूर यांचा दिनांक 15 रोजी वाढदिवस साजरा होत आहे.या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या घेतलेल्या कार्याचा आढावा.
मुंबईमध्ये वसई येथे जन्मलेली आशु सुरपूर यांचा जन्म दिवस जानेवारी महिन्यात 15 तारखेला झाला. या दिवसाला महाराष्ट्र मध्ये फार महत्त्व आहे या दिवशी जी मुलं जन्माला येतात ती निश्चितच भाग्यवान असतात, वसई शहरात आई वडिलांचे स्वप्न घेऊन आपल्या जिद्दीच्या व महत्त्वकांक्षी जोरावर महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये चित्रपट सृष्टीतील स्वप्न साकार करणारी ही मुलगी आज संपूर्ण भारतात आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून आपले नावं रोशन केल आहे. आम्हाला सगळ्यांना आभिमान आहे अश्या कलाकारांना नेहमी साथ देत आहोत, मीडिया पत्रकार माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे ,
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आशु सुरपूर यांना विविध मान्यवरांनी जन्म दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आशु सुरपूरकर चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केल्यानंतर अत्यंत मेहनती आणि कष्टातून वर आलेली असून ते काम करत असताना समाजसेवाहीं करत असते, गरीब मुलांना कपडे किट वाटप, फुथपाटवर राहणाऱ्या गरीब कुटूंबाना नेहमी मदतीचा हात त्यांच्याकडून दिला जातो. कोरोनाच्या काळात आईचा मृत्यू झाला तरीपण हार मानली नाही स्वतःचे दुःख बाजूला सारून गरीब कुटूंबाना कोरोना काळात जीवाची पर्वा न करता मदत करत होत्या, व आजही करत आहेत.
अशा प्रकारच्या समाजपयोगी कामामध्ये ते नेहमीच कार्यरत असून आघाडीवर असतात.वाढदिवसानिमित्त पत्रकार स्नेहा मडावी यांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या घेतलेल्या कार्याची माहिती अभिनेत्री आशु सुरपूरकर यांनी बोलताना व्यक्त केले आहे.म्हणाल्या, मी दूरदर्शनवर बे दुने चार सिरयल लिड केली असून सुरक्षा नावाची सिरीयलही लिड केली आहे. त्याचप्रमाणे बोद्धीवुक्ष नावाची सिरीयल, हिन्दी लॉर्ड बुद्धा टिवि चैनल सिरीयल ३२ ऐपिसोड लिड केले आहेत. पुढचं पाउल सिरयलचे ऐपिसोड स्टार प्रवाह वरिल मालिका पुढचं पाउल ह्या सिरयलचे २३ ऐपिसोड पूर्ण झाले असून,तुझ्यात जिव रंगला मधिल राणा बरोबर जय महाराष्ट्र पोलिस सिरयल लक्ष सिरयल, पुढचं पाउल, आसावा सुंदर घर, सिरयल मधिल भुमिका रुंक्षद राणा ह्याचा बायकोच्या भुमिकेत सावधान इंडिया लाईफ़ अभिनेत्री या व अशा अनेक भूमिका आशु सुरपूर यांनी केल्या आहेत. सावधान इंडिया, सई ताम्हणकर बरोबर तु ही रे चित्रपट त्यामध्ये. मैत्रीणची भुमिका केली आहे. डायरेक्टर संजय जाधव यांचा सुप्रसिद्ध चित्रपट झाला बोबाटा त्या मध्ये छान भुमिका केली आहे. संजय कदम, कमलेश सावंत, बाळकृष्ण शिंदे,दिलीप प्रभावळकर, सिद्धांत जाधव, सविता प्रभुणे, सयाजी शिंदे या निर्माती व सिने कलाकारांच्या बरोबर चित्रपट व सिरीयल मध्ये काम केले आहे. आपल्या थोडक्या अवधीच्या काळामध्ये उत्तुंग अशी भरारी घेऊन सिनेसृष्टी मध्ये एक वेगळीक निर्माण केली आहे. व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. अशा या गुणवंत नामवंत तसेच सामाजिक व कलाक्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या फिल्म अभिनेत्री आशु सुरपूर यांचा वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी व्यक्त आहेत.